21 November 2024 2:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरणार की तेजीने परतावा देणार, महत्वाची अपडेट - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Horoscope Today | 'या' राशींच्या व्यक्तींसाठी गुंतवणुकीकरिता आजचा दिवस ठरेल फायद्याचा; पहा तुमचे भविष्य काय सांगते Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा - NSE: SUZLON गौतम अदानींनी अधिकाऱ्यांना दिली 20 कोटींची लाच, गुंतवणूकदारांचीही फसवणूक'; अमेरिकेत गुन्हा दाखल
x

Health First | हातावर मेंदी लावण्याचे दुष्परिणाम माहित आहेत का? | वाचा

Mehndi, serious side effects, health fitness

मुंबई, १३ सप्टेंबर: आजकाल प्रत्येक लग्नाच्या निमित्ताने किंवा एखाद्या फंक्शनच्या निमित्ताने हमखास मेहंदी काढली जाते. आपल्याकडे हातांना मेहंदी लावल्याशिवाय कोणताही समारंभ पूर्ण होत नाही. लग्नात नवरीच्या हातावर मेहंदी काढणे हा तर एक सोहळाच असतो. केस रंगवण्यासाठीही मेहंदी लावली जाते. मात्र या मेहंदीचेही दुष्परिणाम होतात हे तुम्हांला ठाऊक आहे का ?

आपल्याकडे हातांना मेंदी लावल्याशिवाय कोणताही समारंभ पूर्ण होत नाही. लग्नात नवरीच्या हातावर मेंदी काढणे हा तर एक सोहळाच असतो. केस रंगवण्यासाठीही मेंदी लावली जाते. पण या मेंदीचेही दुष्परिणाम होतात हे तुम्हांला ठाऊक आहे का ? मेंदी जरी नैसर्गिकरित्या मिळत असली तरी, काहीवेळा कमी कालावधीमध्ये अधिक गडद रंगण्यासाठी तिच्यात PPD (पॅरा-फेनिलीनडायअमाइन)मिसळतात. बऱ्याच जणांना हे माहीत नसते की, PPD त्वचेच्या संपर्कात आल्याने अॅलर्जी होऊ शकते. उदा. खाज येणे, लालसर होणे, आग होणे किंवा सूज येणे.

त्वचा रोग:
मेहंदी जरी नैसर्गिकरित्या मिळत असली तरी, काहीवेळा कमी कालावधीमध्ये अधिक गडद रंगण्यासाठी तिच्यात (पॅरा-फेनिलीनडायअमाइन)मिसळतात. बऱ्याच जणांना हे माहीत नसते की, त्वचेच्या संपर्कात आल्याने अॅलर्जी होऊ शकते. उदा : खाज येणे, लालसर होणे, आग होणे किंवा सूज येणे. तसेच मेहंदी फिकट होऊ लागते किंवा तिचे पापुद्रे सुटू लागतात.

केसांना शुष्कता:
केसांना लावण्याची मेंदी तयार करताना त्यामध्ये अनेक घातक रासायनिक घटक मिसळल्यामुळे केस शुष्क होतात. तसेच डोक्याला खाज सुटते, कधीकधी पुरळही येऊ शकतात. (घरीच केस रंगवण्याचे ’6′ नैसर्गिक व सुरक्षित उपाय !)

डोळे लाल होतात:
मेंदीचा डोळ्यांशी संपर्क आल्यास डोळे लाल होतात किंवा डोळ्यांतून पाणी येऊ लागते. अशा वेळी थंड पाण्याने डोळे धुवावेत व त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लाल पेशी फुटणे:
ज्या मुलांना G6PD ची (6 ग्लुकोज फॉस्पेट डिहायड्रोजनेजची) कमतरता असेल त्यांच्या हातांना मेंदी लावू नये. नाहीतर त्यांच्या शरीरातील लाल पेशी फुटून शारिरीक समस्या निर्माण होतील. असे काही झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पोट बिघडणे:
कोणत्याही स्वरुपातील मेंदी पोटात जाणे मानवी आरोग्यासाठी घातक असते. चुकूनही थोडीफार मेंदी पोटात गेली तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मेंदीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी तज्ज्ञांचे सल्ले:

  • कधीही हातांना किंवा केसांना मेंदी लावण्याअगोदर पॅचटेस्ट करावी.
  • मेंदीमधील रासायनिक घटकांमुळे केस शुष्क न होण्यासाठी मेंदी लावण्याआधी केसांना तेल लावावे.
  • मेंदी लावल्यानंतर शांपू व कंडिशनरचा (शक्यतो आयुर्वेदिक) वापर करून केस स्वच्छ धुवावेत.
  • मेंदी लावल्यानंतर खाज येणे, लालसर होणे, आग होणे किंवा सूज येणे अशी लक्षणे आढळल्यास लगेचच हात किंवा केस धुवून त्यावर Allegra किंवाAvil यांसारखे
  • अॅलर्जी कमी करणारे औषध लावावे.
  • यांसारखी लक्षणे आढळल्यास घरीच कोणतेही तेल किंवा क्रिम न लावता त्वरित त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • पुढच्या वेळी मेंदी लावताना या टिप्स लक्षात ठेवा आणि त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून वाचा.

 

News English Summary: Nowadays, mehndi is extracted on the occasion of every wedding or function. No ceremony is complete unless you have mehndi on your hands. Removing mehndi from the hands of the bride at the wedding is a ceremony. Mehndi is also used to dye hair. But did you know that this mehndi also has side effects? No ceremony is complete without you putting henna on your hands. Removing henna from the hands of the bride at the wedding is a ceremony. Henna is also used to dye hair. But did you know that this sheep also has side effects? Although henna is obtained naturally, PPD (para-phenylenediamine) is sometimes added to it to make it darker in a shorter period of time. What most people don’t realize is that PPD can cause skin allergies. E.g. Itching, redness, burning or swelling.

News English Title: Mehndi may cause many serious side effects says expert doctors news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x