Health First | मुतखडा कसा होतो | कारण, प्रकार, लक्षणे, औषधोपचार
मुंबई , ७ सप्टेंबर : मूत्रपिंड किंवा लघवीच्या मार्गात तयार होणारे कठीण स्फटिकजन्य पदार्थ मुतखडा म्हणून ओळखले जातात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ एकाच जागी जमा होऊन मुतखडा निर्माण करतात. मूत्रमार्गात जंतू संसर्गामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे रूपांतर मुतखड्यात होते.
मुतखडा बनण्याची कारणे :-
- लघवीचे प्रमाण कमी होऊन मुतखडा तयार करणारी घटके जास्त प्रमाणात वाढल्याने.
- लघवीतील न विरघळणारे स्फटिकजन्य पदार्थ एकत्रित जमा झाल्याने.
- पाण्याचे शरीरात प्रमाण कमी झाल्याने.
- मूत्रमार्गात होणारे जंतु संसर्गामुळे नायडस तयार होऊन क्षार बनल्याने.
मुतखड्याचे प्रकार :-
- कॅल्शियम: कॅल्शियम ऑक्झॅलेट किंवा कॅल्शियम फॉस्फेटचे खडे तयार होऊन मुतखडा होतो.
- युरिक अॅसिड: लघवीत युरिक अॅसिडचे प्रमाण वाढून त्याचे मुतखडे बनतात.
लक्षणे :-
- मुतखड्याची लक्षणे साधारणपणे दिसून येत नाही. मुतखड्याची मूत्रमार्गात हालचाल होऊन अडथळा येतो त्यावेळी तीव्र वेदना जाणवते.
- ज्या बाजूस मुतखडा असेल त्या बाजूस तीव्र वेदना होते.
- पाठी, पोट, ओटीपोटात तीव्र वेदना होते.
- लघवीत रक्त जाते.
- लघवी पुन्हा-पुन्हा आल्याची संवेदना होते. लघवी करताना जळजळ होते.
- जंतु संसर्ग होऊन थंडी ताप येतो.
मुतखडा न होण्यासाठी करावयाचे उपाय :-
- पाणी जास्त पिणे.
- जास्तीत जास्त पाणी पिणे हा निरोगी आयुष्यासाठी आणि मुतखड्यासारख्या विकारावर आळा घालण्यासाठी उत्तम उपाय आहे. मुतखड्यांना रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दररोज पुरेसे पाणी म्हणजेच 8 ते 12 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
आहारामधील सोडियम आणि प्राण्यांच्या मांसातून मिळणारी प्रथिने (मांस, अंडी) नियंत्रित ठेवल्यास मुतखड्यांचा त्रास टाळण्यास मदत होऊ शकते. मुतखडा होण्याची प्रवृत्ती टाळण्यासाठी जवाचे पाणी, उसाचा रस, काकवी यांचे सेवन करावे.
औषधोपचार :-
लिथोट्रिप्सी पद्धत : रुग्णाच्या शरीराच्या बाहेरून यंत्राद्वारे खड्याला सूक्ष्म ध्वनी कंपनीने शॉक देऊन त्याचा चुरा करणे. यामध्ये खड्यांचा चुरा लघवीवाटे बाहेर पडतो. त्यामुळे उपचारानंतर रुग्णाला भरपूर पाणी प्यायला सांगितले जाते. या पद्धतीत शस्त्रक्रियेची गरज नाही. शरीरातील कोणत्याही अवयवावर आघात किंवा जखम केली जात नाही.
परक्युटॅनिअस नेफ्रोलिथोटॉमी :
या उपचारपद्धतीमध्ये दुर्बिणीच्या साह्याने शस्त्रक्रिया करून खडा शरीरातून बाहेर काढला जातो. दुर्बिणीद्वारे खडा काढण्याची ही उपचार पद्धती मूत्रपिंडातील व वरच्या मूत्र वाहिन्यातील विविध प्रकारच्या मोठ्या खड्यांसाठी जास्त योग्य आहे.
युरेटेरोस्कोपी : मूत्रवाहिनीत असलेले खडे युरेटेरोस्कोपीद्वारे काढता येतात.
मुतखडाच्या वेदना दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय:-
- अर्धा कप गरम पाण्यात साजूक तूप टाकून पिण्याने 15 मिनिटात पोटदुखी थांबते.
- सराटा (काटेगोखरू)चा काढा तूप टाकून दिल्यास, मुतखडा पडून जाण्यास व वेदना कमी होण्यास मदत होते.
- कुरडू नावाच्या वनस्पतीची अथवा वायवर्ण्याची साल याचा स्वरस अथवा काढा घेतल्याने वेदना कमी होते.
- कडुलिंबाच्या पाल्याची राख दोन ग्रॅम पाण्याबरोबर नियमित घेतल्याने मुतखडा विरघळून बाहेर पडतो.
- खडा लहान असल्यास आणि जुना नसल्यास मेंदीच्या सालीचे बारीक वाटण करून चूर्ण सकाळी अर्धा चमचा पाण्या बरोबर नियमित घेतल्याने खडा विरघळून लघवी वाटे निघून जातो.
News English Summary: Drinking plenty of fluids is a vital part of passing kidney stones and preventing new stones from forming. Not only does the liquid flush out toxins, but it also helps move stones and grit through your urinary tract. Although water alone may be enough to do the trick, adding certain ingredients can be beneficial. Be sure to drink one 8-ounce glass of water immediately after drinking any flavored remedy. This can help move the ingredients through your system.
News English Title: Home Remedies for Kidney Stones for Health Fitness Marathi News LIVE latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया