15 November 2024 4:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

महाराष्ट्रात एकाच दिवसात तब्बल ३ लाखांहून अधिक नागरिकांना लस

Maharashtra record, Vaccinating

मुंबई, ०२ एप्रिल: महाराष्ट्रात कोराेनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर जात आहे. राज्यात २८ मार्चला ४०,४१४ रुग्ण आढळले होते. यानंतर ३१ मार्चला ३९,५४४ रुग्ण वाढले. गुरुवारी हा आकडा वाढून पुन्हा ४३,१८३ झाला. महाराष्ट्रात मार्च महिन्यात ६.५१ लाख नवीन कोरोना रुग्ण वाढले आहेत.

दरम्यान, गुरुवारपासून ४५ पेक्षा अधिक वयाच्या लोकांचे लसीकरण सुरू झाल्याने मोठा उत्साह दिसला. अनेक केंद्रांवर रांगा लागल्या. राज्य सरकारकडून लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. महाराष्ट्रात काल (1 एप्रिल) एका दिवसात तब्बल तीन लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

राज्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून काल एकाच दिवशी 3 लाख नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने उच्चांक गाठला. लसीकरणाला वेग देऊन यापेक्षा दुप्पट उद्दिष्ट गाठण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे ट्वीट राजेश टोपे यांनी केले आहे.

 

News English Summary: Maharashtra has reached a record high by vaccinating 3 lakh people on the same day since the start of vaccination in the state. We will try to achieve double the target by speeding up vaccination, tweeted Rajesh Tope.

News English Title: Maharashtra record in vaccinating 3 lakh people on the same day since the start of vaccination in the state news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x