Health first | बटाट्याची साल न फेकता तिचा योग्य वापर करा । सविस्तर वाचा
मुंबई २० एप्रिल : बटाटाची भाजी घरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आवडते. ज्या लोकांना हिरव्या पालेभाज्या खायला आवडत नाहीत, ते आपले संपूर्ण आयुष्य फक्त बटाटे खाऊन घालवतात. बटाटे देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? नुसते बटाटेच नसून बटाट्यांचे साल देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहेत.
बटाट्याच्या सालीत कॅल्शियम, व्हिटामिन सी आणि बी कॉम्पलेक्ससोबतच आयर्न देखील भरपूर असतं. हेच कारण आहे की, हे शरीरातील अनेक कमतरता दूर करतं. त्यामुळे व्याधी दूर राहण्यासाठी बटाट्याची साल फायदेशीर ठरते. आपलं सौंदर्य उजळविण्यासाठी देखील बटाट्याची साल उपयुक्त आहे. डोळ्यांखालील काळे डागापासून ते केस कलर करण्यापर्यंत बटाट्याच्या सालीचा वापर होते. त्यामुळे आता बटाट्याची साल फेकून देणं बंद करा आणि त्यांचा नेमका उपयोग जाणून घ्या.
१. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतं-
बटाट्यात पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असतं आणि हे व्हिटामिन सी ने युक्त असतं. या दोन्ही गोष्टी ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वात फायदेशीर असतात. त्यामुळे बटाट्याचे साल स्वच्छ धुवून आपण हे भाजीसारखं खाऊ शकतात किंवा मग भाजीमध्ये बटाट हा सालीसकट वापरा.
२. वजन नियंत्रणात ठेवण्याचं करतो काम –
बटाट्याच्या सालीत फायबरही असतं. त्यामुळे आपण त्याचं सेवन केल्यास फायबर आपल्या मिळतं. फायबर अधिक असल्याने हे बराच वेळ आपल्याला भूक लागू देत नाही. त्यामुळे आपलं मेटाबॉलिक रेट वाढविण्यासाठी हे उपयुक्त असतं. हे खाल्याने नसांनाही मजबूती मिळते.
३. एनिमियामध्ये आहे फायदेशीर –
बटाट्याच्या सालीमध्ये आयर्न मोठ्या प्रमाणात असतं. हेच कारण आहे की, जर आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर आपण बटाट्याच्या सालीचा जेवणात जरुर वापर करावा. हे एनिमिया असल्यास त्यावरील उपाय म्हणून बटाट्याची साल उपयुक्त असते.
४. भरपूर ताकदवान –
बटाट्याच्या सालीत कॅल्शियम आणि विटामिन असल्याने त्याच्या सेवनाने हाडांना मजबुती मिळते. विटामिन बीमुळे शरीराला ताकद मिळते. त्यामुळे शक्य तेवढ्या वेळा बटाटा हा सालीसकट खाण्याचा प्रयत्न करा.
५. पचनशक्ती बनवतं मजबूत –
बटाट्यात मोठ्या प्रमाणात फायबर असतं. हेच कारण आहे की, तुमची पचनशक्ती देखील यामुळे मजबूत होऊ शकते. यामध्ये फायबर अधिक असल्याने पोटाचे विकार देखील होत नाहीत. त्यामुळे बटाट्याची साल खूपच गुणकारी असल्याचं बोललं जातं.
News English Summary: Potato vegetable is loved by everyone in the house from children to seniors. People who don’t like to eat green leafy vegetables spend their whole lives just eating potatoes. Potatoes are also extremely beneficial for your health. However, do you know this? Not only potatoes but also potato peels are very beneficial for your health.
News English Title: Potato peels are very useful new update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती