Health First | कोरडा खोकला दूर करण्यासाठी ६ घरगुती उपाय - नक्की वाचा

मुंबई, १० जुलै | सर्दी-खोकला हा नेहमीच होणारा आजार आहे. सर्वसाधारणपणे सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे सर्दी-खोकला होत असतो. खोकल्यामुळे घसा दुखणे, घशाला सूज येणे, ताप येणे यांसारखे त्रास होत असतात. त्याशिवाय खोकल्यामुळे डोकेदुखी, अंगदुखीही होत असते. या समस्येपासून सुटका होण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधं घेत असतात. परंतु अनेकदा याचा परिणाम तात्पुरता होत असतो. त्यामुळे अशा हवामान बदलामुळे नेहमी खोकला होत असल्यास काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.
या घरगुती उपायांनी केवळ खोकलाच नाही तर शरीरातील इतर समस्यांवरही फायदा होत असतो. या उपायांमुळे शरीराला कोणतंही नुकसान पोहचत नाही. त्यात सर्दी आणि तापामुळे खोकल्याचा त्रास अधिक बळावतो. त्यातही कोरडा खोकला त्रासदायक असतो. योग्य वेळेत यावर उपाय केल्यास तुम्हाला आराम मिळेल. पण दुर्लक्ष केलं तर प्रकृती गंभीर देखील होऊ शकते.
मध:
कोरड्या खोकल्यावर मधाचे सेवन करणं हा रामबाण उपाय मानले जाते. मधामुळे घशातील खवखव कमी होते. तसंच घशामधील संसर्गही दूर होतो. कोरडा खोकला कमी करण्यासाठी छोट्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिक्स करा. मध आणि पाणी नीट मिक्स झाल्यानंतर ते प्या. नियमित हा उपाय केल्यास कोरड्या खोकल्यापासून तुम्हाला आराम मिळेल.
आले आणि मीठ:
खोकला कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून आल्याचा फार पूर्वीपासून वापर केला जात आहे. आल्याचा छोटा तुकडा कुटून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा. हे मिश्रण आता आपल्या दाढेखाली ठेवा आणि त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्यावा. पाच मिनिटांनंतर आले बाहेर फेका आणि कोमट किंवा साध्या पाण्याने गुळण्या करा. पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ आले तोंडामध्ये ठेवू नका.
ज्येष्ठमधाचा चहा:
ज्येष्ठमधाचा चहा प्यायल्यानंतर कोरडा खोकला कमी होतो. हा चहा तयार करण्यासाठी कपभर पाण्यामध्ये दोन मोठे चमचे ज्येष्ठमधाची पावडर उकळत ठेवा. १० ते १५ मिनिटे पाणी उकळू द्या. यानंतर कपामध्ये चहा गाळून घ्या. तुम्हाला हवे असल्यास चहामध्ये मध मिक्स करू शकता. दिवसातून दोन वेळा हा चहा तुम्ही पिऊ शकता.
हळदीचे दूध:
हळदीचे दूध प्यायल्याने केवळ खोकलाच नाही तर कित्येक आजारांपासून तुमची सुटका होण्यास मदत मिळते. एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून नियमित प्या. तुमचा कोरड्या खोकल्याचा त्रास काही दिवसात कमी होईल. हळदीमध्ये कर्रक्युमिन नावाचे घटक असते. या घटकामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी संबंधित कित्येक आजारांचा त्रास कमी होतो.
गूळ:
सर्दी आणि खोकल्यावर गूळ खाणे हा प्रभावी उपाय आहे. गुळातील पोषक घटकांमुळे जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत मिळते. सर्दी खोकल्याव्यतिरिक्त गुळामुळे पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतात. कोमट पाण्यामध्ये गूळ पावडर मिक्स करा आणि प्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रमाण आणि दिवसातून किती वेळा हा उपाय करावा, याबाबत सल्ला घ्यावा.
मिठाच्या पाण्याच्या गुळण्या:
एका मोठ्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मीठ मिक्स करा. या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून दोन वेळा हा उपाय करावा. खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानं श्वसन नलिकेतील संसर्ग दूर होण्यास मदत मिळते. शिवाय खोकल्यामुळे घशामध्ये होणाऱ्या वेदनाही कमी होतात.
गरम पाण्याची वाफ:
सर्दी खोकल्यामुळे कधी कधी आपल्याला श्वास घेणे देखील कठीण होते. अशा वेळेस गरम पाण्याची वाफ घ्यावी. गरम पाण्याच्या वाफेमुळे कफ बाहेर पडतो. श्वासोच्छवास करताना होणाऱ्या अडचणी दूर होतात. तसंच चेहऱ्यावरील रोम छिद्रांमध्ये जमा झालेली धूळ, माती आणि दुर्गंध देखील बाहेर फेकली जाते. पण आठवड्यातून दोन वेळाच हा उपाय करावा. अन्यथा चेहऱ्याच्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Home remedies on cough in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO