27 December 2024 8:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Health First | चेहऱ्यावरील मुरूम नाहीसे करण्यासाठी करा हे घरगुती उपाय । नक्की वाचा

home remedies for removing pimples

मुंबई २४ एप्रिल : उद्या एखाद्या खास कार्यक्रमासाठी किंवा डेटवर जाण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक आहात… पण, आरशात पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर आलेले पिंपल्स तुम्हाला हैराण करून सोडत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा… एका रात्रीत तुम्हाला पिंपल्सपासून मुक्ती मिळू शकते.

  • गुलाबपाणी आणि कापूर यांचे मिश्रण एका बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. मुरूम जेव्हा होतील, त्यावेळी कापसाने हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. हे केल्याने नक्कीच मुरूम कमी होतील.
  • संपूर्ण चेहर्‍यावर मुरूम पसरले असतील तर हळद आणि कडुलिंबाची पाने एकत्रित वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि चेहर्‍यावर लावा. त्याने चेहरा स्वच्छ होईल. कारण लिंबाची पाने रोगप्रतिकारक असतात.
  • उन्हाळ्यात त्वचा तेलकट होते. प्रदुषणामुळे चेहरा काळा पडतो व नियमितपणे साफ न झाल्यामुळे मुरूम होतात. चेहर्‍याला स्वच्छ ठेवण्यासाठी बेसनात काकडीचा रस टाकून पेस्ट बनवून चेहर्‍याला लावल्याने चेहरा साफ व स्वच्छ होतो. हे फेस पॅकचे काम करतो.
  • मुलतानी माती पाण्यामध्ये टाकून तिची पेस्ट बनवा. नंतर ती चेहर्‍यावर लावा. मुलतानी मातीला दह्यात मिसळूनही लावू शकतो. मुरमांवर हाही एक जालीम उपाय आहे.
  • गरम पाण्यात हळद टाकून वाफ घेतल्याने चेहर्‍यावरील छिद्रे खुली होतात आणि चेहरा साफ होतो. मुरूम व्हायला त्यामुळे अटकाव होतो.
  • तुळस व लिंबाच्या पानाची पेस्ट चेहर्‍यावर लावल्याने मुरूम होत नाही.
  • पाण्यात चंदनाची पावडर टाकून चेहर्‍याला लावल्यास थंडावा मिळतो व चेहर्‍यावर तेज येते.
  • गुलाबाच्या पाकळ्याची पेस्ट बनवून चेहर्‍यावर लावल्याने मुरूम कमी होतात.

News English Summary: You are looking forward to going to a special event or a date tomorrow … but, if the pimples on your face are bothering you after looking in the mirror, then you should definitely try this remedy … one night you can get rid of pimples.

News English Title: Home remedies for removing pimples news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x