13 January 2025 10:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

Health First | तुमच्या मुलालाही आहे का मोबाईल बघत जेवण्याची सवय? - मग आधी हे वाचा

Mobile use during feeding to baby child

एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे खरे पाहता बरेच आहेत. कोणाला एकत्र कुटुंब नको असतं ? सर्वांनाच खरे पाहता हवं असतं, पण एकमेकांना समजून घेऊन चालण्यासाठी जो पोक्तपणा लागतो, प्रेम, क्षमाशीलता हवी असते. विश्वास हवा असतो तो कमी पडल्यामुळे एकीचे विभाजन होते, कुठे सूनेची, कुठे सासूची तर कुठे ननंदेची तर कुठे जावेची तर फार क्वचित सासर्‍याची चूक पहावयास मिळते. अशीच इतर नात्यांचीही चूक असू शकते.

एखादा अन्नपदार्थ बनवताना मूळ पदार्थांबरोबर जसे अग्नि, भांडे, मसाले इ. सर्व गोष्टी, योग्य जुळून आल्या तरच तो स्वादिष्ट होतो तसेच संसाराचे असते; सासू, सून, नवरा, जाव, ननंद, सासरा यापैकी एकाचे जरी गणित फसले की संसाराची चव बिघडलीच समजा. दरवेळी पटत नसल्यानेच विभक्त रहावे लागते असे नसून, बर्‍याचदा अर्थाजनासाठी सुद्धा कुटुंबापासून लांब रहावे लागते. अशा वेळी होणार्‍या मूलास आजी आजोबांचे प्रेम मिळत नाही, व्यस्त जीवनशैलीमुळे बाळाला वडीलांचा सहवास व प्रेम ही पुरेसे मिळत नाही.

नातेवाईकांपासून आधीच लांब असल्याने नि त्यात शहरातले वास्तव्य म्हणजे शेजारधर्म ही बर्‍याचदा कमी आढळतो, या सर्व गोष्टींमुळे बाळासाठी आई व वडील हेच जीवन, त्यामुळे जास्त माणसांत गेले कि किंवा साधे गार्डन मध्ये गेले तरी बाळ बावरते. त्यात बाळ झोपेल त्यावेळेतच काय ती कामे करून घेणे, नवरा असेपर्यंतच महत्वाची कामे उरकणे, अन्यथा जेवणही धड खायला वेळ मिळत नाही किंवा घाईघाईत खावे लागते अशी एकंदर आईची अवस्था असते.

तुमच्या मुलालाही मोबाईलवरचे व्हिडीओ किंवा गेम्स पाहता पाहता जेवण्याची सवय आहे का? तुमच्या मुलालाही स्क्रीन अॅडीक्शन आहे का? आजकाल प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाकडे मोबाईल असतो. त्यामुळे नकळत घरातल्या मुलांनाही मोबाईल पाहायची सवय लागते. त्यामुळे अनेक मुलांमध्ये वजन कमी होणं, वजन वाढणं, कुपोषण यासारख्या समस्या वाढत आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार स्क्रीन अॅडीक्शनच्या कारणानेही मुलांमध्ये वजन वाढणं किंवा वजन कमी होण्याची समस्या दिसून येते. याशिवाय अनेक पालक आपल्या मुलांना मोबाईलवरचे व्हिडीओ दाखवत जेवू घालतात. तसंच आजकालच्या लहान मुलांना खूप कमी वयात व्हिडीओ गेम्सची वाईट सवय लागल्याचं दिसून येतं. या सवयीमुळे मुलांना अटेंशन डेफिसीट डिसॉर्डर, हायपरअॅक्टिव्हीटी आणि स्लीप डिसॉर्डरसारखे आजार होत आहेत.

मोबाईल आणि इतर इलेक्टॉनिक गॅजेट्समुळे होणारे साईडईफेक्ट्स:

स्क्रीन अॅडीक्शनमुळे मुलांना भूक लागलेली कळत नाही:
साधारणतः जेव्हा मुलं जेवण जेवत नाहीत तेव्हा त्यांना मोबाईलवरचे कार्टून व्हिडीओ दाखवून जेवू घातलं जातं. पण बालरोग तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, या स्क्रीन अॅडीक्शनमुळे मुलांमध्ये भूक लागण्याची प्रवृत्ती कमी होत असल्याचं दिसून आलं आहे. जेव्हा मुलं मोबाईलवर फोकस करतात तेव्हा त्यांची आतून खाण्याची इच्छा कमी होऊ लागते. ज्यामुळे ते कमी खातात किंवा कधीकधी जास्त खातात. परिणामी कुपोषण किंवा जाडेपणा या समस्या दिसून येतात. तर दुसरीकडे ज्या मुलांना खरोखर भूक लागलेली असते पण हातात मिळालेल्या मोबाईल किंवा व्हिडीओ गेममुळे ते सांगू शकत नाहीत की, त्यांचं पोट भरलं आहे आणि पालक त्यांना जास्त खाऊ घालतात. बालरोग तज्ज्ञांनुसार स्क्रिन अॅडीक्शनमुळे मुलांमधील भूक आणि पोट भरलं हे समजण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते.

विकासाशी निगडीत हार्मोन्सवरही होतो याचा परिणाम:
अनेकदा असंही दिसून येतं की, रात्री लवकर झोपण्यावरून बऱ्याच मुलांची चिडचिड होताना दिसते. कारण टीव्ही किंवा मोबाईलवरच्या कार्टून बघण्याची मुलांना झोपण्याआधी सवय असते. ज्यामुळे मुलं रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी उठतानाही चिडचिड करतात. खरंतर सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांतून ब्लू लाईट बाहेर पडतो. जो तुमच्या नैसर्गिक स्लीप हार्मोन्स मेलाटोनिनवर दबाव टाकतो. मानवी शरीराच्या विकासाचे जास्तीत जास्त हार्मोन्स हे रात्री अॅक्टीव्ह असतात. पण जेव्हा मुलं रात्री कमी झोपतात तेव्हा त्यांच्या शारिरीक विकासावरही याचा परिणाम दिसून येतो. लवकर झोप न लागण्यामुळे किंवा कमी झोप झाल्यामुळे मुलांचा स्वभाव चिडचिडा होतो.

पाच इंद्रियावरही होतो परिणाम:
आजकाल मुलांना खूप कमी वयात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स किंवा डिजीटल मीडियाची ओळख करून दिली जाते. वयाच्या पहिल्या पाच वर्षात मुलांच्या पाच इंद्रियांचा विकास होणं गरजेचं असतं. ज्यामध्ये बघणं, ऐकणं, स्पर्शज्ञान, वास घेणं आणि चव घेणं यांचा समावेश होतो. पण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि मोबाईलमुळे मुलांच्या बघण्याच्या आणि ऐकण्याच्या इंद्रियांचं नुकसान होतं. याचा परिणाम मुलांच्या सध्याच्या आणि भविष्याच्या आयुष्यावरही दिसून येतो. लगेच दिसणाऱ्या परिणांमध्ये झोप कमी होणं आणि चिडचिडेपणा यांचा समावेश आहे तर भविष्यात होणाऱ्या परिणामांमध्ये लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता, दैनंदिन व्यवहार, शाळेतील अभ्यास आणि मुलांच्या स्थिरतेवर याचा परिणाम होताना दिसून येतो.

मुलांच्या स्वभाववरही होतो परिणाम:
अनेक संशोधनानुसार हे स्पष्ट झालं आहे की, मुलांनी जर जेवताना मोबाईलचा वापर केल्यास त्यांना जाडेपणा, हट्टीपणा आणि स्वभावाशी निगडीत अनेक समस्या जाणवू शकतात. मोबाईल फोनच्या जास्त वापराने त्यांच्या एकाग्रता आणि विकासाला आळा बसतो. ज्यामुळे मुलांमध्ये हायपरअॅक्टीव्ह स्वभाल, डिप्रेशन आणि आत्महत्त्येचे विचारही येऊ शकतात.

लहान वयातच लागत आहेत चष्मे:
व्हिडीओ गेम आणि मोबाईलमुळे जरी मुलांचं मनोरंजन होत असलं तरी त्यांच्या डोळ्यांसाठी हे फारच नुकसानदायक आहे. जास्त वेळ मोबाईल किंवा व्हिडीओ गेम पाहिल्याने मुलांच्या रेटीनावर परिणाम होत आहे. यामुळे अगदी लहान वयातही आजकाल मुलांना चष्मा लागल्याचं चित्र दिसत आहे.

मुलांना किती वेळ द्यावा मोबाईल?
जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओनुसार एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना इलेक्ट्रॉनिक स्क्रीनची अजिबात ओळख असता कामा नये. तसंच पाच वर्षापुढच्या मुलांनाही जास्तीत जास्त एक तास कोणतंही इलेक्ट्रीक गॅजेट हाताळण्यास द्याव. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या वापराने मुलांचा सामाजिक घडामोडी किंवा घरातल्या एखाद्या क्रार्यक्रमात भाग घेण्याकडेही कल कमी होतो. डिजीटल मीडियामुळे मुलं सोशल होऊ पाहत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्याची प्रक्रियाही उशिराने सुरू होते. अशा मुलांमध्ये मोठं झाल्यावर संवाद साधण्यामध्ये समस्या जाणवतात, यावर उपाय काय? पाच वर्षापेक्षा जास्त लहान मुलांना जास्तीत जास्त एकच तास मोबाईल द्या. जर तुमचं मुल पाच वर्षापेक्षा मोठ असेल तर जास्तीत जास्त दोन तास. गॅजेट्सचा जास्त वापर करत असल्यास मुलांना काउंन्सिलरकडे न्या किंवा त्यांना जास्तीत जास्त शारिरीक अॅक्टीव्हिटीजमध्ये बिझी ठेवण्याचा प्रयत्न करा.

फिजीकल अॅक्टीव्हिटीमुळे चांगली वाढ:
आजकाल मैदानात खेळताना दिसणारी मुलं हे एक दुर्मिळ चित्र झालं आहे. आधीसारखी मुलं आता एकत्र खेळताना दिसतच नाहीत. मोबाईलच्या सवयीमुळे मुलांच्या मैदानात जाऊन खेळणाच्या सवयीलाही विराम लागला आहे. डॉक्टर्सचं म्हणणं आहे की, मुलांच्या विकासासाठी फिजीकल अॅक्टीव्हिटी आणि बाहेर जाऊन खेळणं आवश्यक आहे. आयुष्याच्या सुरूवातीच्या वयात मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो. फिजीकल अॅक्टीव्हीटीमुळे मुलांच्या मेंदूच्या विकासाची गती आणि सीमा वाढते. बाहेर खेळण्यामुळे मुलांची आकलनक्षमता आणि शारिरीक क्षमताही चांगली होते. ज्या मुलांना गॅजेट्सची सवय लागलेली असते ते विकासाच्या प्रक्रियेत मागे पडतात. ज्यामुळे मुलांमध्ये हायपर अॅक्टीव्हीटी आणि लक्षकेंद्रित न होण्याची समस्या निर्माण होते.

 

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mobile use during feeding to baby child health impact news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x