27 December 2024 7:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Health first | दातांचा पिवळेपणा नाहीसा करण्यासाठी करा हे घरगुती उपाय । नक्की वाचा

vanish your teeth yellowness

मुंबई २१ एप्रिल : दातांचा पिवळेपणा हा मनुष्याच्या सौंदर्यात अडथळा टाकतो. तुम्हीही जर या समस्येने ग्रस्त असाल तसेच तुम्हालाही पांढरेशुभ्र आणि चमकदार दात हवे असतील तर काही घरगुती टिप्सचा जरूर वापर करा. आम्ही तुम्हाला सांगत आहोत सोपे घरगुती उपाय ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे दात चमकदार आणि पांढरेशुभ्र बनवू शकता.

अनेक सुंदर दिसण्यासाठी बरेच जण बॉलिवूड सेलिब्रेटीजच्या ब्युटी टिप्स फॉलो करत असता. अनेकदा त्यांच्यासारखे सफेद तसेच मोत्यासारखे चमकदार हवेत अशी अनेकांची इच्छा असते. हसताना जर पिवळे दात दिसले तर ते आपल्या शरमेने मान खाली घालायला लावतात. सुंदर दिसण्यासोबतच ते आपल्या पर्सनॅलिटीवरही प्रभाव टाकतात. यासाठी आम्ही आज तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे दात मोत्यांसारखे शुभ्र बनवू शकता.

१. दातांच्या कोणत्याही समस्येवर कडूलिंब हा सर्वोत्तम उपाय आहे. कडूलिंबमुळे दातांमधील किड, दातांचा पिवळेपणा आणि दातांच्या इतर समस्या कमी होण्यास मदत मिळते. कडूलिंबाचा पाला सुकवून त्याची पावडर करून त्याने दात घासा. हल्ली बाजारात तयार पूड देखील मिळते.

२. बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण तयार करुन, त्याची व्यवस्थित पेस्ट बनवा. ही पेस्ट टूथब्रशवर घेऊन, त्याने नेहमीप्रमाणे दात घासा. यामुळे केवळ काही मिनिटांतच आपले दात मोत्यासारखे चमकदार होतील.

३. केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीझ असते. हे घटक ब्लिचिंग एजंट असल्यामुळे आपल्या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची साल उपयोगी पडते. म्हणून केळी खाल्ल्यानंतर त्याची साल न फेकता, ती साल आपण आपल्या दातांवर घासू शकता. आठवड्यातून किमान 2 वेळा हा उपाय केल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल.

४. बऱ्याचदा आपण टीव्हीवर किंवा इतर जाहिरातीत चारकोलच्या गुणांबद्दल ऐकले असेलच! चारकोल अर्थात कोळसा देखील दातांचा पिवळेपण दूर करण्यात फायदेशीर ठरतो. यासाठी बाजारात मिळणारी अॅक्टिव्हेटेड चारकोल पावडर घेऊन त्यानी दात स्वच्छ करू शकता. त्यामुळे तुमचे दात पांढरे दिसू लागतील.

News English Summary: The yellowness of the teeth interferes with the beauty of man. If you also suffer from this problem and you also want white and shiny teeth, then you must use some household tips. We are telling you simple home remedies that can help you make your teeth shiny and whiter.

News English Title: Home remedies for vanishing yellowness of teeth news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x