Health First | स्ट्रेच मार्क्स? | आता चिंता सोडा आणि ह्या टिप्स वापरून पहा - नक्की वाचा
मुंबई , ११ सप्टेंबर | आजकाल वजन वाढणे हि समस्या इतकी मोठी झाली आहे कि चार लोकांच्या मागे दहा लोकांना हि समस्या आहेच. म्हणा वजन वाढण्यामागे अनेको कारणे असतात. पण मग वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी हीच लोक नाही नाही ते उद्योग आणि प्रयोग करताना दिसतात. मग यासाठी खूपवेळा जिममध्ये घाम गाळणे असेल नाहीतर पद्धतीशीर डाएट करणे असेल. अश्या कोणत्या ना कोणत्या मार्गांचा अवलंब करून वजन कमी केले जाते. पण वजन कमी करण्यासोबत आणखी एक समस्या भेडसावते आणि हि समस्या म्हणजे वजन कमी करताना स्ट्रेच मार्क्स येणे.
स्ट्रेच मार्क्स? आता चिंता सोडा आणि ह्या टिप्स वापरून पहा – Home remedies on stretch marks in Marathi :
हि समस्या स्वाभाविकपणे कितीही सर्वसामान्य असली तरीही दिसताना थोडे विचित्र दिसते त्यामुळे एक भलताच न्यूनगंड बाळगला जातो. म्हणून आता न्यूनगंड बाळगण्याची किंवा चिंता करण्याची काहीही गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला काही अश्या हलक्या फुलक्या टिप्स म्हणा किंवा उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे स्ट्रेच मार्क्सची समस्या तुम्हाला त्रास देणार नाहीत.
वजन कमी करा पण हळूहळू:
पटकन वजन कमी केल्यामुळे त्वचेची इलॅस्टिसिटी कमी होते. कारण त्वचेच्या वरील थरात म्हणजेच डर्मिसमध्ये कोलेजन फायबर्सचे प्रमाण कमी होते. म्हणूनच स्ट्रेस मार्क्सवर मात करायची असेल तर वाढते वजन हळूहळू कमी करा.
दररोज स्ट्रेचिंग करायला विसरू नका:
दैनंदिन जीवनात कितीही गडबड असली कितीही व्यग्रता असली तरीही दररोज हलकं स्ट्रेचिंग कराच. कारण त्यामुळे रक्तप्रवाह आणि त्वचेची इलॅस्टिसिटी सुधारते. परिणामी स्ट्रेच मार्क्सला आळा बसतो.
How to remove stretch marks permanently :
व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा:
त्वचेचे टिशू सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ए चा फायदा होतो. याशिवाय व्हिटॅमिन सी मुळे कोलेजनची निर्मिती प्रक्रिया सुधारते. यासाठी आहारात या व्हिटॅमिन्सचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या व्हिटॅमिन्सच्या संतुलनाचा फायदा स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी होतो.
भरपूर पाणी प्या:
भरपूर पाणी प्यायल्याने आपले शरीर नेहमी हायड्रेट राहते आणि हे गरजेचे आहे. कारण शरीराच्या डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. परिणामी त्वचेची इलॅस्टिसिटी कमी होते आणि स्ट्रेच मार्क्स वाढण्याची शक्यता असते. म्हणून प्रत्येकाने दररोज ८ ग्लास पाणी प्यावे यामुळे स्ट्रेच मार्क्सची समस्या त्रास देणार नाही.
स्किन क्रीम किंवा लोशनचा वापर करा:
स्किन क्रीम किंवा बॉडी लोशन वापरल्यामुळे शरीरातील कोलेजनचे प्रमाण वाढेल आणि आपोआपच स्ट्रेच मार्क्सला आळा बसेल. पण कोणतेही स्किन क्रीम आणि लोशन आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरा.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Home remedies on stretch marks in Marathi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Dimple Kapadia | अभिनेत्री डिंपल कपाडियाने स्वतःच्याच लेकीचा केला अपमान, म्हणाली, 'मी कोणत्याही ज्युनिअरसोबत पोज देत नाही'
- Dharmveer 2 OTT | 'धर्मवीर 2' ओटीटीवर प्रदर्शित, नेमका कुठे दिसेल चित्रपट जाणून घ्या
- Smart Investment | आयुष्य बदलण्यासाठी 442 रुपयाचा 'हा' फॉर्मुला कामी येईल, 1-2 नव्हे तर 5 करोडचे मालक व्हाल - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 45% पर्यंत परतावा - NSE: TataMotors
- Post Office Scheme | योजनेत गुंतवा केवळ 500 रुपये आणि मिळवा 2 लाख रुपयांचा तगडा फंड, कॅल्क्युलेशन समजून घ्या
- Smart Investment | धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर करा गुंतवणुकीची सुरुवात, केवळ 3 हजाराच्या गुंतवणुकीमुळे बनाल करोडपती