मुंबईकरांनो मुलांची काळजी घ्या | ब्लॅक फंगसमुळे ३ मुलांवर शस्त्रक्रिया | डोळे काढावे लागले
मुंबई, १८ जून | आपल्यासाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी आहे. गुरुवारी देशभरात 62,375 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर 1590 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा मागील 61 दिवसातील सर्वात कमी आहे. दरम्यान, 88,421 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
देशातील कोरोनाची आकडेवारी:
* मागील 24 तासात नवीन संक्रमित आढळले: 62,375
* मागील 24 तासात ठीक झालेले रुग्ण: 88,421
* मागील 24 तासातील मृत्यू: 1,590
* आतापर्यंतचे एकूण संक्रमित: 2.97 कोटी
* आतापर्यंत ठीक झालेली रुग्णसंख्या: 2.85 कोटी
* एकूण मृत्यू: 3.83 लाख
* सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या: 7.93 लाख
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशात कहर पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे ब्लॅक फंगसने (Black Fungus) थैमान घातले आहे. देशामध्ये म्युकोरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत.
काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर उपचार केले जात असतानाच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई ब्लॅक फंगसमुळे तीन मुलांवर शस्त्रक्रिया करून त्यांचे डोळे काढण्यात आले आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांमधील म्युकोरमायकोसिसचे किंवा ब्लॅक फंगसची प्रकरणे चिंताजनक आहेत. कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्येही मोठ्या प्रमाणात हा संसर्ग आढळून आला आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयात 4, 6 आणि 14 वर्षांवरील मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यातील पहिल्या दोन मुलांना मधुमेह नाही, परंतु 14 वर्षांच्या मुलाला मधुमेह झाल्याची माहिती मिळत आहे.
खासगी रुग्णालयातील डॉ. जेसल शेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनीच्या दुसर्या लाटेत मधुमेह असलेल्या दोन जणांना ब्लॅक फंगसचा संसर्ग झाल्याचं आम्ही पाहिलं. यातील 14 वर्षांची मुलगी आमच्याकडे आल्यानंतर 48 तासांमध्ये तिचा एक डोळा काळा पडला. मुलीला मधुमेह देखील झाला आहे. डॉक्टरांनी हा संसर्ग नाकामध्येही पसरत होता, मात्र सुदैवाने तो मेंदूपर्यंत पोहोचला नाही. या मुलीवर सहा आठवड्यांपर्यंत उपचार सुरू होते, दुर्दैवाने तिला डोळा गमवावा लागला.
ब्लॅक फंगसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी वापरण्यात आलेल्या इंजेक्शनचा वाईट परिणाम होत असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. जवळपास 27 रुग्णांना अँफोटेरिसिन-बी (Amphotericin-B) इंजेक्शन दिल्यानंतर याचे गंभीर दुष्परिमाण दिसू लागले आहेत. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे. त्यामुळे याचा वापर थांबवण्यात आला आहे.
ब्लॅक फंगस रुग्णांमध्ये अँम्फोटेरिसीन बी इंजेक्शनचे भयंकर असे दुष्परिणाम दिसून आले आहेत. हे इंजेक्शन दिल्यानंतर थंडी, ताप, उलटीची समस्या उद्भवू लागली. इंदोर, सागर आणि जबपूरमध्ये इंजेक्शनचे असे गंभीर दुष्परिणाम दिसून आले आहेत. 42 पैकी 27 रुग्णांना शनिवारी अँफोटेरिसिन-बी इंजेक्शन देण्यात आलं. मात्र त्यानंतर गंभीर दुष्परिणाम दिसून आला आहे. काहींना खूप ताप आला. तसेच त्यांचे अंग थरथर कापू लागले. अचानक थंडी वाजू लागली आणि उलट्या देखील झाल्या आहेत.
रुग्णांवर या इंजेक्शनचा दुष्परिणाम दिसून येताच हे औषध देणं थांबवण्यात आलं आहे. रुग्णालयाच्या व्यवस्थापकांनी सांगितलं की रुग्णांवर इंजेक्शनचं रिअॅक्शन दिसून येत आहे. आता त्यांना इंजेक्शनऐवजी दुसरं औषध दिलं जात आहे अशी माहिती दिली.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: Mucormycosis cases panic in Mumbai three children lost eyes after black Fungas infection news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा