27 December 2024 7:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Health First | पपई खा आणि वजन घटवा

Papaya, beneficial, weight loss, health article

मुंबई, २८ फेब्रुवारी: ऋतू कोणताही असो पण आपली प्रकृती ही धडधाकट राहायला पाहिजे. सध्या बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकजण वाढत्या वजनानं त्रस्त आहेत. या समस्येवर पपई हे फळ जास्त फायदेशीर ठरू शकतं. पपई रक्त शुद्ध करते पण त्वचा आणि शरीरातील कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासही ती फायदेशीर आहे. (Papaya is beneficial for weight loss health article)

  1. पपईत प्रथिने, खनिजे, ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते. तर पपई पिकताना त्यातील ‘क’ जीवनसत्त्व हे वाढते.
  2. पपईमध्ये पेपेन हा घटक आतडय़ांमधील पाचक रसांची कमतरता, अपायकारक चिकट स्राव व आतडय़ातील दाह कमी करतो. त्यामुळे जेवणानंतर पपई खाल्ली असता अन्नपदार्थ पचण्यास मदत होते.
  3. पपईत क जीवनसत्त्व भरपूर असतं. पपई शरिरातील कॉलेस्ट्रॉलचं योग्य संतूलन राखते. त्यामुळे कॉलेस्ट्रॉल वाढत नाही तसेच अतिरिक्त कॉलेस्ट्रॉलमुळे होणारे आजारही उद्भवत नाही.
  4. पपई ही अतिरक्तदाब, हृदयविकार यामध्ये उपयुक्त आहे.
  5. पपईमध्ये कॅलरी या कमी असतात ज्या वाढतं वजन घटवण्यास उपयुक्त ठरतात.
  6. चेहऱ्याच्या सुंदरतेसाठीसुद्धा पपई गुणकारी आहे. पपईचा किस चेहऱ्यावर लावल्यानं चेहरा उजळतो. तसेच पुटकुळ्या, मुरुमे, सुरकुत्या नाहीशा होतात.
  7. अपचन, आम्लपित्त, बद्धकोष्ठता हे पोटाचे विकार पपईतील पेपेनमुळे दूर होतात.

 

News English Summary: Regardless of the season, your health needs to be strong. Currently, changing lifestyles are having a huge impact on health. Many suffer from weight gain. Papaya can be more beneficial for this problem. Papaya purifies the blood but it is also beneficial in lowering cholesterol in the skin and body.

News English Title: Papaya is beneficial for weight loss health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x