Health First | इन्फ्लुएन्झाची लस घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन... पण कोणासाठी? - वाचा सविस्तर
मुंबई, २४ जून | रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मान्सून सुरू होण्याआधी इन्फ्लुएन्झाची लस घेण्याची शिफारस महाराष्ट्राचे कोव्हिड-१९ टास्कफोर्स आणि बालरोगतज्ज्ञांचा समावेश असलेल्या टास्कफोर्सने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या व्हर्च्युअल बैठकीमध्ये केली. या लसीचा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्याची शिफारसही टास्कफोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी केली. असे केल्याने एकूणच फ्लूच्या घटनांना आळा बसू शकेल तसेच तिस-या लाटेची आशंका वर्तवली जात असताना सारख्याच लक्षणांमुळे कोव्हिड-१९ आणि फ्लू यांच्यामध्ये गल्लत होणार नाही.
इन्फ्लूएन्झा लसीकरणाबाबत पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथील पेडिएट्रिक्स प्रोफेसर डॉ. संपदा तांबोळकर म्हणाल्या, या प्रादुर्भावामुळे आपल्याला आरोग्याला प्राधान्य देण्याची मोठी शिकवण मिळाली आहे. म्हणूनच लसीकरणासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना लसीमुळे प्रतिबंध करता येण्यासारख्या आजारांविरोधात राबवल्या पाहिजेत. लसीकरणामध्ये विलंब ही देखील वाढती समस्या आहे आणि विशिष्ट डोसेस घेण्याच्या कालावधीवर परिणाम झाल्यामुळे १ वर्षांखालील मुले असुरक्षित झाली आहेत. वेळेवर प्राथमिक लसीकरण केल्यास त्यांचे आजारांपासून संरक्षण होऊ शकेल.
इन्फ्लूएन्झा व कोविड या आजारांमध्ये ताप, सर्दी व खोकला यांसारखी समान लक्षणे आढळून येतात. पण इन्फ्लूएन्झा लस इन्फ्लूएन्झा आजाराला प्रतिबंध करते, कोविडला नाही. बहुतांश इन्फ्लूएन्झा केसेस पावसाळ्यादरम्यान आढळून येतात आणि प्रादुर्भाव विशेषत: कोविड-१९ काळादरम्यान अनावश्यक हॉस्पिटल खर्च व चाचणीसह आरोग्य पायाभूत सुविधांवर तणाव निर्माण करेल.
म्हणूनच पावसाळा सुरू होण्यापूर्वी ६ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना, तसेच सीओपीडी, दमा, मधुमेह असे कोमोर्बिड आजार असलेल्या व्यक्तींना आणि डॉक्टरांशी सल्लामसलत करत कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना देखील इन्फ्लूएन्झा लस घेण्याची शिफारस करण्यात येत आहे.
पालकांनी आपल्या मुलांचे लहानपणीच लसीकरण करण्यास प्राधान्य द्यावे असा सल्लाही तज्ज्ञ मंडळी देतात, कारण ती एक अत्यावश्यक आरोग्य सेवा आहे. मुलांना आणि विशेषत्वाने लहान बाळांना डिप्थेरिया, टिटॅनस, पर्ट्युसिस, हेपटायटीस बी, पोलियोमायलिटीस आणि एच. इन्फ्लुएन्झा टाइप बी यांसारख्या आजारांविरोधात संरक्षक कवच पुरविण्यासाठी देण्यात येणा-या प्राथमिक लसी तर लवकरात लवकर दिल्या पाहिजेत.
लसीकरणाला विलंब झाला तर त्यामागोमाग द्यायच्या लसीच्या डोसांचे वेळापत्रक कोलमडू शकते. असे झाल्यास एरवी वेळच्यावेळी लस दिल्याने मुलांना ज्या आजारांपासून संरक्षण मिळाले असते ते आजार त्यांना होण्याची शक्यता वाढते कारण त्यांना संरक्षणच मिळेल.
कोव्हिड-१९ ने लसीकरणाचे महत्त्व कधी नव्हे इतकी ठळकपणे आपल्यासमोर आणले आहे, तरीही अनेक जण इन्फ्लुएन्झासारख्या लसीकरणाद्वारे अटकाव करता येण्याजोग्या आजारांविरोधात प्रतिबंधात्मक यंत्रणा म्हणून लस घेण्यास टाळाटाळ करत असतात. फ्यूची लक्षणांची तीव्रता ही हवामानावर अवलंबून असते, त्यामुळे हा एक मोसमी आजार ठरतो.
भारतामध्ये उन्हाळा आणि मान्सूनदरम्यान इन्फ्लुएन्झाच्या रुग्णांची संख्या कळस गाठते. भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेने पॅनडेमिकविरोधात सुरू असलेल्या लढ्यामध्ये सहभागी होणे, ज्या आजारांना अटकाव होऊ शकतो अशा आजारांच्या प्रतिबंधासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे ही काळाची गरज आहे. इन्फ्लुएन्झा लस ही इन्फ्लुन्झाविरोधात अशी प्रतिबंधात्मक यंत्रणा खात्रीने पुरवू शकते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: Influenza vaccine for India child during rain season news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम