22 February 2025 7:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

कोरोना नव्या स्ट्रेनचा परिणाम | ऑस्ट्रेलियात निर्बंध लागू | जपानमध्ये आणीबाणी

Japan Emergency, Australia, Lockdown

मुंबई, ८ जानेवारी: राज्यासह देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा सराव (ड्राय रन) शुक्रवारी घेतला जात आहे. देशात कोरोना लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. याबाबत गुरुवारी केंद्राने सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘राज्यांनी आपली सज्जता ठेवावी. लसीची पहिली खेप लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.’ केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, केंद्रशासित प्रदेशासंह १९ राज्यांना पुरवठादारांच्या माध्यमातून तर इतर १८ राज्यांना सरकारी मेडिकल स्टोअर डेपोतून कोरोना लस मिळेल. लसीच्या वाहतुकीसाठी भारतीय वायुदल आणि व्यावसायिक विमान कंपन्यांच्या विमानांचा वापर केला जाईल.

दुसरीकडे कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. नव्या स्ट्रेनमुळे करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक देशांनी निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी नवीन निर्बंध लागू केले आहेत.

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये करोना संकटामुळे तीन दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. ब्रिस्बेनमधील एका हॉटेल कर्मचाऱ्यात करोनाची लक्षणे आढळली. त्यानंतर प्रशासनाने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात केली. आगामी तीन दिवस लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

News English Summary: Concerns are being raised around the world after the discovery of a new strain of the corona. The number of coronaviruses is steadily increasing due to the new strain. Due to the growing number of coroners, many countries have begun to impose sanctions. Australian Prime Minister Scott Morrison has imposed new restrictions. A three-day lockdown has been announced in Brisbane, Australia, due to the Corona crisis.

News English Title: Japan declared a Emergency in Tokyo and Australia issue new guidelines lockdown news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x