23 February 2025 2:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मुंबईत 24-26 मे थेट वॉक-इन व्दारे लसीकरण तर 27-29 मे दरम्यान ऑनलाईन नोंदणीव्दारे

Vaccination

मुंबई, २४ मे | कोविड- 19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबईकरांचे लसीकरण पूर्ववत सुरळीत होण्यासाठी तसेच लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळ, लसीच्या मात्रा याचा पुरेपूर व सुयोग्य वापर होण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक आगळावेगळा पॅटर्न सुरू केला आहे. यानुसार 24 ते 26 मे म्हणजे सोमवार ते बुधवार असे 3 दिवस लसीकरण हे थेट येणाऱ्या (वॉक इन) नागरिकांसाठीच असणार आहे. लसीकरणाच्या या मोहिमेमध्ये 20 टक्के पहिल्या डोससाठी तर 80 टक्के लसी ह्या दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबईतील एकूण 239 केंद्रांवर कोविशील्ड लस देण्यात येणार आहे. यामध्ये 60+ वयाच्या नागरिकांना दोन्ही डोस (पहिला-20%, दुसरा-80%) आरोग्य व फ्रंटलाईन कर्मचारी आणि 45+ वयाच्या व्यक्तींना फक्त दुसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तर कोव्हॅक्सिन लसीचा विचार करता सर्व वयोगटातील, दुसऱ्या मात्रेसाठी पात्र लाभार्थी येवू शकतील.

24 ते 26 मे 2021 दरम्यान लसीकरणासाठी थेट येण्याची मुभा कुणाला?

  • 60 वर्ष व 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोविशील्ड लसीच्या पहिल्या मात्रेचे लाभार्थी
  • 60 वर्ष 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या मात्रेसाठी पात्र लाभार्थी
  • आरोग्य कर्मचारी व आघाडीवरील (फ्रंटलाईन) इतर कर्मचारी यांच्यातील दुसऱ्या मात्रेचे पात्र लाभार्थी
  • 45 वर्ष व त्यावरील वयोगटातील दुसऱ्या मात्रेचे पात्र लाभार्थी
  • कोव्हॅसीन लसीचा विचार करता सर्व वयोगटातील दुसऱ्या मात्रेसाठी पात्र लाभार्थी येऊ शकतील.
  • 27 ते 29 मे 2021 या 3 दिवसात प्रत्येक केंद्रावर 100 टक्के लसीकरण कोविन प्रणालीवर नोंदणी केल्यानंतर आणि लसीकरण केंद्र व वेळ निश्चित झाल्यानंतरच (स्लॉट बुकींग) करण्यात येईल.
  • रविवारी 30 मे 2021 रोजी लसीकरण कार्यक्रम बंद राहील

आठवड्यातील लसीकरणाच्या सदर नियोजनामध्ये अनपेक्षित कारणांनी काही बदल करावा लागल्यास त्याबाबतची पूर्वसूचना 1 दिवस आधी प्रसारमाध्यमं आणि समाज माध्यमं ह्यांच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येईल.

 

News English Summary: Mumbai Municipal Corporation has started a unique pattern. According to this, from 24th to 26th May i.e. Monday to Wednesday, 3 days of vaccination will be for walk-in citizens only. In this vaccination campaign, 20 per cent is reserved for the first dose and 80 per cent for the second dose.

News English Title: Mumbai vaccination start from today said BMC news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x