22 April 2025 7:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Health First | बाळांचे चोंदलेले नाक | काही घरगुती उपाय - नक्की वाचा

Home remedies on cold children's

मुंबई, ०३ जुलै | नाक चोंदलेले असल्यास ते एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अडथळा ठरू शकते यामुळे श्वास घेणे कठीण होते आणि वाहणाऱ्या नाकामुळे निराशा येऊ शकते त्याच प्रमाणे बाळांना सुद्धा नाक चोंदलेले असल्यास बरीचशी अस्वस्थता येते त्यामुळे त्यांना रात्रीची झोप नीट लागत नाही. बाळांना काय त्रास होतो आहे हे ते व्यक्त करू शकत नसल्यामुळे अवरोधित नाकाची लक्षणे ओळखणे आणि त्यानुसार त्यावर उपाय शोधणे हे तुमच्यावर अवलंबून आहे.

बाळाचे नाक चोंदणे म्हणजे काय?
सामान्यतः नाकातील उतीना सूज आल्यामुळे किंवा जळजळ होण्यामुळे बाळाचे नाक चोंदते त्यामुळे जास्त श्लेष्माचा स्त्राव होतो. गर्भाशयात गर्भजलामुळे नवजात बाळांमध्ये पहिल्या काही दिवसांकरिता बाळाचे नाक चोंदलेले असू शकते बाळे शिंकण्याद्वारे चोंदलेल्या नाकापासून सुटका करण्याचा प्रयत्न करतातआपल्या बाळाच्या चोंदलेल्या नाकामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो विशेषतः बाळे आणि लहान मुले त्यांच्या नाकाने श्वास घेऊ शकत नाहीत.

घरगुती उपचार:

बाळाला वाफ घेतल्याने होणारे फायदे:
सर्दी झाली की नाक खूप बेजार करते. आपल्या मोठ्या लोकांना इतका त्रास होतो तर त्या लहान जीवाला सुद्धा किती त्रास होत असेल, अशावेळी श्वसन नलिकेतील म्युकस मोकळे करण्यासाठी वाफ देणे हा सर्वाधिक रामबाण उपाय ठरतो. बाळाच्या खोलीत फेशियल स्टीमर किंवा वेपोराइजरच्या मदतीने वाफ पसरवा. ६ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळासाठी बाथरूम मध्ये गरम पाणी नळातून वाहू द्या आणि बाळाला बाथरूम मध्ये १० ते १५ मिनिटे घेऊन बसा. बाळ १ वर्षापेक्षा मोठे असेल तर गरम पाण्यात यूकेलिप्‍टस ऑयलचे काही थेंब टाकून त्याचा वापर करता येतो.

खारट पाण्याच्या गुळण्या:
जर बाळ दोन वर्षापेक्षा जास्त वयाचे असेल तर पाण्याच्या गुळण्याचा उपाय अवश्य वापरून पहावा. यासाठी एक कप कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकावे आणि बाळाला त्या पाण्याच्या गुळण्या करायला सांगाव्यात. पण यासाठी तुम्ही मुलाला गुळण्या करायला आधी शिकवले असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही त्याला करून दाखवा अथवा पहिले त्याला साध्या पाण्याने गुळण्या करायला सांगा. हा उपाय अतिशय रामबाण आणि सोप्पा असल्याने तुम्ही कधीही करू शकता.

कोमट पाणी:
६ महिने वयाच्या बाळाला उकळलेले पाणी पाजावे. पण हे पाणी जास्त गरम असू नये तर कोमटच असावे अन्यथा बाळाचे तोंड भाजू शकते. सर्दी झाल्यास बाळाला सतत हे पाणी पाजत राहावे यामुळे शरीर हाइड्रेट राहते. हे पाणी जेव्हा शरीराबाहेर टाकले जाते तेव्हा त्यासोबत विषारी तत्वे सुद्धा बाहेर पडतात. ६ महिन्यांपेक्षा लहान बाळाला सर्दी पासून आराम देणारा हा अतिशय गुणकारी उपाय आहे.

मोहरीचे तेल:
एक वर्षे वयाच्या बाळासाठी सर्दीवर उपाय म्हणून मोहरीचे तेल सुद्धा वापरले जाऊ शकते. एक चमचा मोहरीचे तेल घ्या आणि त्यात एक लसूण पाकळी आणि लवंग टाकून शक्य असल्यास एक चिमुटभर आजवाईन पावडर मिसळा. या सर्व गोष्टींचे मिश्रण एक मिनिटे पर्यंत गरम करून घ्या. लसूण पूर्णपणे करपू देऊ नका. आता गाळणी घेऊन हे मिश्रण गाळून घ्या. हे मिश्रण कोमट झाले की बाळाची छाती आणि पाठीवर मालिश करावी.

मध:
मधामध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट गुणधर्म रात्रीचा होणारा खोकला, गळ्यातील इन्फेक्शन किंवा खोकला आणि सर्दी तसेच यामुळे वारंवार होणारी झोपमोड यावर रामबाण ठरतात. एक वर्षे वयापेक्षा कमी बाळाला मात्र मध देऊ नये. बाळाचे वय एक वर्षापेक्षा जास्त असेल तर रात्री त्याला झोपण्याआधी एक चमचा मध चाटायला द्यावे. तर मंडळी हे आहेत काही साधे सोपे उपाय जे तुमच्या बाळाला सर्दीपासून आराम मिळवून देऊ शकतात. हि माहिती आपल्या मित्रमंडळीपर्यंत पोहचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अमुल्य माहिती मिळून त्याच्या घरातील बाळाला अचानक सर्दी झाल्यास ते यापैकी एक घरगुती उपचार वापरू शकतात. जर हे उपचार वापरून सुद्धा फरक पडला नाही तर मात्र जास्त वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क साधावा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Article Disclaimer: आरोग्य विषयक आर्टिकलमध्ये दिलेले उपाय हे सामान्य मार्गदर्शन आणि माहिती आहे. याचा उपयोग करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

News Title: Home remedies on cold of children’s in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या