Health first | गवती चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे
मुंबई 27 एप्रिल : हिवाळा सुरु झाला की, अनेकांना सर्दी, खोकला असे आजार सुरु होतात. यावर कितीही औषधांचा भडिमार केला तरी देखील सर्दी, खोकला काही लगेच बरा होत नाही. मात्र, त्या अँटिबायोटिकबरोबर काही आयुर्वेदिक औषधांचा त्या मनाने चांगला फायदा होतो. यामध्ये गवती चहा एक महत्त्वाचा ठरतो.म्हणून एक कप गवती चहात दडले आहेत हे गुण.
मानसिक ताणापासून आराम मिळतो
बरेचदा आपण सकाळी फ्रेश वाटण्यासाठी अथवा दिवसभरात कामाचा कंटाळा आला की थोडं रिफ्रेश होण्यासाठी चहा घेतो. मात्र जर यासाठी तुम्ही गवती चहा घेतला तर तुम्हाला पटकन ताजंतवानं वाटू शकतं. काही संशोधनानुसार गवती चहा नियमित आणि प्रमाणात घेतल्यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणावापासुन आराम मिळू शकतो. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी आणि शांत झोप येण्यासाठी काही लोक लेमनग्रास ऑईलचा वापरदेखील करतात.
कोलेस्ट्रॉल कमी होतं
एका संशोधनानुसार गवती चहा पिण्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नक्कीच नियंत्रित राहू शकतं. मात्र ते प्रत्येक व्यक्ती आणि त्याच्या कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणावर अवलंबून आहे. कारण जर तुमचे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण फारच अनियंत्रित असेल तर ते नियंत्रित करण्यासाठी औषधोपचार घेणंच गरजेचं आहे. मात्र सुरूवातीच्या काळात तुम्ही त्यावर नियंत्रित ठेवण्यासाठी गवती चहा घेतल्यास चांगला फायदा होऊ शकतो.
ओरल हेल्थ चांगली राहते
आजकाल देशविदेशात गवती चहाचे उत्पादन केले जाते. बऱ्याचदा घरातील कुंडीतच गवतीचहा लावला जातो. जर तुम्ही गवतीचहाच्या पाती स्वच्छ धुवून चघळल्या तर तुमचे दात आणि हिरड्या स्वच्छ आणि मजबूत होण्यास मदत होऊ शकते. कारण त्यामुळे तुमच्या तोंडातील जीवजंतू कमी होतात आणि तोंडाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
वेदना कमी होतात
दिवसभराच्या कामाची दगदग , धावपळ यामुळे वरचेवर जर तुम्हाला डोकेदुखी, कंबरदुखी, अंददुखी जाणवत असेल तर गवती चहा नक्की प्या. कारण अशी दुखणी कमी करण्यासाठी सतत पेनकिलर घेण्यापेक्षा एक कप गवती चहा तुमच्या फायद्याची ठरू शकते. मासिक पाळीत येणाऱ्या क्रॅंम्पमधुन आराम मिळण्यासाठी तुम्ही या काळात गवती चहा घेऊ शकता.
फंगल इनफेक्शनचा धोका कमी होतो
पावसाळ्यातीस सततचा ओलावा आणि उबदारपणा जीवजंतूंसाठी पोषक असतो. या काळात फंगल इनफेक्शनचा त्रास वारंवार होऊ शकतो. या फंगल इनफेक्शनला टाळण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असायला हवी. गवतीचहा मधील पोषक घटक तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. ज्यामुळे तुम्हाला इनफेक्शनचा धोका कमी होतो.
गवती चहा कसा तयार करावा ?
बाजारात गवती चहा विकत मिळतो तो आणून स्वच्छ करून त्याचे तुकडे एका डबीत भरून ठेवा. जर तुमच्या घरच्या बाल्कनीत कुंडीतच तुम्ही गवती चहा लावला असेल तर तो ताजाच काढा म्हणजे चहा सुंगधित होईल.
- एक कप पाणी चहाच्या भांड्यात उकळत ठेवा.
- पाणी उकळल्यावर त्यात गवती चहाच्या पानांचे तुकडे टाका आणि थोड्यावेळ उकळू द्या. ज्यामुळे चहाला मस्त सुवास येईल.
- चहात तुमच्या आवडीप्रमाणे चहापावडर आणि साखर टाका. वजन कमी करायचं असेल तर साखर टाकणे टाळा.
- चहा उकळल्यावर तो कपात गाळून घ्या. दूध हवे असल्यास टाका अथवा ब्लॅक टी सुद्धा चांगला लागतो.
News English Summary: With the onset of winter, many people start getting colds and coughs. No matter how many medicines are fired on it, cold and cough do not get cured immediately. However, some ayurvedic medicines along with that antibiotic have good benefits in that mind. Herbal tea is one of the important ones. So a cup of herbal tea has these qualities.
News English Title: Lemongrass tea is beneficiary to our health news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY