23 November 2024 5:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Health First | मोसंबी जूस आहे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त | अधिक माहिती

Mosambi fruit juice, beneficial, Good health

मुंबई, २८ डिसेंबर: उन्हाळ्याच्या दिवसात मोसंबीचा आंबट रस अमृतापेक्षा कमी नाही परंतु इतर ऋतूंमध्ये देखील आहे अमृत. मोसंबीत व्हिटॉमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आरोग्यासाठी मोसंबीचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो. जाणून घेऊया मोसंबीच्या रसाचे फायदे. (Mosambi fruit juice beneficial for good health)

त्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आरोग्यासाठी मोसंबीचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो. मोसंबी हे लिंबू वर्गातील आंबट-गोड फळ आहे. हे अतिशय गुणकारी फळ असून त्यात ए, बी आणि सी जीवनसत्त्व आहेत. शर्करा आणि फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं. चवीला आंबट-गोड असल्याने अधिक गुणकारी असते.

व्हिटॅमिन सी:
मोसंबीच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. आपल्या एकूणच आरोग्यासाठी व्हिटॅमिन सी खूप महत्त्वाचं ठरतं. शरीरात दररोज डाएटमध्ये व्हिटॅमिन सी असणं आवश्यक असतं आणि मोसंबी याचा खूप चांगला पर्याय आहे.

शरीराला डिटॉक्सीफाय करतं:
मोसंबीचा ज्यूस एक परफेक्ट डिटॉक्सीफाइंग एजेंट आहे, जे शरीरात जावून सर्व टॉक्सिन्स शरीराबाहेर काढतो. पोल्यूशनमुळे शरीरात जमा झालेली घाण आणि नुकसान करणारे तत्त्व शरीराबाहेर काढून टाकतो.

इम्यूनिटी बूस्ट:
मोसंबीमध्ये अँटीऑक्सिडंटचे गुण मोठ्या हे प्रमाणात असतात, जे शरीरातील इन्फ्लामेशन कमी करतं. मोसंबीचा ज्यूस शरीरात इम्यून सिस्टम मजबूत करण्याचं काम करतो आणि शरीरात इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता वाढवतो.

साध्या खोकल्यावर उपचार:
मोसंबीच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. जो साधी खोकला-सर्दीमध्ये आपल्याला आराम देतो. यासोबतच अशाप्रकारचे पुढे येणारे त्रास पण यामुळे दूर राहतात आणि आजारांची लक्षणं पण कमी होतात.

डायजेशन सुधारतं:
मोसंबीच्या ज्यूसमध्ये फायबरचं प्रमाण पण भरपूर असतं. त्यामुळे पाचनशक्ती चांगली ठेवण्याचं काम पण हा ज्यूस करतो. आपल्या शरीराला आतून आरोग्यपूर्ण ठेवतो आणि बद्धकोष्टते सारखा त्रास कमी करतो.

मसल्स पेन पण कमी करतो:
मोसंबीचा रस प्यायल्यास मसल्स पेन कमी होतं. वर्कआऊट करणारे आणि एलथिट विशेष करून मोसंबीचा ज्यूस पित असतात.

हाडं मजबूत करतो:
अनेक शोधांमध्ये हे दिसून आलंय की, मोसंबीचा ज्यूस ऑर्थरायटिस आणि हाडांचे अनेक आजार बरे करण्यात फायदेशीर ठरतो. हाडं मजबूत करायचे असतील तर आपल्याला मोसंबीचा ज्यूस पिणं आवश्यक आहे.

डोळ्यांसाठीही चांगला:
मोसंबीच्या रसात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठीही मोसंबी ज्यूस फायदेशीर ठरतो.

एनर्जी बूस्ट:
दररोज सकाळी एक ग्लास मोसंबीचा ज्यूस प्यायल्यानं शरीराला भरपूर एनर्जी मिळते. शरीरातील अशक्तपणा आणि थकवा मोसंबीचा ज्यूस प्यायल्यानं दूर होतो.

 

News English Summary: The sour juice of citrus in summer days is not less than nectar but in other seasons also nectar. Citrus fruits are rich in Vitamin C and Potassium. It is also rich in fiber. This makes citrus juice extremely beneficial for health. Let’s learn the benefits of citrus juice. It is also rich in fiber. This makes citrus juice extremely beneficial for health. Citrus is a sour-sweet fruit in the lemon class. It is a very nutritious fruit and contains vitamins A, B and C. High in sugar and phosphorus. It is more beneficial as it is sour-sweet in taste.

News English Title: Mosambi fruit juice beneficial for good health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x