23 February 2025 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार
x

Health first | प्रवास करताना मळमळ किंवा उल्टी होतेय तर हे करा घरगुती उपाय । नक्की वाचा

home remedies for vomiting

मुंबई २१ एप्रिल : कित्येकांना प्रवासादरम्यान मळमळ, चक्कर आणि उल्टीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बंद गाडीमध्ये सुद्धा अनेकांना डोकं दुखीचा जानवतो. त्यामुळे असे प्रवासी अनेकदा गोळ्याचा वापर करतात. हा कोणता आजार नाही तर एक स्थिती आहे. ज्यात प्रवासादरम्‍यान कान, डोळे आणि त्‍वचेकडून मेंदुला वेगवेगळे सिग्‍नल मिळतात. या कारणांमुळे चक्‍कर येते किंवा मळमळ होते. खाली दिलेल्या उपायांच्या मदतीने प्रवास करताना मन चांगले राहते आणि उलटी होत नाही. इतकेच नाही तर खाली सांगितलेल्या टिप्स प्रवासादरम्यान चक्कर येणे आणि मळमळ सारख्या समस्या दूर करण्यासाठीसुद्धा प्रभावी ठरतात.

प्रवासादरम्यान उलटी होत असेल तर हा उपाय करा

टॉफी खा-
प्रवास करताना जर तुमचे मन खराब होत असेल तर तुम्ही टॉफी अवश्य खावी. टॉफी खाल्ल्याने मन चांगले होते आणि मळमळ होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. यामुळे जेव्हा कधी तुम्ही प्रवास करत असाल तर सोबत एक टॉफी अवश्य जरूर ठेवा आणि जेव्हा तुम्हाला मळमळ होत असेल तर टॉफी अवश्य खावी.

सुगंधित वस्तू सोबत ठेवा-
मळमळ होने किंवा उलटी येत असेल तर सुघंधित वस्तूंचा वास घ्यावा यामुळे मन चांगले होते. जर तुम्ही प्रवास करत असाल तर आपल्या सोबत सुघंधित वस्तू जरूर ठेवाव्यात जसे पुदिनाची पाने किंवा गुलाबाचे फुल. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास रुमालवर मिंटच्या तेलाचे दोन तीन थेंब टाकावेत आणि जेव्हा तुमचे मन खराब होईल त्यावेळी रुमालाचा वास घ्यावा.

चहा प्यावा-
प्रवास करताना जर मन खराब होत असेल तर तुम्ही अदरक किंवा लवंगाचा चहा प्यावा. अदरकचा चहा पिल्याने मन ठीक होते आणि उलटीपासून आराम मिळतो. चहा शिवाय तुम्ही लिंबाचा रस सुद्धा पिऊ शकता.

संत्रे खावे-
संत्री खाल्याने मन एकदम हलके होते आणि तोंडाची चव देखील चांगली होते. यामुळे प्रवास करताना तुम्ही तुमच्यासोबत संत्री जरूर ठेवावीत आणि मन खराब झाल्यास संत्रे खावीत. संत्री खाल्याने तुमचे मन एकदम चांगले होईल.

या गोष्टी लक्षात ठेवा मन खराब होणार नाही

जर प्रवास करताना खाली सांगितलेल्या गोष्टींवर लक्ष दिले तर उलटी किंवा मन खराब होण्याच्या समस्येपासून वाचू शकतो

विंडोच्या सीटवर बसण्याने मन खराब होत नाही आणि उलट्यांचा त्रास देखील होत नाही. म्हणून जेव्हा आपण प्रवास करता तेव्हा नेहमीच विंडो सीट घेण्याचा प्रयत्न करावा.

प्रवास करताना अनेक लोकांना मोबाईल गेम खेळण्याची सवय असते. जी चुकीची आहे. कारण प्रवासादरम्यान मोबाईल वर गेम खेळण्याने चक्कर येऊ लागते आणि मन खराब होऊ लागते. मोबाइलप्रमाणेच कारमध्ये प्रवास करताना तुम्ही लॅपटॉपवर काम करू नये किंवा पुस्तक वाचू नये.

कोणत्याही प्रवासाला जाण्यापूर्वी आपल्या खान-पानाची विशेष काळजी घ्यावी. कारण चुकीचे अन्न खाल्ल्याने प्रवासादरम्यान त्रास होऊ शकतो.

प्रवास करताना फक्त हलके अन्न खावे आणि मसालेदार पदार्थ टाळावेत. कारण अधिक मसाल्याचे पदार्थ खाल्याने उलटीची समस्या होऊ शकते.

 

News English Summary: Many experience nausea, dizziness, and vomiting during the journey. Even in a closed car, many feel headaches. So such travelers often use the pill. It is not a disease but a condition. In which the brain receives different signals from the ears, eyes and skin during the journey. These causes cause dizziness or nausea.

News English Title: Home remedies for vomiting during travel news update article

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x