Health benefits of Neem | कर्करोगासह अन्य रोगांवर फायदेशीर कडुनिंब | जाणून घ्या फायदे
मुंबई, १६ ऑक्टोबर : कडुनिंबाची सर्वाधिक लागवड भारतात केली जात असून त्याचे अनेक गुणकारी आणि आयुर्वेदिक फायदे आहेत. त्यामुळे पूर्वीपासून कडुनिंबाचा आयुर्वेदिक औषधांमध्ये (Health benefits of Neem) वापर केला जातो. कडुनिंबाची फक्त पानेच नव्हे तर या झाडाच्या बिया, मूळे, फुले आणि साल यांच्यामध्येही अनेक महत्त्वाची संयुगे असतात. त्यामुळे हे संपूर्ण झाडे गुणकारी असल्याचे दिसून येते. कडुनिंबामध्ये १३० वेगवेगळ्या प्रकारची जैवसंयुगे असतात, जी शरीराला व्याधीमुक्त करण्यास मदत करतात तसेच निरोगी जीवन जगण्यास पाठबळ देतात.
Health benefits of Neem. Neem Tree not only its leaves, but the tree’s seeds, roots and bark also contain important compounds that have many medicinal and beauty properties. The tree is supposed to denote ‘good health’ in our Ayurveda :
कडुनिंबामध्ये अनेक गुणकारी फायदे आहेत. या कडुनिंबामध्ये कर्कपेशी नष्ट करण्याची क्षमता असते. प्रत्येकाच्या शरीरामध्ये कर्कपेशी असतात. परंतु, त्याचा आपल्याला कोणताही त्रास होत नाही. मात्र, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये पेशींचे संदेशग्रहणक्षमता क्षतीग्रस्त होते. त्यामुळे काही वेळा कर्करोग होण्याची शक्यता असते. परंतु, नियमितपणे रोज कडुनिंबाच्या पानांचे सेवन केले तर शरीरातील कर्कपेशींची संख्या प्रमाणात राहते.
कडुनिंबाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम आणि खनिज यांची मात्रा असते. त्यामुळे हाडे बळकट करण्यासाठी कडुनिंबाची पाने उपयुक्त आहेत. तसेच सांधेदुखी, गुडघेदुखी होत असल्यास कडुनिंबाच्या तेलाने नियमितपणे मालिश करावी. कडुनिंब विषाणूप्रतिबंधक म्हणूनही काम करते. कडुनिंब हे पोलिओ, एचआयव्ही, कोक्सॅकी बी ग्रुप आणि डेंग्यूसारख्या अनेक विषाणूंना त्यांच्या प्रतिकृती निर्माण होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच रोखते, असे गेल्या पन्नास वर्षांमध्ये संशोधकांनी दाखवून दिले आहे. कडुनिंब हे विषाणू संसर्गाच्या दरम्यान शरीराकडून मिळणारा ह्युमोरल आणि सेल मेडिएटेड अशा दोन्ही प्रकारचा प्रतिसाद अधिक तीव्र बनवतो असे दिसून आले आहे. कडुनिंबामध्ये अँटीव्हायरल क्षमता असून त्यात विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करणारे औषधी गुणधर्म आहे. कडुनिंब शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविते, पेशींच्या माध्यमातून कार्यरत होणा-या रोगप्रतिकार यंत्रणेला वेग देते.
कडुनिंबाचे तेल हे अॅथलिट्स फुट, रिंगवर्म व अशा कित्येक प्रकारच्या बुरशीजन्य संसर्गांना पूर्णपणे बरे करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. कडुनिंबामध्ये निंबिडोल आणि गेडुनिन ही दोन औषधी संयुगे असतात, जी बुरशी नष्ट करण्याच्या कामी अत्यंत परिणामकारक आहेत. कडुनिंबाच्या तेलामध्ये आवश्यक फॅटी अॅसिड्स असतात. ही आम्लेसुद्धा जखम बरी करण्यास व आपली त्वचा निरोगी बनविण्यास मदत करतात. कडुनिंब कोणतेही कुरूप व्रण मागे न सोडता जखमा आणि बुरशीजन्य संसर्ग बरे करते.
कडुनिंबाची फुले ही अनॉरेक्सिया, मळमळणे, ढेकर येणे आणि पोटातील कृमींवरील उपचारासाठी उपयुक्त मानली जातात. कडुनिंबाची पाने ही पचनासाठी आणि चयापचयासाठी उपयुक्त असून त्यांच्यामुळे शरीरद्रव्ये चांगल्याप्रकारे स्त्रवतात असे आयुर्वेदामध्ये सांगण्यात आले आहे. कडुनिंबामुळे दातांमधील पोकळ्या स्वच्छ करून चवींची संवेदना सुधारण्यासही मदत होते. परिणामी कॅलरीज जाळण्याची आणि चरबी कमी करण्याची प्रक्रियाही वेगाने होते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
Article Title: Health benefits of Neem in Marathi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार