22 November 2024 3:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | प्रवासादरम्यान उल्ट्यांचा त्रास होतो? | मग या गोष्टी सोबत ठेवा - नक्की वाचा

vomiting during travel

मुंबई २१ एप्रिल : कित्येकांना प्रवासादरम्यान मळमळ, चक्कर आणि उल्टीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बंद गाडीमध्ये सुद्धा अनेकांना डोकं दुखीचा जानवतो. त्यामुळे असे प्रवासी अनेकदा गोळ्याचा वापर करतात. हा कोणता आजार नाही तर एक स्थिती आहे. ज्यात प्रवासादरम्‍यान कान, डोळे आणि त्‍वचेकडून मेंदुला वेगवेगळे सिग्‍नल मिळतात. या कारणांमुळे चक्‍कर येते किंवा मळमळ होते. खाली दिलेल्या उपायांच्या मदतीने प्रवास करताना मन चांगले राहते आणि उलटी होत नाही. इतकेच नाही तर खाली सांगितलेल्या टिप्स प्रवासादरम्यान चक्कर येणे आणि मळमळ सारख्या समस्या दूर करण्यासाठीसुद्धा प्रभावी ठरतात.

प्रवासादरम्यान उलटी होत असेल तर हा उपाय करा:

टॉफी खा:
प्रवास करताना जर तुमचे मन खराब होत असेल तर तुम्ही टॉफी अवश्य खावी. टॉफी खाल्ल्याने मन चांगले होते आणि मळमळ होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. यामुळे जेव्हा कधी तुम्ही प्रवास करत असाल तर सोबत एक टॉफी अवश्य जरूर ठेवा आणि जेव्हा तुम्हाला मळमळ होत असेल तर टॉफी अवश्य खावी.

सुगंधित वस्तू सोबत ठेवा:
मळमळ होने किंवा उलटी येत असेल तर सुघंधित वस्तूंचा वास घ्यावा यामुळे मन चांगले होते. जर तुम्ही प्रवास करत असाल तर आपल्या सोबत सुघंधित वस्तू जरूर ठेवाव्यात जसे पुदिनाची पाने किंवा गुलाबाचे फुल. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास रुमालवर मिंटच्या तेलाचे दोन तीन थेंब टाकावेत आणि जेव्हा तुमचे मन खराब होईल त्यावेळी रुमालाचा वास घ्यावा.

पुदीना करेल मदत:
आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, प्रवास करताना चक्कर येणं, उलट्या होणं आणि मळमळ होण्याचा त्रास होत असेल तर पुदीना तुमची मदत करू शकतो. प्रवासात पुदीन्याचं सिरप तुमच्यासोबत ठेवा आणि प्रवास करण्यापूर्वी प्या. तुम्हाला हवं असल्यास पुदीनाच्या गोळ्यांची मदत देखील घेऊ शकता.

लिंबू-मीठ:
प्रवास करताना मळमळ आणि उलट्या झाल्यास आपण लिंबाचा रस पाण्यात पिळून त्यामध्ये मीठ घालून सेवन करू शकता. प्रवासात जाण्यापूर्वी आपल्याबरोबर लिंबू, मीठ आणि पाणी घेऊन जाण्यास विसरू नका.

आंबट फळं आणि ज्यूस:
प्रवास करत असताना लिंबूवर्गीय फळं किंवा त्यांचा ज्यूस सोबत ठेवा. जेव्हा तुम्हाला उलट्या, चक्कर येणं आणि मळमळ होण्याची समस्या जाणवेल तेव्हा त्याचं सेवन केलं पाहिजे. यामुळे तुम्हाला उल्ट्यांच्या त्रासापासून आराम मिळेल.

आलं:
प्रवासादरम्यान उल्ट्यांच्या त्रासावर आलं नक्कीच मदत करेल. आलं सोलून घ्या आणि त्याचे तुकडे करा. प्रवासादरम्यान हे तुकडे तुमच्यासोबत ठेवा. प्रवास करताना उलट्या, चक्कर येणं आणि मळमळ होण्याची समस्या येते तेव्हा आल्याचे तुकडे तोंडात ठेवून चोखा.

चहा प्यावा:
प्रवास करताना जर मन खराब होत असेल तर तुम्ही अदरक किंवा लवंगाचा चहा प्यावा. अदरकचा चहा पिल्याने मन ठीक होते आणि उलटीपासून आराम मिळतो. चहा शिवाय तुम्ही लिंबाचा रस सुद्धा पिऊ शकता.

संत्रे खावे:
संत्री खाल्याने मन एकदम हलके होते आणि तोंडाची चव देखील चांगली होते. यामुळे प्रवास करताना तुम्ही तुमच्यासोबत संत्री जरूर ठेवावीत आणि मन खराब झाल्यास संत्रे खावीत. संत्री खाल्याने तुमचे मन एकदम चांगले होईल.

या गोष्टी लक्षात ठेवा मन खराब होणार नाही
* जर प्रवास करताना खाली सांगितलेल्या गोष्टींवर लक्ष दिले तर उलटी किंवा मन खराब होण्याच्या समस्येपासून वाचू शकतो
* विंडोच्या सीटवर बसण्याने मन खराब होत नाही आणि उलट्यांचा त्रास देखील होत नाही. म्हणून जेव्हा आपण प्रवास करता तेव्हा नेहमीच विंडो सीट घेण्याचा प्रयत्न करावा.
* प्रवास करताना अनेक लोकांना मोबाईल गेम खेळण्याची सवय असते. जी चुकीची आहे. कारण प्रवासादरम्यान मोबाईल वर गेम खेळण्याने चक्कर येऊ लागते आणि मन खराब होऊ लागते. मोबाइलप्रमाणेच कारमध्ये प्रवास करताना तुम्ही लॅपटॉपवर काम करू नये किंवा पुस्तक वाचू नये.
* कोणत्याही प्रवासाला जाण्यापूर्वी आपल्या खान-पानाची विशेष काळजी घ्यावी. कारण चुकीचे अन्न खाल्ल्याने प्रवासादरम्यान त्रास होऊ शकतो.
* प्रवास करताना फक्त हलके अन्न खावे आणि मसालेदार पदार्थ टाळावेत. कारण अधिक मसाल्याचे पदार्थ खाल्याने उलटीची समस्या होऊ शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News English Title: Home remedies for vomiting during travel article news update.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x