28 January 2025 6:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Health Benefits of Kokum Juice | कोकम जूसचे आरोग्यदायी फायदे : नक्की वाचा

Health benefits of Kokum Juice

मुंबई, २४ सप्टेंबर: कोकमचा उपयोग खूप पूर्वीपासून आहारीय पदार्थाबरोबरच औषधी म्हणूनही करतात. आमटी, भाजीत याचा उपयोग केला जातो. तर अनेक आजार बरे करण्यासाठी औषध म्हणूनही याचा वापर केला जातो. कोकमला मराठीत आमसूल तर संस्कृतमध्ये साराम्ल, इंग्रजीमध्ये कोकम तर शास्त्रीय भाषेत गार्सिनिया इंडिकाया नावाने ओळखले जाऊन कोकम ही वनस्पती गटिफेरी या कुळातील आहे. याची झाडे केरळ, कर्नाटक व कोकणामध्ये पुष्कळ प्रमाणात असतात. याचे फळ जांभळट लाल रंगाचे असते. (Health Benefits of Kokum Fruit)

Health Benefits of Kokum Juice. Garcinia Indica, popularly known as Kokam, is a rich antioxidant and is well-known as a famous summer drink. Also known as Vrikshamla in Ayurveda, the Garcinia Indica plant is found in the Western Ghats in India and in the Andaman Nicobar Islands :

कोकमचा उपयोग खूप पूर्वीपासून आहारीय पदार्थाबरोबरच औषधी म्हणूनही करतात. आमटी, भाजीत याचा उपयोग केला जातो. तर अनेक आजार बरे करण्यासाठी औषध म्हणूनही याचा वापर केला जातो. कोकमला मराठीत आमसूल तर संस्कृतमध्ये साराम्ल, इंग्रजीमध्ये कोकम तर शास्त्रीय भाषेत गार्सिनिया इंडिकाया नावाने ओळखले जाऊन कोकम ही वनस्पती गटिफेरी या कुळातील आहे. याची झाडे केरळ, कर्नाटक व कोकणामध्ये पुष्कळ प्रमाणात असतात. याचे फळ जांभळट लाल रंगाचे असते.

Health-benefits-of-Kokum-Juice

Amazing Health Benefits Of Kokam (Garcinia Indica) :

  1. कोकममध्ये बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, पण त्याबरोबरच हायड्रॉक्सिसिट्रिक अॅसिड नावाचा अत्यंत महत्त्वाचा आरोग्यदायक घटक असतो. त्याचप्रमाणे मँगनीज, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम अशी खनिजेही असतात.
  2. कच्चे कोकम हे वात आणि पित्त दोषाचे निवारण करते. तर परिपक्व फळ हे कफ आणि वातदोषाचे निवारण करते. त्यामुळे कोकमाचे सेवन करणे नेहमीच चांगले.
  3. कोकममध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांमुळे गर्भिणीची प्रतिकारक्षमता वाढते. त्यामुळे गर्भावस्थेत हे अवश्य घ्यावे.
  4. कोकम सरबत पचनसंस्था सुधारण्यास मदत करते.
  5. अँटी फंगल आणि अँटिऑक्सिडंट हे गुणधर्म त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.
  6. कोकम सरबतमुळे इन्सुलिनचे नियमन करून मधुमेह आटोक्यात ठेवते.
  7. नवीन संशोधनावरून कोकम हे आंतरिक अल्सरमध्ये उपयुक्त ठरते.
  8. कोलेस्टेरॉलचे प्रमाण कायम ठेवून हृदयाचे आरोग्य कायम ठेवते. तसेच कार्डिओ टॉनिक असते. यामुळे कोकम सरबताचे सेवन केल्यास आराम मिळतो.
    शरीराचे तपमान थंड ठेवण्याचा गुणधर्म कोकममध्ये असतो.
  9. कोकम त्वचा आणि केसासाठी उत्तम असते.
  10. हायड्रो-सायट्रिक अॅसिड हा घटक प्रतिकारक्षमता वाढवून वजन कमी करण्यास देखील मदत करतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Health benefits of Kokum Juice in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x