26 December 2024 6:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या
x

Health First | मलेरिया किंवा हिवताप | महिती असणं आवश्यक - नक्की वाचा

Malaria symptoms in Marathi

मुंबई , ०७ ऑगस्ट | मलेरिया हा आजार हिवताप या नावाने सुद्धा ओळखला जातो. हा संसर्गजन्य रोग आहे. एनोफेलिस जातीचा बाधित डास चावल्यामुळे हा रोग होत असतो. मलेरियाचे एकूण चार प्रकार आहे .प्लाजमोडियम परजीवीने बाधित असणारा एनोफेलिस मादी डास चावल्यामुळे मलेरिया होत असतो. या शिवाय काही वेळेला मलेरियाचा प्रसार हा बाधित रक्त संक्रमण व अवयवदान यातून होऊ शकतो. या रोगाची लक्षणे आणि उपचार जाणून घेऊ.

लागण झाल्यानंतर मलेरियाची लक्षणे दिसण्यासाठी १० दिवस ते ४ आठवडे इतका काळ लागू शकतो. याची लक्षणे जसे की थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, मळमळ व उलट्या होणे, अंगदुखी, नाडीची गती जलद होणे. मलेरिया वर योग्य वेळी उपचार घेणे बंधनकारक आहे कारण यामुळे मेंदूच्या रक्तवाहिन्यांना सूज येऊन सेरेब्रल मलेरिया ही गंभीर स्थिति होऊ शकते. याशिवाय किडन्या, लिव्हर हे अवयव निकामी होण्याचा धोकाही वाढू शकतो.

मलेरियावर उपचार हे तो कोणत्या प्रकारचा आहे यावरून ठरवले जाते. भारतामध्ये व्हायवॅक्स मलेरिया हा प्रकार जास्त आढळतो. मलेरियापासून बचाव करण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय करावे जसे की डासांपासून बचाव करावा, घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, ताप आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Malaria symptoms in Marathi health updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x