22 April 2025 4:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

नॉर्वेत लस घेतल्यानंतर २९ जणांचा मृत्यू | तर ७५ नागरिकांची प्रकृती चिंताजनक

Norway, more deaths, Covid 19 vaccination

नवी दिल्ली, १७ जानेवारी: संपूर्ण वर्षभर कोरोनासारख्या जागतिक महामारीशी लढा दिल्यानंतर आता अखेर देशवासियांना काहीसा दिलासा मिळाला असून कोरोना लसीची प्रतीक्षा आता अखेर संपली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात कालपासून (१६ जानेवारी) लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज राज्यव्यापी लसीकरणाला सुरुवात झाली. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काल सकाळी 10.30 वा. देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला.

मात्र नॉर्वेमध्ये काळजीत भर टाकणारं वृत्त समोर आलं आहे. नॉर्वेमध्ये करोना लसीकरणाला सुरूवात झाली असून, डिसेंबरच्या अखेरीपासून आतापर्यंत २५ हजाराहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे लस घेतल्यानंतर नॉर्वेत २९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे नॉर्वे सरकारसमोर नव्या संकट उभं ठाकलं आहे.

डिसेंबर २७ पासून नॉर्वेत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली असून, फायझर बायोएटेकची लस घेतल्यानंतर अनेकांना त्रास सुरू झाल्याचं समोर आलं. यात शनिवारी २९ नागरिकांचा लसीकरणानंतर मृत्यू झाला आहे. तर ७५ पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

 

News English Summary: There is alarming news in Norway. Corona vaccination has started in Norway and more than 25,000 people have been vaccinated since the end of December. However, it is a matter of concern that 29 people have died in Norway after being vaccinated. The health of more than 75 citizens is critical. This has created a new crisis for the Norwegian government.

News English Title: Norway has registered more deaths among people over the age of 75 who had their first Covid 19 vaccination shot news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या