Health First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी
मुंबई, १५ जुलै | मासिकपाळीचे दिवस जवळ आले की अनेक स्त्रियांना ते नकोसे वाटते. मासिकपाळीच्या दिवसांमध्ये होणार्या वेदनांमुळे जशी चिडचिड होते तसेच मासिकपाळीच्या दिवसांमध्ये चेहरा निस्तेज होणं, पिंपल्स वाढणं हा त्रास अधिक बळावतो. नेहमीच्या पिंपल्सपेक्षा मासिकपाळीच्या दिवसात हार्मोनल बदलांमुळे वाढणारे पिंपल्स अधिक त्रासदायक असतात. ते त्वचेचे अधिक नुकसान करतात. वाढत्या वयानुसार तारुण्यापासून सुरू झालेला हा पिंपल्सचा त्रास वयासोबत वाढत जातो. परिणामी चेहर्याचे अनेक प्रकारे नुकसान होते. (How to prevent from hormonal acne with Ayurveda diet during pregnancy in Marathi news updates)
घरगुती उपायांपासून ते अगदी केमिकल पिल्स, बेंझॉल पेरॉक्साईड, सायक्लिक अॅसिड या सारख्या महागड्या आणि केमिकलयुक्त पर्यायांचा वापर करूनदेखील पिंपल्सचा त्रास कमी होत नाही. अशावेळी अनेकदा आयुर्वेदीक उपचारांची मदत घेतात. आपण काय खातो यावर आपले सौंदर्य अधिक अवलंबून असते. त्यामुळे मासिकपाळीच्या दिवसात स्त्रियांच्या शरीरात होणार्या बदलांमुळे वाढणारी अॅक्नेची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेले हे आहाराचे पथ्यपाणी नक्की पाळून पहा.
हार्मोनल अॅक्नेचा त्रास वाढण्यामागे आहार कारणीभूत असू शकतो का ?
आयुर्वेदानुसार, आहाराचा परिणाम निश्चितच सौंदर्यावर दिसून येतो. प्रत्येक व्याधीचे मूळ हे पोटाशी निगडित असते. मासिकपाळीच्या दिवसात हॉर्मॉनल अॅक्नेचा त्रास हमखास जाणवत असेल तर नक्कीच शरीरात हार्मोनल इन्बॅलन्स असल्याचे संकेत मिळतात. खाण्याच्या चूकीच्या सवयींमुळे हा त्रास अधिक वाढतो. डॉ. भागवती यांच्या सल्ल्यानुसार, काही पदार्थांचा आहारात समावेश केल्याने पचनक्रियेमध्ये बिघाड होतो. मैद्याचे पदार्थ,कॉफी यांचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास शरीरात घातक आणि विषारी घटकांचे प्रमाण वाढते. तसेच मसालेदार,खारट,आंबट पदार्थदेखील शरीरात पित्तदोष आणि मेटॅबॉलिक रेटचे असंतुलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. यामुळे शरीरात हार्मोन्सचेदेखील असंतुलन वाढते. चेहर्यावर पिंपल येण्याच्या जागेवरून ओळखा त्यामागील कारण
हार्मोनल अॅक्नेचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात काय असावे ?
तुमच्या आहारात फळं,सुकामेवा, भाज्या यांचा समावेश मुबलक असणं गरजेचे आहे. यामुळे हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते. डॉ. भागवतींच्या सल्ल्यानुसार, आहारात काय असावे हे जाणून घेण्यासाठी खास डाएट प्लॅन –
फळं:
सफरचंद, केळं, पेर आणि अंजीर
भाज्या:
कोबी, फ्लॉवर, पालेभाज्या, रताळं,भेंडी, हिरवे वाटाणे
फॅट्स:
खोबरेल तेल ( यामध्ये lauric acid मुबलक असते. ज्यामुळे त्वचेचे नुकसान भरून निघते तसेच हार्मोन्सच्या निर्मितीला चालना मिळते.) व तूप
मसाले:
जिरं, लेमनग्रास, केशर, वेलची,बडीशेप आणि पुदीना
पेय:
बदामाचं दूध, नारळपाणी
काय खाणं टाळाल ?
फळं:
द्राक्षं, चिंच, पिच, आंबट सफरचंद खाणं टाळा.
फॅट्स:
तिळाचं तेल, मक्याचं तेल
भाज्या:
चिली पेपर्स, वांगं,ऑलिव्ह, कच्चा कांदा,मूळा,टोमॅटो,गाजर
मसाले:
मिरच्या, राई, सुंठ,लवंग, लसूण
पेय:
चहा,कॉफी, फिझी ड्रिंक्स, अल्कोहल
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: How to prevent from hormonal acne with Ayurveda diet in Marathi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती