22 November 2024 6:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | आजार बरा झाल्यावर पेनकिलर्स घेणे थांबवावे का ? - नक्की वाचा

Stop painkillers

मुंबई, १७ जुलै | ताप, सर्दी, खोकला या साध्या आजारांसाठी आपण डॉक्टरकडे जात नाही. अगदी पाठीचे दुखणे असो किंवा सांधेदुखी आपण आपल्याला माहित असलेल्या पेनकिलर्स अगदी सहज घेतो. अँटिबायोटिक्सचा डोस पूर्ण करणे गरजेचे आहे, हे आपण जाणतो आणि तसंच इतर औषधांच्या विशेषतः पेनकिलर्सच्या बाबतीत देखील करतो. जर त्रास होत नसेल तर वेदनाशामक गोळ्या (पेनकिलर्स) घेणे बंद करणे योग्य आहे का? की डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पेनकिलर्सचा कोर्स पूर्ण करणे गरजेचे आहे? आपल्याला पडणाऱ्या या प्रश्नांवर मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.

त्यांच्यानुसार पेनकिलर्स अनेक प्रकारच्या असतात. सामान्यपणे NSAIDs (non-steroidal anti-inflammatory drugs) या पेनकिलर्स डॉक्टर देतात. आणि अनेकजण कोणताही विचार न करता अगदी लहान सहान दुखण्यासाठी पण पेनकिलर्स घेतात. परंतु, सगळ्या दुखण्यांवर पेनकिलर्स घेणे योग्य नाही. शक्य असल्यास दुखणं आपोआप बरं होईल यासाठी वाट बघा. परंतु, त्रास जर असह्य होत असल्यास पेनकिलर्स घ्या. यात चिंता करण्याचे काही कारण नाही. याचा अर्थ असा नाही की त्रास होत नसताना देखील तुम्ही दिवसातून तीनदा पेनकिलर्स घ्याल. कारण पेनकिलर्सचे अनेक दुष्परिणाम आहेत. तसंच वेदनाशामक गोळ्या खूप काळ घेणे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणून जर तुम्ही पेनकिलर्स घेत असाल तर गरज असेल तेव्हा किंवा लहानशा कालावधीत घेणे योग्य ठरेल, असा सल्ला डॉक्टर देतात.

पण जर पेनकिलर्स डॉक्टरांनी दिल्या असतील तर तो कोर्स पूर्ण करणे गरजेचे आहे आणि गोळ्या घेणे बंद करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण काही वेळेस त्रास हा इंन्फ्लामेशनमुळे होत असतो. अशावेळी दिलेल्या पेनकिलर्स या त्रासाबरोबरच होणार्‍या वेदनेशी सामना करण्यास देखील उपयुक्त ठरतात. तसंच पेनकिलर्स देण्यापूर्वी तज्ज्ञांनी देखील क्लिनिकल हिस्ट्री तपासून बघणे गरजेचे आहे. उदा. अॅसिडिटी किंवा किडनीवर परिणाम होणार नाही ना, इत्यादी. म्हणून डॉक्टरांनी औषधांबद्दल योग्य तो अंदाज बांधून ती द्यायला हवीत, असे डॉ. देब्री म्हणाले. कारण काही वेळा औषधे घेतल्यानंतर २-३ दिवसात दुखणे बरे होते. परंतु, जर सांधेदुखी असेल तर तो त्रास बरा होण्यास तीन पेक्षा अधिक दिवस लागतात. अशावेळी तुम्हाला पेनकिलर्सचा कोर्स पूर्ण करणे गरजेचे आहे.

पेनकिलर्स घेण्यापूर्वी त्याबद्दलच्या या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे:
१. बऱ्याच लोकांना दुखण्यावर कोणत्या एक्स्पर्टचा सल्ला घ्यावा हे माहीत नसते. असो, परंतु यासाठी general practitioners (GPs) सल्ला घेणे योग्य ठरेल. परंतु, registered medical practitioner सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल. कारण तो/ती तुम्हाला योग्य औषधे व ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला देईल. तसंच गोळ्या देताना त्या अधिक प्रमाणात देऊ नये आणि त्याचबरोबर क्लिनिकल हिस्ट्री जाणणे महत्त्वाचे आहे, याचे भान तज्ज्ञांनी ठेवावे.

२. पुरेसं जेवल्यानंतर किंवा नाश्ता केल्यानंतरच पेनकिलर्स घ्या. फक्त कपभर चहा, कॉफी आणि दोन बिस्किटं इतकंच खाणं पुरेसं नाही. कारण काही वेळेस पेनकिलर्स म्हणून अँटासिडस दिल्यास व रिकाम्या पोटी त्या घेतल्यास अॅसिडिटी होऊ शकते.

३. तसंच औषधांसाठी जास्त पैसे खर्च करू नका. कारण स्वस्त आणि आपल्याला घेणे शक्य होईल अशा पेनकिलर्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या खिशाला जास्त झळ पोहचणार नाही. म्हणून साधारणपणे generic medications दिली जातात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Once the pain will stop then we could stop taking painkillers in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x