महत्वाच्या बातम्या
-
Health First | कंबर दुखत आहे मग करा त्यावर हे उपचार
सध्या कंबरेच्या दुखण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. व्यक्ती स्त्री असो की पुरुष, तरुण असो की वृद्ध, त्रास मात्र कंबरेच्या दुखण्याचा. मग कधी कोणते तरी तेल चोळ, कधी कशाने तरी शेक घे, कोणत्याही गोळ्या घे असे नाना प्रकार वैद्याच्या सल्ल्याशिवाय चाललेले असतात. त्यामध्ये अपयश आले की मग वैद्याकडे जाऊन आपली तब्येत दाखवायची, अशी सर्वसाधारण पद्धत आढळते. कंबरदुखी नेमकी कशामुळे होत आहे याचे कारण शोधणे प्रामुख्याने आवश्यक असते. ते न शोधताच स्वतःचे स्वतः उपचार केले तर ते तापदायक ठरू शकते. म्हणून सर्वप्रथम कंबरदुखीची विविध कारणे लक्षात घेतली पाहिजेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कपाळावर चंदनी गंध लावल्याने होणारे फायदे जाणून घ्या
हिंदू धर्मात पूजा करताना टिळा लावण्याची प्रथा आहे. पूजाच कशाला इतर मंगल कार्याची सुरूवातही गंध लावूनच करण्यात येते. गंध लावल्याशिवाय कोणतेही मंगल कार्य सुरू होत नाही.कपाळावर टिळा नसणे हे अशुभ मानले जाते. पूजेच्या वेळी कुंकुम टिळा किंवा चंदनाचा टिळा लावतात. हा टिळा कपाळावर किंवा दोन्ही भुवयांच्या मधोमध लावण्याची प्रथा आहे. अनामिकेच्या खालचा भाग हस्तज्योतिषानुसार सूर्यक्षेत्र मानले गेले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | काजू खाल्ल्याने आपल्या आरोग्यास होणारे फायदे जाणून घ्या
ड्रायफ्रुट्स अर्थात सुकामेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातोसुक्यामेव्यातील महत्त्वाचा घटक ‘काजू’ जगभरात विविध प्रकारे वापरला जातो. अनेक गोड पदार्थांत चवीसाठी आणि सजावटीसाठी काजूचा वापर होतो. भारतात मसालेदार पदार्थांची चव वाढविण्यासाठी देखील काजू वापरले जातात. काजूचा वापर केवळ खाण्यापुरता मर्यादित नाही तर, शरीराच्या अनेक समस्या कमी करण्यात देखील काजू महत्त्वाचा ठरतो
4 वर्षांपूर्वी -
Health First | टाचा दुखतात मग करा हे घरगुती उपाय । सविस्तर वाचा
चालणं हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे. मात्र अनेकांना टाचदुखी किंवा तळवे दुखीची समस्या असते. त्यामुळे अनेक वेळा चालताना किंवा उभं राहिल्यावर ही समस्या तीव्रतेने जाणवते. चालत असताना शरीराचा भार गुडघे, पावले आणि पायांच्या तळव्यावर येतात. शरीराचा भार पेलता यावा यासाठी पायाच्या तळव्यांची रचना वक्राकार पद्धतीने करण्यात आली आहे. या तळव्यांमध्ये प्लान्टर फेशिया हा स्नायूंचा पडदा असतो. या प्लांटर फेशियाला इजा होऊन लहान भेगा (मायक्रो टियर्स) निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे स्नायू घट्ट होतात आणि टाचदुखी सुरू होते साधारणत: चाळिशी ओलांडलेल्या स्त्रियांमध्ये टाचदुखीची समस्या सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळतं. या टाचदुखीवर काही घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे ही समस्या दूर होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या पौष्टीक अश्या बदामाचे गुणधर्म । नक्की वाचा
:घरात ड्रायफ्रुटमध्ये असणारा हमखास असणारा पदार्थ म्हणजे ‘बदाम’. तुम्ही काही विसरलात की, तुम्हाला बदाम खाण्याचा सल्ला अगदी हमखास दिला जातो. ‘’बदाम खा बदाम तुझ्या लक्षात राहील असे म्हणत दात विचकणारे लोक अनेक आहेत’’ पण ते म्हणत आहेत ते अगदी खरं आहे बरं का.. कारण बदाम खाण्याचे भरपूर फायदे आहेत. एक बदामही तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरु शकते. इतकेच नाही जर तुम्हाला सुंदर आणि नितळ त्वचा हवी असेल तर मग तुम्ही बदाम अगदी हमखास खायला हवे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | संत्री खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावा । नक्की वाचा
नागपूरची संत्री जगप्रसिद्ध आहेत. आंबटगोड चवीचं हे फळ सर्वांनाच आवडतं. इतर फळांच्या तुलनेत स्वस्त असल्याने अगदी सर्वसामान्यांदेखील संत्री विकत घेणं नेहमीच परवडतं. शिवाय संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅrमिन ए, कॅल्शियम, फायबर्स, मॅग्नेशियम असल्यामुळे ते शरीरासाठी फायदेशीर ठरतं. संत्र्यामध्ये कॅलरिज कमी असल्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहतं. सकाळच्या नाश्त्याला संत्र्याच्या फोडी आणि ज्यूस घेण्याप्रमाणेच अनेक पारंपरिक रेसिपीजमध्येही संत्र्याचा वापर केला जातो. संत्र्यापासून तयार केलेली खास नागपूरी संत्रा मिठाई अनेकांची फेव्हरेट असेल. एवढंच नाही तर संत्र्यांचा वापर सौंदर्य वाढवण्यासाठी देखील केला जातो. यासाठी जाणून घ्या संत्री खाण्याचे फायदे
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या थंड अश्या काकडीचे गुणधर्म । नक्की वाचा
खीरा किंवा काकडी एक असा खाद्य पदार्थ आहे जो पुर्ण भारतात सहज मिळतो. काकडी शरीराला शीतलता आणि ताजेपणा प्रदान करते. याला तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता. जेसे सलाड, सँडवीच, किंवा तिखट मिठ लावुन खाऊ शकता. काकडीचे स्वास्थवर्धक आणि सौंदर्यवर्धक गुण दोन्ही अगणित आहेत.आयुर्वेदिकदृष्टय़ा काकडी ही शीतल, पित्तशामक, पाचक आणि मूत्रल आहे. काकडीचे बी शीतल, मूत्रल, पुष्टीकारक आहे. काकडीच्या या गुणधर्मामुळे ती खाल्ली असता शरीरातील अंतर्गत स्राव व मूत्रप्रमाण वाढते व पर्यायाने मूत्रविकार दूर होतात.
4 वर्षांपूर्वी -
वेदना किंवा ताप असेल तर पेन किलर खाणे टाळा, कोरोना असल्यास गंभीर होऊ शकतो रुग्ण - ICMR चा इशारा
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दररोज देशातील मागील २४ तासांतील रुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी जाहीर केली जाते. गुरुवारी आढळून आलेल्या नव्या रुग्णांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशात २४ तासांत ३ लाख ८६ हजार ४५२ नवीन करोना बाधितांची नोंद झाली आहे. देशवासीयांना काळजीत टाकणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात ३ हजार ४९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काहीसा दिलासा देणारी एक बाब म्हणजे २ लाख ९७ हजार ५४० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत २ लाख ८ हजार ३३० जणांचा मृत्यू झाला असून, सध्या ३१ लाख ७० हजार २२८ रुग्ण उपचार घेत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अल्सर म्हणजे काय ? तो होण्याची कारणे आणि उपाय जाणून घ्या । नक्की वाचा
अल्सर म्हणजे पोटात होणाऱ्या जखमा होय. जेव्हा हे घाव आतड्यांत किंवा अन्न नलिकेमध्ये तयार होतात तेव्हा रुग्णाला काही खाताना वा पिताना खूप वेदना होतात आणि मोठा त्रास होतो. चावलेला कोणताही पदार्थ गिळताना सुद्धा अशी जाणीव होते जसे की काहीतरी आपला गळा चिरून आतमध्ये शिरत आहे. या स्थितीत रुग्ण साधं पाणी पिताना सुद्धा घाबरतो. कारण पाणी पिताना सुद्धा खूप जळजळ आणि वेदना होतात. पोटाच्या वेगवेगळ्या भागात होणाऱ्या अल्सरच्या आजराला वेगवेगळी नावे आहेत आणि हे अल्सर तयार होण्याची कारणे सुद्धा वेगवेगळी असतात. पोटात तयार होणाऱ्या अल्सरला गॅस्ट्रिक अल्सर आणि आतड्यांत होणाऱ्या अल्सरला डुओडिनल अल्सर म्हटले जाते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | डिंकाचे पदार्थ आपल्या आरोग्यास लाभदायक । नक्की वाचा
थंडीच्या दिवसात आपल्या खाण्यापिण्याच्या टाईमटेबलमध्ये बरेच बदल होतात. या दिवसांमध्ये उष्णपदार्थ आवर्जून खावे असा सल्ला आवर्जून दिला जातो. यामुळे शरीराला उर्जा तर मिळतेच त्यासोबतच अनेक आजारांपासूनही रक्षण होते. याच कारणामुळे थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू बनवले जातात. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते आणि आरोग्यही चांगले राहते. तसंच डिंक भाजूनही खातात. अशाप्रकारे डिंक खाल्ल्यास हाडंही मजबूत होतात आणि थंडीच्या दिवसात दुखत नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गुणकारी लसणाचा आपल्या आहारात करा समावेश । सविस्तर वाचा
साधारणपणे भारतीय खाद्यपदार्थांमध्ये लसूण आर्वजून वापरले जाते. डाळीला, भाजीच्या फोडणीला, चटणीला लसूण वापरले जाते. स्वाद वाढवण्यासाठी लसूण आवश्यक आहे.हजारो वर्षापूर्वीपासून लसूण औषधी स्वरूपात वापरण्यात येत आहे.दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यातून अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक तत्त्व एकत्र मिळतात. तर मग जाणून घेऊया लसूण खाण्याचे फायदे….
4 वर्षांपूर्वी -
Health First | नाकातून रक्त आल्यास काय करावे उपाय पहा । नक्की वाचा
नाकाच्या आतल्या बाजूला एक विशिष्ट प्रकारची कातडी असते. या पातळ त्वचेला ‘म्युकोझा असं म्हणतात. म्युकोझा मुळातच नरम असल्यामुळे त्याला थोडासा धक्का लागला किंवा जखम झाली तरी लगेच त्यातून रक्त यायला सुरूवात होऊ शकते. आपलं नाक नेहमी थोडं ओलसर राहावं यासाठी नाकात निसर्गत:च पातळ पदार्थ बनण्याची व्यवस्था असते. उन्हाळ्यात मात्र नाकातला ओलसरपणा कमी होऊन नाक आतून कोरडं पडतं. नाकाच्या आतल्या त्वचेला अगदी लागून रक्तवाहिन्या पसरलेल्या असतात. त्यामुळे ही त्वचा कोरडी झालेली असताना चुकून नाक- तोंड कुठे आपटलं गेलं किंवा कुणाला नाकात बोट घालून नाक कोरण्याची सवय असेल तर त्यामुळेही रक्तवाहिनी फुटते आणि नाकातून रक्त येतं.
4 वर्षांपूर्वी -
Health First | खोकल्यावर करा हे घरगुती उपचार । नक्की वाचा
:बदलत्या वातावरणात किंवा थंडीत लहान मुलांना खूप सहज व लवकर सर्दी-खोकला होऊ शकतं.खोकला येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे संक्रमण होय. व्हायरल इन्फेक्शन जसे की सर्दी आणि ताप यामुळे खोकला येतो. एसिड रिफ्लक्स हे एक खोकल्यासाठी कारणीभूत ठरू शकते.अस्थमा सुद्धा खोकल्यामागचे कारण आहे. त्याचे निदान करणे कठीण असते कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये वा बाळामध्ये याची लक्षणे वेगवेगळी दिसतात. परंतु अशी काही लक्षणे आहेत जी अस्थमासाठी सामान्य मानली जातात जसे की खोकताना घरघर आवाज येणे, खासकरून रात्रीच्या वेळी जास्त जोरात खोकला येणे. अॅलर्जी आणि साइनसाइटिस सुद्धा खोकल्याची कारणे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | नाचणी आहे आरोग्यास लाभदायक । नक्की वाचा
संपूर्ण जगभरात आहारात पहिला क्रमांक हा तृणधान्यचा लागतो. आता तृणधान्य म्हणजे कोणते तर तांदूळ, गहू आपल्या घरात सर्वात जास्त यांचा उपयोग केला जातो.काही लोक ज्वारीची भाकरी खातात. पण नाचणीची भाकरी खायला तोंड वाकडं करतात. पण नाचणी मधील गुणधर्म ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल. नाचणीचे दाने हे गडद विटकरी रंगाचे असतात.तांदूळ आणि गहू आणि ज्वारी पेक्षा किती तरी पटीने जास्त नाचणी मध्ये पोषकद्रव्ये असते. तसेच आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे कॅल्शिअम आणि फॉस्परस याचे ही प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे आपली हाडे आणि दात एकदम मजबूत राहतात
4 वर्षांपूर्वी -
Health First | नारळाचे पाणी हे आपल्या आरोग्यास अमृतासमान पेय । नक्की वाचा
‘ निसर्गाची करणी आणि नारळात पाणी ‘ यात खरोखरच तथ्य आहे कारण नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. नारळ पाणीमध्ये इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक त्यात आढळतात. जरी नारळाच्या पाण्याची चव गोड असली, तरी त्यात नैसर्गिक साखर असते आणि कृत्रिम स्वीटनर अजिबात वापरला जात नाही. त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. गर्भावस्थेमध्ये तर नारळ पाणी सर्वात चांगले मानले जाते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आहारात पुदिना वापरल्याने होतात आरोग्यदायी फायदे
पुदीना म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती हिरवीगार चटणी. पुदीनाच्या चटणीशिवाय पाणीपुरीला मजाच येत नाही. . ही एक औषधीय वनस्पती असून हिचे अनेक फायदे आहेत. पुदीन्याचा वापर हा फक्त स्वयंपाकातच नाहीतर पचन सुधारण्यासाठी, वजन घटवण्यासाठी, मळमळणं, डिप्रेशन, थकवा आणि डोकेदुखीवर आराम मिळवण्यासाठीही होतो. पुदीन्याच्या पानाचे याशिवायही अनेक फायदे आणि आरोग्यदायी लाभ आहेत. जसं अस्थमा, स्मरणशक्ती कमी झाल्यास आणि त्वचेच्या देखभालीतही याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत याच पुदीन्याचे फायदे
4 वर्षांपूर्वी -
Health First | अस्थमा किंवा दम्यावर आहेत काही घरगुती उपाय ते जाणून घ्या
दमा अर्थात अस्थमा. श्वसननलिकेला सूज आल्यामुळे किंवा इजा झाल्यामुळे फुफ्फूसाला होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे श्वासोच्छवास करताना त्रास होतो किंवा सतत धाप लागल्यास दमा आहे असं समजावं. दमा हा आजार अनुवांशिकतेनं अथवा वाढत्या प्रदूषणामुळे तिथं राहणाऱ्या नागरिकांमध्ये दम्याच्या आजाराचं लक्षणं असल्याचं दिसून येऊ शकतं.
4 वर्षांपूर्वी -
Health First | डोळ्यात रांजणवाडी झाल्यास करा हे काही घरगुती उपाय
रांजणवाडीला रांजणवाडीच का म्हणायचे हा तसा अवघड प्रश्न आहे. परंतु डोळ्याच्या पापणीवर किंवा पापणीच्या कडेवर आलेली पुळी, फोड किंवा गाठीला रांजणवाडी म्हणतात. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. रांजणवाडी का व कशी होते, हे आधुनिक वैद्यकीयशास्त्रामुळे आज आपल्याला स्पष्टपणे समजले आहे. डोळ्यांच्या त्रासामध्ये डोळा येणे,मोतिबिंदू, काचबिंदू, पाझरु,रांजणवाडी असे काही त्रास डोळ्यांना होतात. यापैकी अगदी सगळ्यांनाच कधी तरी डोळ्यांना होणारा त्रास म्हणजे ‘रांजणवाडी’. एखादी पुळी आल्याप्रमाणेच ती दिसते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या बद्धकोष्ठतेवर आहेत काही घरगुती उपाय
आपले पोट नेहमी साफ आणि चांगले असणे खूप महत्वाचे आहे. पोट हा शरीराचा महत्वाचा घटक आहे. आपले पोट साफ नसेल तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकदा बद्धकोष्ठताची समस्या निर्माण होते. किंवा तिला आमंत्रण मिळते. बद्धकोष्ठतेतून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय केले तर त्यातून तुमची सुटका होते. ही समस्या सहजपणे दूर केली जाऊ शकते. त्यासाठी खालील गोष्टी करणे गरजेचे आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जांभूळ आणि त्याच्या बिया आहेत आरोग्यास लाभदायक । नक्की वाचा
जांभळाचे आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. जांभळाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी करण्यात येतो. जांभूळ आहे हे फळ मधुमेह, मुतखडा, अतिसार, मुरडा, संग्रहणी, याकृत रोग आणि रक्तजन्य विकारात अतिशय लाभदायक आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभळाच्या बिया या चूर्णाच्या स्वरूपात देणे सर्वोत्तम उपाय मानला जातो.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB