22 December 2024 10:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

18 ते 44 वयोगटातील लोकांना ऑनलाइन नोंदणी आवश्यक नाही, सरकारी लसीकरण केंद्रावरही लसीकरणाची सोय

Vaccination

नवी दिल्ली, २४ मे | लसीकरणाच्या मोहिमेत सरकारने नागरिकांच्या सुविधेसाठी आणखी एक बदल जाहीर केला आहे. त्यानुसार, 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी ऑनलाइन रेजिस्ट्रेशन आवश्यक नाही. नवीन नियमानुसार ते आता सरकारी लसीकरण केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष रेजिस्ट्रेशन करून बुकिंग करू शकतील. ही सुविधा सध्या केवळ सरकारी लसीकरण केंद्रांवर असणार असे सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारने सर्वच राज्यांना ही माहिती दिली आहे. या सुविधेने नागरिक आणि लसीकरणासाठी ऑन साइट अर्थात लसीकरण केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष लसीकरणाची बुकिंग आणि लस दोन्ही एकदाच करू शकतील. पण, महाराष्ट्रात सध्या लसींच्या कमतरतेमुळे 18 ते 44 वर्षे वयोगटातील लसीकरण अनेक ठिकाणी बंद आहे.

केंद्र सरकारने का घेतला निर्णय?
अनेक राज्यांना लसीकरणासाठी व्हॅक्सीनचे स्लॉट मिळाले तरीही त्या व्हॅक्सीन केंद्रांपर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. अशात व्हॅक्सीन खराब होण्याची प्रकरणे वाढत आहेत. विविध वृत्तांचा दाखला देत केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यासोबतच, ग्रामीण भागांमध्ये ऑनलाइन नोंदणीला अडचणी येत असल्याचे सुद्धा केंद्राने म्हटले आहे.

 

News English Summary: In the vaccination campaign, the government has announced another change for the convenience of the citizens. Accordingly, citizens between the ages of 18 and 44 are not required to register online for vaccination. According to the new rules, they will now be able to go to the government vaccination center and book by direct registration.

News English Title: On site registration for 18 44 age group now enabled on for govt vaccination centres said union Health Ministry news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x