28 December 2024 12:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 55 टक्केपर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर ब्रेकआऊट देणार. तज्ज्ञांनी दिले तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टॉप लेव्हलवरून 25% घसरला, आता 100 रुपयांच्या पार जाणार - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: NBCC
x

Health First | संत्री खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावा । नक्की वाचा

benefits of oranges

मुंबई ३० एप्रिल : नागपूरची संत्री जगप्रसिद्ध आहेत. आंबटगोड चवीचं हे फळ सर्वांनाच आवडतं. इतर फळांच्या तुलनेत स्वस्त असल्याने अगदी सर्वसामान्यांदेखील संत्री विकत घेणं नेहमीच परवडतं. शिवाय संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, फायबर्स, मॅग्नेशियम असल्यामुळे ते शरीरासाठी फायदेशीर ठरतं. संत्र्यामध्ये कॅलरिज कमी असल्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहतं. सकाळच्या नाश्त्याला संत्र्याच्या फोडी आणि ज्यूस घेण्याप्रमाणेच अनेक पारंपरिक रेसिपीजमध्येही संत्र्याचा वापर केला जातो. संत्र्यापासून तयार केलेली खास नागपूरी संत्रा मिठाई अनेकांची फेव्हरेट असेल. एवढंच नाही तर संत्र्यांचा वापर सौंदर्य वाढवण्यासाठी देखील केला जातो. यासाठी जाणून घ्या संत्री खाण्याचे फायदे

दररोज संत्रे खाण्याचे फायदे:
1. रोज एक संत्रे खाल्ल्याने दिवसभरात शरीराला लागणारे व्हिटामिन सी मिळते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

2. वाढत्या वयाप्रमाणेच त्याच्या खुणा शरीरावर दिसू लागतात. वाढत्या वयाच्या खुणा कमी कऱण्यासाठी दररोज ताज्या फळांचे सेवन करावे. दररोज संत्रे खाल्ल्याने त्वचा तुकतुकीत होते.

3. रोज संत्रे खाल्ल्याने हृदयरोगाशी संबंधित हार्ट अॅटॅक तसेच इतर आजारांचा धोका कमी होतो.

4. संत्र्यातील फोलेट आणि फॉलिक अॅसिडमुळे मेंदूचा विकास होण्यास मदत होते. गरोदर स्त्रियांनीही नियमित संत्रे खाणे चांगले.

5. संत्र्यामुळे केसगळती रोखण्यास मदत होते.

News English Summary: Nagpur’s oranges are world famous. Everyone loves this sweet and sour fruit. Cheaper than other fruits, it is always affordable to buy even the most ordinary orange. In addition, oranges contain Vitamin C, Vitamin A, Calcium, Fibers, Magnesium which are beneficial for the body. Oranges are low in calories so you can control your weight. Oranges are also used in many traditional recipes, just like taking orange peel and juice for breakfast.

News English Title: Oranges contains Vitamin C and its boost your immunity news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x