21 April 2025 5:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Alert | रेमडेसिविर जीव वाचवणारं औषध नाही | फार फार तर काय होईल? - टास्क प्रमुखांची माहिती

task force Dr Sanjay Oak

मुंबई, १४ एप्रिल: राज्यात करोनाबाधितांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधिता आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही भर पडतच आहे. आज तर करोनाबाधितांच्या संख्येने आजपर्यंतचा उच्चांक गाठल्याचं दिसून आलं. दिवसभरात राज्यात तब्बल ६० हजार २१२ करोनाबाधित वाढले असून, २८१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.६६ टक्के एवढा आहे.

एकाबाजूला कोरोनाचा वाढता प्रकोप आणि त्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शन व ऑक्सिजनचा तुटवडा अशा दुहेरी कात्रीत सरकार आणि रुग्णांचे नातेवाईक सापडले आहेत. तर रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी रुग्णांचे कुटुंबीय धावाधाव करताना दिसत आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यासह देशभरात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवू लागला आहे. कोरोनाबाधितांचे नातेवाईक, कुटुंबीयांची रेमडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कोविड टास्कचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सर्वांना अतिशय कळकळीचं आवाहन केलं आहे. ‘रेमडेसिविर जीव वाचवणारं औषध नाही. रेमडेसिविर घेतल्यानं प्राण वाचले असं होत नाही. त्यानं फार फार तर रुग्णाचा रुग्णालयातला कालावधी १ ते २ दिवसांनी कमी होतो,’ असं डॉ. ओक यांनी सांगितलं.

औषध विविध प्रकारची असतं. रेमडेसिविर हे अँटिव्हायरल प्रकारात मोडणारं औषध आहे. जेव्हा एखाद्या व्हायरसची शरीरात वाढ मोठ्या प्रमाणात होते, ती रोखण्याचं काम रेमडेसिविर करतं. मी डॉक्टरांना कळकळीची विनंती करून सांगतो की रेमडेसिविर हे लाईफ सेव्हिंग औषध नाही. रेमडेसिविर दिल्यानं प्राण वाचले असं होत नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. शरीरातील ऑक्सिजनची पातळी, व्हिटामिन सी, झिंक, पाण्याचं प्रमाण उत्तम ठेवणं हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. रेमडेसिविर योग्य त्या रुग्णालाच दिलं जावं. ते सरसकट देण्याचं औषध नाही, असं ते पुढे म्हणाले.

काही कोरोना रुग्णांचे नातेवाईक घरीच उपचार व्हावेत यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. पण रेमडेसिविर हे कुठेही आणि कधीही देण्याचं औषध नाही. रेमडेसिविर घरी दिलं जाऊ नये. ते त्या प्रकारचं औषध नाही. ते रुग्णालयातलं औषध आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला २ ते ९ दिवसांच्या कालावधीत रेमडेसिविर द्यायचं असतं. काही ठिकाणी रुग्णांना ९ ते १४ दिवस रेमडेसिविर दिलं जातं आहे. त्याचा उपयोग होत नाही. रेमडेसिविर केवळ ५ डोसेसमध्ये द्यायचं औषध आहे, असं मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलं.

 

News English Summary: The head of the state’s covid task, Dr. Sanjay Oak has appealed to all. ‘Remedacivir is not a life-saving drug. Taking remedivir does not save lives. The patient’s stay in the hospital is reduced by 1 to 2 days, ‘said Dr. Oak said.

News English Title: Maharashtra corona task force chief Dr Sanjay Oak statement regarding remdesivir injection news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या