3 January 2025 9:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Car Buying Tips | नवीन वर्षात घरासमोर उभी करा नवीकोरी कार, अशा पद्धतीने डील केल्यास मिळेल जास्तीत जास्त फायदा SIP Mutual Fund | गुंतवणूकदारांसाठी जानेवारी धमाका, एकूण 4 इक्विटी योजना होणार लॉन्च, जाणून घ्या तारीख NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी BUY रेटिंग, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Waaree Energies Share Price | वारी एनर्जीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: WAAREEENER Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519
x

मुंबईकरांना मिळणार समुद्राचे गोड पाणी | एक लिटरसाठी होणार ४ युनिट वीज खर्च

Mumbaikars, Salt Water, Pure Water

मुंबई, १० फेब्रुवारी: मुंबईकरांना आता गोड पाण्याचा आनंद लुटता येणार आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. समुद्रातील २०० दशलक्ष लिटर पाणी गोड करण्याच्या प्रकल्पासाठी तब्बल १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पासाठी आग्रही असून, एक लीटर पाणी गोड करण्यासाठी चार युनिट वीज खर्च होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईकरांना पाण्याचा पुरवठा नियमितपणे व्हावा, यासाठी गेले काही वर्ष नव्या स्रोताबाबत विचार केला जात होता. काही वर्षांपूर्वी समुद्राच्या पाण्याचे शुद्धीकरण करून ते गोड पाणी मुंबईकरांना पुरवण्याचा प्रस्ताव महापालिकेसमोर आला होता. परंतु, तत्कालीन आयुक्तांनी हा प्रकल्प व्यवहार्य नसल्याचे सांगून तो स्वीकारला नाही. यानंतर आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समुद्राचे पाणी गोड करून त्याचा वापर पिण्यासाठी करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले होते.

या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली असून, महापालिका यासाठी ५.५० कोटी रुपये खर्च करणार आहे. या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून आय.डी.ई. वॉटर टेक्नॉलॉजी या कंपनीची निवड करण्यात आली असून, प्रकल्पाचा सविस्तर अहवाल या कंपनीकडून देण्यात येणार आहे.

 

News English Summary: Mumbaikars will now be able to enjoy fresh water. A project to desalinate seawater has been approved to quench the thirst of Mumbaikars. The project to desalinate 200 million liters of sea water is expected to cost Rs 1,600 crore. Chief Minister Uddhav Thackeray is adamant that the project will cost four units of electricity to sweeten a liter of water.

News English Title: Mumbaikars will now be able to enjoy fresh water news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x