27 December 2024 7:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Health First | हे 7 पदार्थ पुन्हा गरम करून खाता? | हे वाचा अन्यथा होतील गंभीर आजार

Health First

मुंबई, १४ जून | आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना अन्न पुन्हा गरम करून खाण्याची सवय असते. प्रत्येक घरात असं केलंही जातं. पण तुम्हाला कल्पना आहे का? काही पदार्थ असे आहेत, जे पुन्हा गरम करून खाल्ल्यास, त्याचा आपल्या शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होत असतो. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. अन्न पुन्हा पुन्हा गरम केल्यास, त्यातील पोषक तत्व नाहीशी होतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण तरीही याबाबतीत लोक जागरूक होत नाहीत. यापैकी काही पदार्थ असेही आहेत जे पुन्हा गरम केल्यास, विषारी पदार्थ होतात. हे पदार्थ खाल्ल्याने कॅन्सरसारखे आजार होण्याची शक्यता वाढते.

तुम्ही ठेवलेलं अन्न पुन्हा गरम खात असाल तर हरकत नाही. पण तरीही काही असे पदार्थ आहेत जे पुन्हा गरम खाणं हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही पुन्हा गरम करून खाणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

जर आपल्या बिझी शेड्यूलमुळे वेळ वाचवण्यासाठी आणि भूक शांत करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेले खाणे गरम करून खात असाल तर ही सवय लगेचच बदला. तुमची ही सवय तुमच्या आरोग्याला धोकादायक अवस्थेत टाकत आहे. तुम्हाला माहीत आहे का फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न पुन्हा गरम करून खाणे योग्य नसते. यामुळे तुम्ही केवळ त्या जेवणाचा स्वादच गमावत नाहीत तर पोषणमूल्यही गमावता. तसेच त्या व्यक्तीला विविध आजारांचा धोका निर्माण होतो. जाणून घ्या अखेर ते कोणते पदार्थ आहेत जे पुन्हा गरम करून खाऊ नयेत.

चिकन:
चिकन हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानला जातो. मात्र शिळे चिकन पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्यातील प्रोटीन नष्ट होता. ज्यामुळे पचनाशी संबंधित आजार होतात.

अंडी:
ज्यांच्या शरीरात प्रोटीनची कमतरता असते त्यांना डॉक्टरांकडून रोज एक अंडे खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अंडी पुन्हा उच्च तापमानावर गरम केल्यास त्यात विष निर्माण होते. खासकरून उकडलेले अंडे पुन्हा गरम करून खाऊ नये. असे केल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो. अंडी शिजवल्यानंतर लगेचच त्यांचे सेवन करा. जर एखाद्या कारणामुळे ते खाण्यास उशीर झाला तर ते पुन्हा गरम करू नका. थंडच खा. कारण उच्च प्रोटीन असलेल्या जेवणात मोठ्या प्रमाणात नायट्रोजन असते. हा नायट्रोजन पुन्हा गरम केल्याने त्याचे ऑक्सिकरण होते ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.

भात:
बरेच लोक रात्रीचा उरलेला भात पुन्हा गरम करून खातात. मात्र तुम्हाला ऐकून धक्का बसेल की असे करत तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळ करत आहात. फूड्स स्टँडर्ड एजन्सी(एफएसए)नुसार शिळा भात पुन्हा गरम केल्याने ती व्यक्ती फूड पॉईझनिंगची शिकार ठरू शकते. असे केल्याने भातामध्ये बॅसिलस सेरेस नावाचे अत्याधिक बॅक्टेरिया तयार होतात. भात शिजवताना हे बॅक्टेरिया नष्ट होतात मात्र भात थंड होतात पुन्हा जिवंत होतात. त्यामुळे भात पुन्हा गरम केल्यास त्या व्यक्तीला फूड पॉईजनिंग होऊ शकते.

बटाट्याची भाजी:
बटाट्याची भाजी प्रत्येकाला आवडत असते. मात्र ही भाजी पुन्हा गरम करून कधीच खाऊ नका. बटाट्यामध्ये व्हिटामिन बी६, पोटॅशियम आणि व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. मात्र याची भाजी वारंवार गरम केल्यास यात क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम नावाचे बॅक्टेरिया तयार होतात. इतकंच नव्हे तर ही भाजी जेव्हा पुन्हा गरम केली जाते तेव्हा त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात.

मशरूम:
मशरूमची भाजी बनवल्यानंतर ती लगेचच खावी. दुसऱ्या दिवसासाठी ठेवू नये. मशरूम प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानला जातो. तसेच त्यात खनिजेही असतात. मात्र जेव्हा ही भाजी तुम्ही पुन्हा गरम करता तेव्हा यातील प्रोटीन्स नष्ट होतात. तसेच त्यात विषारी पदार्थ तयार होतात.

पालक:
पालक अथवा हिरव्या भाज्या , गाजर, ओवा यामध्ये नायट्रेट मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मायक्रोव्हेवमध्ये ते गरम केल्यास त्यातील नायट्रोजन नायट्राईट आणि त्यानंतर नायट्रोजमीन्समध्ये बदलतात. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

बीट:
बीटही एकदा शिजवल्यानंतर पुन्हा गरम करू नये. असे केल्याने त्यातील नायट्रेट संपून जातात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

 

News Title: Never reheat this food will get food poison effect health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x