Health First | पालकांनो, मुलांच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी त्यांना मोबाईल देता? - मग हे वाचा
मुंबई, ०५ जुलै | लहान मुलांना कोणतीही सवय लागण्याला पालक सुद्धा तितकेच जबाबदार असतात. लहान असताना तो जेवत नाही हे पाहून पालक त्याला मोबाईल दाखवून जेवण भरवायला सुरुवात करतात. तर मुलांना इथून पहिली मोबाईलची सवय लागते आणि मग पुढे पुढे जस जसे ते मोठे होत जातात ही सवय इतकी वाढते की त्या मुलांना मोबाईल शिवाय दुसरं काही सुचत नाही. लहान वयात मोबाईलचा अतिवापर तुमच्या मुलाभोवती अनेक आजारांचा विळखा घालण्यास कारणीभूत ठरू शकतो.
टीन टेंडोनाइटिस:
जर मुलांना लहान वयातच मोबाईलची सवय लागली तर सगळ्यात पहिलं ते शिकतात मेसेज टाईप करायला. आपल्या आई वडिलांना पाहून त्यांना सुद्धा मेसेज पाठवण्याची सवय पडते. जस जसे मोठे होत जातात तस तशी चॅटिंगची सवय सुद्धा त्यांना लागते. पण यामुळे त्याला टीन टेंडोनाइटिस हा विकार होऊ शकतो. या विकाराला टीटीटी असेही म्हणतात. यात चुकीच्या स्थितीत बसून मोबाईल वापरल्याने बोटे, हात, पाठ आणि मानेत खूप वेदना होऊ शकतात. याला वेळीच आवर न घातल्यास पुढे अजून गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय यामुळे नजर सुद्धा प्रभावित होते.
तणाव:
पूर्ण दिवस फोनचा वापर केल्याने आणि सोशल मिडीयाच्या दुनियेत रमल्याने खऱ्या आयुष्यातले मित्र, खेळ यांच्या बाबतीत मुले दूर जाऊ लागतात. त्यांना आपले मोबाईलचे जग जास्त आवडू लागते. अनेक संशोधनातून हे दिसून आले आहे की मोबाईल जास्त वापरणाऱ्या मुलांमध्ये थकवा, ताण आणि तणाव मोठ्या प्रमाणावर असतो. काही प्रकरणांत तर यातून मानसिक आजार निर्माण झाल्याचे सुद्धा दिसून आले आहे. त्यामुळे हा धोका ओळखून आपल्या मुलाच्या मोबाईल वापरावर मर्यादा आणा.
झोप न येणे:
ही समस्या मोठ्यां माणसांना सुद्धा खूप सतावते आणि लहान मुलांना सुद्धा! अर्थात दोन्हीमध्ये मोबाईलचा अतिवापर हे कारण असते. सतत फोनवर असल्याने झोपेचे भान राहत नाही. हळूहळू झोपेची वेळ सुटते आणि कधीही रात्री अपरात्री झोप येते आणि सकाळी झोप पूर्ण सुद्धा होत नाही. मुलांना याचा मोठा फटका बसू शकतो. कारण झोप न आल्याने आणि ती पूर्ण न झाल्याने त्यांच्या शालेय जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. मुलाची बौद्धिक क्षमता कमकुवत पडू शकते.
कॅन्सरचा धोका:
तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे की मोबाईलच्या अतिवापरामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. अनेक अभ्यासपूर्ण संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की मोबाईल फोन मधून निघणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडीएशन खूप काळ मोबाईलचा वापर केल्याने त्वचेतील उतीकांद्वारे शोषली जातात. लहान वयात या उतिका विकसित होत असतात, त्या तितक्या सक्षम नसतात. त्यामुळे या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडीएशनचा त्यांच्यावर मोठा परिणाम होऊन ब्रेन कॅन्सरचा धोका उद्भवतो.
चिंता:
सध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे आणि मुलं देखील त्यापासून दूर नाहीत. सोशल मीडियाचं जग जितकं मन रिफ्रेश करणारं आहे तितकंच ते चिंता वाढवणारं आहे. माझ्या फोटोला लाईक्स येत नाही. मी अजून कसा फेमस होऊ? माझा मित्र जास्त फेमस आहे. तो माझ्याशी बोलत नाही, ती माझ्याशी बोलत नाही. अशा अनेक गोष्टी मुलांच्या चिंता वाढवायला कारणीभूत ठरू शकतात आणि या चिंतेत अडकल्यावर डिप्रेशनमध्ये येऊन मुले काहीही करू शकतात. म्हणून त्यांच्या मोबाईलच्या अतिवापराला वेळीच आवर घाला आणि त्यांना सुरक्षित ठेवा.
मोबाइल फोन्स रेडिओफ्रीक्वेंसी एनर्जी उत्सर्जित करतात. हे एक प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे, जे फोन वापरकर्त्याच्या डोळ्यांद्वारे शोषले जाऊ शकते. मोबाईल फोन वापरकर्त्याने किती रेडिओफ्रिक्वेन्सी उर्जा शोषली आहे हे फोनचे तंत्रज्ञान, फोन आणि वापरकर्त्यामधील अंतर, मोबाइल फोनच्या वापराचे प्रमाण आणि सेल फोन टॉवर्सपासून वापरकर्त्याचे अंतर यासारखे अनेक घटकांवर अवलंबून असते.
अँब्लिओपिया ही डोळ्याची समस्या आहे जी वाढत्या मुलांमध्ये उद्भवू शकते. यात प्रामुख्याने उजव्या आणि डाव्या डोळ्यांमध्ये दृष्टीची लक्षणीय भिन्न चिन्हे आहेत, जेणेकरून एका डोळ्याने तयार केलेल्या प्रतिमा दुसऱ्या डोळ्याने तयार केलेल्या प्रतिमांच्या तुलनेत कमकुवत किंवा विखुरलेल्या होतात. कमकुवत डोळा मेंदूकडे असमाधानकारकपणे प्रतिमा पाठवतो म्हणून मेंदू आपल्या दृश्य माहितीसाठी मजबूत डोळ्यावर अवलंबून राहण्यास शिकतो. जर ही परिस्थिती सुधारली नाही तर अखेर मेंदू एकट्या मजबूत डोळ्यातील प्रतिमा स्वीकारणे निवडतो आणि कमकुवत असलेल्या प्रतिमांकडे दुर्लक्ष करतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं, तर कमकुवत डोळा कालांतराने निकामी होतो.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Health Article Disclaimer: आरोग्य विषयक आर्टिकलमध्ये दिलेले उपाय हे सामान्य मार्गदर्शन आणि माहिती आहे. याचा उपयोग करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
News Title: Over use of Mobile can cause serious diseases in children’s in Marathi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार