27 December 2024 8:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Health First | आरोग्याच्या दृष्टीने भारतीय टॉयलेट चांगले की वेस्टर्न टॉयलेट? - वाचा सविस्तर

India Toilets Vs Western Toilets

मुंबई, २३ जून | इंडियन टॉयलेट चांगले की, वेस्टर्न टॉयलेट या वाद तर नेहमीच उद्भवत असतो. कित्येक वर्षांपासून आपण भारतीय टॉयलेटचा वापर करत आलो आहोत, मात्र जेव्हा वेस्टर्न टॉयलेट ही संकल्पना समजली तेव्हा जास्त त्रास अथवा कटकट नको म्हणून भारतीयदेखील वेस्टर्न टॉयलेटला प्राधान्य देऊ लागले.

मात्र मूळ मुद्दा तिथेच राहतो की तुमच्या स्वास्थ्यासाठी दोहोंपैकी कोणते टॉयलेट फायदेशीर आहे. सर्व गोष्टींचा विचार केला, याबाबतीत झालेला रिसर्च पाहिला तर वेस्टर्नपेक्षा भारतीय टॉयलेट हे फायदेशीर असल्याचे आढळले आहे. कोणत्याही गोष्टींचा विचार न करता आपण आपल्या जीवनात पाश्चिमात्य लाइफस्टाइलचा अवलंब करीत आहोत, तुम्हीही हे करत असला तर हा लेख नक्की वाचा.

* भारतीय टॉयलेट तुमच्या शरीराच्या व्यायामासाठी चांगले आहे. बसताना तुमचा पूर्ण ताण तुमच्या पायांवर असतो. त्यामुळे पायांचे स्नायू ताणले जातात. तसेच तुमच्या तळपायांचाही व्यायाम होतो. अशा प्रकारे बसल्याने तुमचे रक्ताभिसरणही योग्य प्रकारे होते. याउलट वेस्टर्न टॉयलेटमध्ये तुम्ही एखाद्या खुर्चीवर बसल्यासारखे बसता. त्यामुळे शरीराला कोणताही व्यायाम मिळत नाही.

* गरोदर महिलांनी इंडियन टॉयलेटचा वापर केल्याने त्यांच्या गर्भाशयावर ताण पडत नाही, यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्याची संभावना अधिक असते.

* शारीरिक स्वच्छतेसाठीही भारतीय टॉयलेट चांगले आहे. वेस्टर्न टॉयलेटमध्ये तुमचे शरीर कमोडच्या सानिध्यात येते. त्यामुळे युरीन इन्फेक्शनचा धोका अधिक असतो.

* वेस्टर्न टॉयलेटचा वापर करणारे लोक स्वच्छतेसाठी टॉयलेट पेपरचा वापर करतात. तर भारतीय शौचालयात पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे स्वच्छता अधिक चांगली केली जाते.

* भारतीय टॉयलेटपेक्षा वेस्टर्न टॉयलेटमध्ये पाण्याचा अपव्यय अधिक होतो. कमीत कमी 2-3 वेळा फ्लश करावे लागते त्यासाठी भारतीय टॉयलेटपेक्षा जास्त पाणी लागते.

* भारतीय शौचालयाचा वापर करुन आपली पचनक्रिया चांगली होते. असे बसल्याने पोटावरील दाब योग्य पद्धतीने वाढतो आणि त्यामुळे योग्यप्रकारे तुम्ही शौच करु शकता.

* पर्यावरणाचा विचार करताही भारतीय टॉयलेटचा चांगले आहे. वेस्टर्न टॉयलेटमध्ये तुम्हाला पेपरचा वापर करावा लागतो यामुळे भरपूर प्रमाणात वृक्षतोड केली जाते. त्याऐवजी भारतीय टॉयलेटमध्ये पाण्याचा वापर होतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: India Toilets Vs Western Toilets health benefits news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x