Home Remedies on Headache | डोके जड होण्याची कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई, २४ जुलै | डोकेदुखी ही एक अनेकांच्या बाबतीत आढळणारी समस्या आहे. अनेकदा सततच्या ताणामुळे, थकवा आल्यामुळे अथवा तब्येत बरी नसल्यामुळे, पोटाशी संबंधित विकारामुळे, खूप वेळ डोळ्यांवर ताण आल्यामुळे अथवा मोठे आवाज सतत कानावर पडल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो. सोपे घरगुती उपाय केल्यावर अनेकदा डोकेदुखी (Home Remedies on Headache) बरी होते.
Home Remedies on Headache. Headaches are often caused by constant stress, fatigue or poor health, stomach disorders, prolonged eye strain, or loud noises :
डोळे तपासा, चष्मा लागला असेल अथवा चष्म्याचा नंबर बदलला असेल तर डोकेदुखी होऊ शकते. तसेच दातदुखी, कानदुखी अशा समस्या सतावत असताना त्यांच्या जोडीने काही वेळा डोकेदुखी होते. पण मूळ समस्या बरी होताच डोकेदुखी बरी होते हे लक्षात ठेवा. पण तसे झाले नाही अथवा वारंवार डोकेदुखीचा त्रास होऊ लागला तर वैद्यकीय सल्ला घ्या.
डोके जड होणे यावर हे करा घरगुती उपाय :
* आल्याचा तुकडा चावून खावा.
* काही लवंगा घेऊन त्या तव्यावर भाजून गरम कराव्यात. त्यानंतर एका रुमालात त्या गरम लवंगा घालून त्यांचा वास हुंगल्यास डोके जड झाल्याने होणारी डोकेदुखी कमी होते.
* वेखंड, सुंठ किंवा दालचिनीची पेस्ट करून ती कपाळावर लावावी.
* आयुर्वेदिक अणू तेलाचे दोन थेंब नाकपुडीत घालावे. डोके जड पडणे यावर हे गुणकारी औषध आहे.
* आपल्या हाताचा अंगठा आणि तर्जनीमध्ये असणाऱ्या जागेत हलकासा दाब देऊन मसाज करावा. ह्या अॅक्युप्रेशर उपायामुळेही डोके जड झाल्यास आराम मिळतो.
डोके जड होऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी:
* संतुलित आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश करा. ज्यादा वेळ उपाशी राहू नका.
* दिवसभरात भरपूर पाणी म्हणजे किमान 7 से 8 ग्लासतरी पाणी प्यावे.
* दररोज सकाळी उठल्यावर ग्लासभर गरम पाणी प्यावे.
* मसालेदार पदार्थ, तेलकट–तिखट-खारट पदार्थ, फास्टफूड ह्यासारखे पदार्थ वारंवार खाणे टाळावे.
* चहा-कॉफी वारंवार पिणे टाळा.
* स्मार्टफोन, काम्प्युटर, टीव्हीसमोर सतत बसू नका.
* जागरण करणे टाळा. दररोज किमान 6 तासांची झोप आवश्यक असते. पुरेशी झोप घ्यावी.
* नियमित व्यायाम करावा. मोकळ्या हवेत फिरायला जावे.
* मानसिक ताणतणाव, चिंता यापासून दूर रहा. मन शांत ठेवण्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करावी.
* तंबाखू, गुटखा, सिगरेट, बीडीचे व्यसन करणे टाळा.
* डोके जड होऊन डोके दुखत असल्यास वरचेवर वेदनाशामक औषधे घेणे टाळा.
News Title: Home remedies on headache in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | शेअरमध्ये जबरदस्त घसरगुंडी, गडगडतेय शेअर प्राईस, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IREDA
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON