महत्वाच्या बातम्या
-
Health First | कोरोनापासून वाचण्यासाठी 'या' पदार्थांचं सेवन नक्की करा
कोरोना व्हायरस पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सतत हात स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पुरक आहार घेणं तितकचं महत्तवाचं आहे. ज्या व्यक्तींमध्ये रोगप्रतीकारशक्ती कमी आहे त्यांना कोरोना लवकर बळावण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचा एक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, जीवनसत्त्वे सी, डी आणि बरेच सूक्ष्म पोषक घटक आहेत जे आपले कोरोनापासून संरक्षण करू शकतात. त्यामुळे या परिस्थित योग्य आहार घेणं फार गरजेचं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | Immunity स्ट्रॉग आहे की नाही | लक्षणे जाणून घ्या
कोरोना महामारी काळात ज्या गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधलं ते म्हणजे इम्यूनिटी अर्थात रोग प्रतिकारक शक्ती. आमची इम्यूनिटी व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस सारख्या टॉक्सिन्सला लढा देते आणि आम्हाला सर्दी, खोकला सारख्या व्हायरल संसर्गापासून दूर ठेवण्यास मदत करते. आमची इम्यूनिटी स्ट्रॉग असल्यास लंग्स, किडनी आणि लिव्हर संक्रमण तसेच इतर आजरांपासून बचाव होतो.
4 वर्षांपूर्वी -
जनतेच्या सुरक्षेची काळजी घेणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम | मास्कवरून महापौरांचा टोला
कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा स्फोट महाराष्ट्रात झाला आहे. गेल्या 24 तासांत 43,183 नवीन रुग्ण समोर आले आहेत. कोणत्याही राज्यात कोरोनाची सापडलेली ही सर्वात जास्त प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझील देशांमध्येच फक्त महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे. सध्या मुंबईत कडक नियम लागू करण्याचा देखील सरकार विचार करत आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात एकाच दिवसात तब्बल ३ लाखांहून अधिक नागरिकांना लस
महाराष्ट्रात कोराेनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर जात आहे. राज्यात २८ मार्चला ४०,४१४ रुग्ण आढळले होते. यानंतर ३१ मार्चला ३९,५४४ रुग्ण वाढले. गुरुवारी हा आकडा वाढून पुन्हा ४३,१८३ झाला. महाराष्ट्रात मार्च महिन्यात ६.५१ लाख नवीन कोरोना रुग्ण वाढले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पुणे महापालिका | कोरोनाने घरी मृत्यू झाल्यास नातेवाईकच अंत्यसंस्कार करतील
कोरोना रुग्णांच्या संदर्भात पुणे महानगरपालिकेनं एक नवा नियम आणला आहे. त्यानुसार घरात उपचार घेताना एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला, तर कुटुंबीयांनाच सर्व नियम पाळून त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. त्यासाठीची सर्व प्रक्रिया नातेवाईकच पूर्ण करतील. फक्त गाडीची सुविधा पुरवली जाईल. महापालिकेच्या या नव्या नियमाची माहिती एका वृत्तामुळे समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
वय वर्ष ४५ पेक्षा अधिक | आजपासून कोरोना लसीकरण | हे आहेत तुमचे प्रश्न आणि त्याची उत्तरं
देशात आजपासून ४५ वर्षांवरील सर्व लोक कोरोना लसीचे डोस घेऊ शकतील. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्स, ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेले आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाच लस दिली जात होती. आता या लसीकरण अभियानात सहभागी लोकसंख्या ही कामासाठी बाहेर पडणारी आहे. त्यांना घरात राहणे शक्यच नाही. म्हणूनच १ एप्रिलनंतर भारत जगातील सर्वाधिक लसीकरण करणारा देश ठरेल, असे सरकारला वाटते.
4 वर्षांपूर्वी -
भाजपची सत्ता असलेल्या नाशिक पालिकेत ऑक्सिजन बेड मिळेना | कोरोना रुग्णांवर ठिय्या आंदोलनाची वेळ
भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेत परिस्थिती गंभीर झाली आहे. मात्र महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे कोरोना रुग्णांना जीव देखील गमवावा लागू शकतो असे प्रकार घडत आहेत. तसाच एक भीषण प्रकार नाशिकमध्ये घडल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
फायजरची लस 12 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी 100% परिणामकारक | कंपनीचा दावा
कोरोना लस तयार करणारी फार्मा कंपनी फायजर-बायोएनटेकने दावा केला आहे की, त्यांची लस 12 ते 15 वर्षांच्या मुलांवर 100% परिणामकारक आहे. CNN ने सांगितल्यानुसार, कंपनीने बुधवारी म्हटले की, अमेरिकेत 2,250 मुलांवर झालेल्या फेज थ्री ट्रायल्समध्हे ही लस 100% परिणामकारस असल्याचे सिद्ध झाले आहे. दुसरा डोस दिल्याच्या एका महिन्यानंतर त्यांच्या शरीरात चांगला अँटीबॉडी रिस्पॉन्स पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सीजन आलाय | पण काय आहेत आंब्याचे फायदे आणि तोटे
सध्या बाजारात सर्वत्र आंबे दिसतात. आंबा सर्वांनच्याच आवडीचा फळ आहे. उन्हाळा आणि आंबा हे तर समिकरण तयार झालं आहे. आंबा हे फळ आपण अत्यंत आवडीने खातो. पण आंब्याचे शरीरावर होणारे फायदे आणि तोटे तुम्हाला माहिती आहेत का?
4 वर्षांपूर्वी -
मुंबईमध्ये खासगी रुग्णालयात 80% बेड कोव्हिड रुग्णांसाठी राखीव
बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील कोरोनामुळे बिघडलेल्या परिस्थितीत खासगी रुग्णालयांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, खासगी रुग्णालयांना कोरोना रूग्णांसाठी 80% बेड आणि 100% आयसीयू बेड आरक्षित करावे लागतील. वॉर्ड वॉर रूममधून कोरोना रूग्णांचे बेड वाटप केले जातील. रूग्णांना थेट भरती करण्यास रुग्णालयांना प्रतिबंधित करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतात झालेल्या कोरोना लसीकरणापेक्षा अधिक लसी मोदी सरकारने निर्यात केल्या आहेत हे...
देशात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यातच देशात गेल्या चोवीस तासात 56,119 नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहे. हा आकडा सलग सहाव्या दिवसांपासून सतत वाढतच आहे. त्यामुळे गेल्या चोवीस तासात आढळलेल्या रुग्णांमध्ये 36,983 लोक बरे झाले असून यात 266 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच उपचार घेणाऱ्या लोकांमध्ये 18,883 आकड्यांनी वाढ झाली आहे. देशात सलग सहाव्या दिवसापासून सक्रीय रुग्णांचा आकडा 50 हजारांपेक्षा जास्त आहे. यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांचा आकडा 60 हजारांवर गेलेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
एकाच व्यक्तीचे एकाच लॅबमध्ये दोन दिवसात दोन भिन्न रिपोर्ट | लॅब्स टेन्शन वाढवत आहेत?
एकाबाजूला मुंबईत सलग दुसऱ्या आठवड्यात बांद्रा पश्चिम कोरोनाचा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट आहे. म्हणजेच कोरोनाच्या रुग्णवाढीचा येथे उद्रेक होत आहे. आणि त्या खालोखाल गोरेगाव, चेंबूर पश्चिम, अंधेरी पश्चिम, आणि अंधेरी पूर्व अशी ही 5 महत्वाची, अतिसंसर्गाची आणि पटापट रुग्णवाढीची ही ठिकाण आहेत. एका आठवड्यात जवळपास 1500 ते 2300 इतके रुग्ण या प्रभागात वाढले आहेत. याचाच अर्थ असा की, सगळ्यात जास्त लागण याचं पाच प्रभागात होते. त्यामुळे इथल्या नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.
4 वर्षांपूर्वी -
Breaking | निर्बंधांचे पालन होत नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजनचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्या आता चिंतेचं कारण बनली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हे वाचल्यावर समजतील फायदे | केळ्यावर असे डाग आले म्हणून फेकणार नाही
साधारणपणे केळ्यावर असे डाग दिसले तर लोक त्यास खराब समजून फेकून देण्याची चूक करतात. वास्तविक ही केळी खराब नव्हे तर पूर्णपणे पिकलेली असतात म्हणून त्याला डाग दिसतात. ज्या केळ्यावर हे काळे डाग दिसतात ती खरेतर इतर केळ्यांपेक्षा अधिक पौष्टिक असतात. चला तर पाहूया अशी केळी खाल्ल्याचे फायदे काय काय असतात ते:
4 वर्षांपूर्वी -
लस पुरवठ्यावरून महाराष्ट्र सरकारवर आगपाखड करणाऱ्या केंद्राकडून परदेशात सर्वाधिक पुरवठा
देशात कोरोना संक्रमणानं पुन्हा एकदा वेग घेतलेला दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातून समोर येत आहेत. याच दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारवर लसीकरण आणि लस पुरवठ्यावरून बेजबाबदारपणाचा आरोप केला होता. राज्याला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैंकी ५६ टक्के लसीचा वापरच करण्यात आलेला नाही, असं जावडेकर यांनी म्हटलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
संतापजनक | भारतीयांना नव्हे...तर मोदी सरकारकडून परदेशात सर्वाधिक लसीचा पुरवठा
देशात कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस भयावह होत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी 62,276 नवीन रुग्ण आढळले. 30,341 बरे झाले आणि 292 जणांचा मृत्यू झाला. सर्वात जास्त वाईट परिस्थिती महाराष्ट्राची आहे. येथे एका दिवसात 36,902 संक्रमित आढळले. हा आकडा 11 सप्टेंबरला आलेल्या पहिल्या सर्वोच्च स्तरापेक्षाही दीडपट जास्त आहे. तेव्हा येथे 24,886 प्रकरणे समोर आली होती.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सब्जा बिया खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे
तुळशीचं बी म्हणजेच सब्जा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सब्जामध्ये प्रथिनं, कर्बोदके, अ, क, ई, ब, जीवनसत्व असतात, त्याचप्रमाणे मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं. वारंवार होणाऱ्या अॅसिडिटी, अपचनाच्या त्रासावर सब्जा फायदेशीर आहे यामुळे वजन नियंत्रणात राहतं, पचनशक्ती सुधारते पण त्याचबरोबर त्वचेसाठी आणि केसांसाठीही सब्जा फायदेशीर आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | अजून तरी लॉकडाऊनचा निर्णय नाही | नियम पाळा... उपमुख्यमंत्र्यांकडून अल्टिमेटम
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक या जिल्ह्यांत रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशात राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार की नाही असा प्रश्न लोकांना पडला आहे. दरम्यान, पुण्यात झपट्याने रुग्ण संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन केला जाणार का असा सवाल नागरिकांना पडला असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सध्या तरी लॉकडाऊन करणार नसल्याचे सांगितले आहे. आज (२६ मार्च) पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत रहिवाशी इमारतीत लसीकरण मोहिम राबवण्याचा महापालिकेचा विचार
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आरोग्य मंत्रालयाने बुधवारी महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोनाचा नवा ‘डबल म्युटंट’ व्हेरियंट (प्रकार) सापडल्याचे सांगितले. १८ राज्यांत कोरोनाच्या ३ व्हेरियंटचे ७७१ रुग्ण आढळले आहेत. त्यात ७३६ रुग्ण यूके व्हेरियंट, ३४ रुग्ण दक्षिण आफ्रिकन आणि १ रुग्ण ब्राझिलियन व्हेरियंटचा आहे. हे प्रकार अनेक राज्यांतील १०,७८७ पॉझिटिव्ह नमुन्यांच्या तपासणीत आढळले.
4 वर्षांपूर्वी -
शहाणपण सुचलं? | कोविशील्ड व्हॅक्सिनचा इतर देशांना पुरवठा बंद | देशांतर्गत लसीकरणावर जोर
देशात मागील २४ तासात ५३ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मागील पाच महिन्यात ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. यासोबतच भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ वर पोहोचली आहे. याशिवाय २५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत १ लाख ६० हजार ६९२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या