Health First | नॉर्मल डिलिव्हरी हवी असेल तर महिलांनी ही काळजी घ्यावी? - नक्की वाचा
मुंबई, ११ जुलै | गर्भावस्थेचा नववा महिना इतर महिन्यांपेक्षा खूप खास व वेगळा असतो. कारण या महिन्यात काहीच दिवस बाकी असतात बाळाला आयुष्यात येण्यासाठी व घर आनंदाने न्हाहून निघण्यासाठी! शिवाय प्रत्येक स्त्रीला आपली डिलिव्हरी अगदी सहज व कोणत्याही वेदनेशिवाय व्हावी असं वाटत असतं. सिझेरियन डिलिव्हरीमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते पण नॉर्मल डिलिव्हरीमध्ये मात्र त्यामानाने शारीरिक त्रास कमी असतो.
म्हणून प्रत्येक महिलेला आपली नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असं वाटतं. यासाठी न जाणो त्या काय काय उपाय आणि प्रयत्न करतात पण योग्य माहिती घेऊन प्रयत्न केल्यास त्यास यश येऊ शकतं. जर तुम्हालाही वाटत असेल की, आपली नॉर्मल डिलिव्हरी व्हावी तर प्रेग्नेंसीच्या नवव्या महिन्यात या काही पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा. अनेकवेळा लेबर पेन सुरू झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावरही गर्भाशयाचे तोंड उघडलेले नसते. यामुळे जास्त वेळ लेबर पेन सहन करावे लागतात. या त्रासाला टाळण्यासाठी महिलांनी काय उपाय करावेत? जाणून घेऊया त्या पदार्थांची माहिती.
हळद:
हळदीमध्ये वेदनाशामक गुण असतात. नवव्या महिन्यात औषधी गुणांचे महत्त्व असलेली हळद वेदनेला कमी करण्याचे काम करते. आठवा महिना संपल्यावर आणि नववा महिना सुरू झाल्यावर पोटात कॉन्ट्रॅक्शन होणे सुरू होते. अचानक पोटात वेदना होतात. अशा वेळी महिलांना अचानक पोट, गुडघे आणि पायांमध्ये वेदना होणे, दुखणे यासारखे त्रास होतात. एक ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्यावे. रोज रात्री झोपण्याआधी दूध प्यावे. नववा महिना सुरू झाल्याबरोबर ही क्रिया सुरू करावी.
आले आणि लसूण:
या दोन औषधी वनस्पतींचा मुळचा गुणधर्म हा गरम असतो. नववा महिना लागल्याबरोबर आले आणि लसणाचे सेवन सुरू करावे. गर्भवती महिला आल्याचा चहा पिऊ शकतात किंवा पाण्यामध्ये आले उकळून ते पाणी पिऊ शकतात. रोज सकाळी उपाशी पोटी लसणाच्या दोन कळ्या खाव्यात. या उपायामुळे नॉर्मल डिलिव्हरीबरोबरच अनेक आजारही टाळता येतात.
कोमट पाणी:
डिलिव्हरीची वेळ जवळ येऊ लागताच मांसपेशींमध्ये किंवा स्नायूंमध्ये ताण निर्माण होण्यास सुरूवात होते. कोमट पाणी ही अडचण दूर करते. त्यामुळे स्नायू मोकळे होतात आणि ताण निर्माण होत नाही. गर्भारपणात थंड पदार्थ खाल्ल्याने आणि प्यायल्याने स्नायू आकसतात. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यास अडचण येते. त्यामुळेच जितके शक्य असेल तितके गर्भवती महिलांनी कोमट पाणी प्यावे.
खजूर:
नवव्या महिन्यात खजूर खाण्याचेदेखील मोठे फायदे आहेत. यामुळे गर्भाशयाचे तोंड उघडण्यास मदत होते. यासाठी एक ग्लास गरम दूध गरम करण्यास ठेवावे आणि तीन ते चार खजूर त्यात टाकावे. दूध चांगले उकळून घ्यावे आणि त्यानंतर ते गाळून प्यावे. याशिवाय नवव्या महिन्यात दूधात तुप टाकून प्यायल्यानेदेखील डिलिव्हरीच्या वेळेस खूप मदत होते. एक ग्लास कोमट दूधात अर्धा चमचा तूप टाकून प्यावे.
या सर्व उपायांबरोबर डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली नियमित व्यायामाचेही मोठे महत्त्व असते. शिवाय योग्य आणि वेळेवर घेतला जाणारा आहारदेखील गर्भारपणातील अनेक अडचणी सोडवण्यास उपयुक्त असतो. गर्भारपणात महिलांनी आपल्या जीवनशैलीकडे नीट लक्ष देऊन त्यात आवश्यक ते बदल करणे गरजेचे असते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Pregnant lady have to eat these food for normal delivery details in Marathi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो