18 April 2025 9:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Health First | मान काळी पडत असेल तर घरगुती उपाय | सविस्तर वाचा

black neck health

मुंबई, १६ सप्टेंबर | अनेक वेळा दुर्लक्ष केल्याने, किंवा उन्हाने, खोटे दागिने घातल्याने मान काळी पडते. मग खूप काही करूनही डाग निघत नाही, चेहरा छान दिसतो, पण मान काळी दिसत असल्याने चिंता वाटते, तेव्हा यावर काही घरगुती उपाय केले, तर ही समस्या सोडवता येते.

मान काळी असली तर चेहरा कितीही गोरा आणि आकर्षक असो, सुंदरता फिकी पडते. काही लोकं रोज अंघोळ करताना खूप मान घासतात तरी काही परिणाम हाती लागत नसून मान लाल होऊन जाते. आज आम्ही आपल्याला सांगू असे काही सोपे उपाय ज्याच्या मदतीने आपण काळी मान स्वच्छ करू शकतात. या वस्तू आपल्या सहजपणे घरात उपलब्ध होऊन जातील.. पहा हे सोपे उपाय:

घरगुती पण महत्वाचे उपाय:
एका बाऊलमध्ये १ चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात अर्था चमचा दही मिसळून पेस्ट तयार करा. दह्यात लॅक्टिक अॅसिड असतं, ज्याने त्वचा उजळण्यात मदत मिळते. दह्याऐवजी पाणीही वापरू शकता. बेकिंग सोडा, लिंबू आणि नारळाचे तेल मिसळून तयार केलेली पेस्ट लावल्याने काळ्या मानेची समस्या दूर होईल. मात्र मानेवर किंवा त्याच्या जवळपासच्या त्वचेवर जखम असल्यास बेकिंग सोडा लावू नये. अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो.

नारळाच्या तेलाने त्वचेवरील घाण निघून जाते आणि रंध्रे स्वच्छ होतात. या पेस्टमध्ये नारळाच्या तेलाचे काही थेंब टाकून याला मिक्स करा.

हलका लेयर लावून वाळल्यावर पाण्याच्या मदतीने राउंड स्क्रब करत पाण्याने पॅक काढा. यामध्ये मानेवरील मळ निघून जाण्यास मदत होते. आता पॅक लावण्यापूर्वी आधी पॅच टेस्ट करून पहा. हे पॅक हातावर लावून थोड्या वेळ वाट बघा. काही रिऍक्शन होत नसेल तरच हा पॅक मानेवर लावा. एक नरम टॉवेल गरम पाण्यातून काढून व्यवस्थित पिळून घ्या. या टॉवेलने मानेच्या जवळपासची जागा रगडून स्वच्छ करून घ्या टॉवेलमधून निघत असलेल्या वाफेने रंध्रे खुलतील. थोड्या वेळाने याठिकाणी मॉईश्चरायजर लावा.

बटाट्याचा रस:
बटाट्याच्या रसाने त्वचेचा रंग हलका होतो. कच्चा बटाटा किसून मानेवर लावावा. किंवा किसलेल्या बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस मिसळून मानेवर लावा आणि 20 मिनिटाने गार पाण्याने धुवावा.

डायबेटीसची सुरूवात तर नाही ना?
यात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, घरगुती उपाय केल्यावरही काळा डाग निघत नसेल, तर डॉक्टरांना भेटा, अनेक वेळा डायबेटीसची सुरूवात असताना मान काळी पडण्यास सुरूवात होते, तेव्हा रक्ताची चाचणी करून घेणे देखील फायदेशीर असते.

 

News English Summary: Many times neglect, or the sun, wearing fake jewelry makes the neck black. Then the stain does not go away even after doing a lot, the face looks nice, but the neck looks black, so there is anxiety, so if you do some home remedies, this problem can be solved.

News English Title: Home remedies to get rid of black neck health news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या