Health First | कपाळावर चंदनी गंध लावल्याने होणारे फायदे जाणून घ्या
मुंबई ३० एप्रिल : हिंदू धर्मात पूजा करताना टिळा लावण्याची प्रथा आहे. पूजाच कशाला इतर मंगल कार्याची सुरूवातही गंध लावूनच करण्यात येते. गंध लावल्याशिवाय कोणतेही मंगल कार्य सुरू होत नाही.कपाळावर टिळा नसणे हे अशुभ मानले जाते. पूजेच्या वेळी कुंकुम टिळा किंवा चंदनाचा टिळा लावतात. हा टिळा कपाळावर किंवा दोन्ही भुवयांच्या मधोमध लावण्याची प्रथा आहे. अनामिकेच्या खालचा भाग हस्तज्योतिषानुसार सूर्यक्षेत्र मानले गेले आहे.
कपाळावर आज्ञाचक्राचे स्थान आहे. सूर्याच्या बोटाने टिळा लावल्याने मुखमंडल सूर्याप्रमाणे तेजस्वी बनू लागते. तसेच आज्ञाचक्रही जाग्रत व्हायला मदत होते. यामुळे मनाची एकाग्रता वाढायला मदत होते. टिळा लावणारा यशस्वी आणि ओजस्वी बनतो.
कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याचे आरोग्यदायी महत्त्व:
पूजाविधींमध्ये कपाळावर टिळा लावण्याची प्रथा आहे. भारतात नियमित देवपूजेमध्येदेखील चंदनाचा वापर केला जातो. परंतू आपल्या प्राचीन संस्कृतींनादेखील विज्ञानाचा आधार आहे.
मग जाणून घ्या चंदनाच्या टिळा लावण्यामागील आरोग्यदायी कारण ….
वैज्ञानिक आधार
कपाळावर दोन भुवयांमध्ये ‘अग्न’ चक्राचे स्थान असते. या स्थानालाच ‘तिसरा डोळा’ म्हणतात. हे एक उर्जास्थान असल्याने अध्यात्मात या स्थानाला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याची प्रथा आरोग्यदायीदेखील ठरते.
चंदनाच्या टिळ्याचे फायदे:
एकाग्रता सुधारते
आध्यात्मिक गुरू श्री श्री रवी शंकर यांच्या मते, तिसरा डोळा हा शरीरात एकाग्रता वाढवण्याचे केंद्रस्थान आहे. चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यास मन स्थिर होण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. थंड प्रवृत्त्तीचे चंदन शरीरात आणि कालांतराने मनाला शांतता मिळवण्यास मदत करते.
डोकेदुखीपासून आराम मिळतो
चायनिज अॅक्युप्रेशरनुसार दोन्ही भुवयांमधील जागा ही शरीरातील नसा एकत्र मिळण्याची जागा समजली जाते. त्यामुळे या ठिकाणी मसाज केल्यास डोकेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच या ठिकाणी चंदनाचा टिळा लावल्यास नसांमध्ये थंडावा निर्माण झाल्याने डोकेदुखीच्या त्रासापासून त्वरीत आराम मिळण्यास मदत होते.
सकारात्मक बनवते
तिसर्या डोळ्याचे स्थान हे अंतर्मन आणि विचारांचे केंद्रस्थान आहे. नकारात्मक विचारातून शरीरात येणारी नकारात्मक भावना या चक्राच्या माध्यमातून आत येते. मात्र चंदनाच्या टिळ्यामुळे त्यांना रोखण्यात यश येते.
निद्रानाश आणि ताण-तणावापासून आराम
अतिथकवा, मानसिक ताण किंवा अतिउत्साही मनामुळेदेखील निद्रानाश होण्याची शक्यता असते. आयुर्वेदानुसार कपाळावरील या स्थानावर चंदनाने मसाज केल्यास ताण कमी होण्यास तसेच निद्रानाशाच्या समस्येवर मात करण्यास मदत होते.(रात्री झोप येत नाही? मग हे १० उपाय करून पहा !)
शरीरात थंडावा निर्माण होतो
चंदनामध्ये मंद सुवासाप्रमाणेच शरीरात थंडावा निर्माण करण्याची क्षमतादेखील आहे. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. सोबतीलाच नसांनादेखील थंडावा मिळतो. भारतासारख्या उष्णकटीबंधीय क्षेत्रात कपाळावर चंदन लावणे तुमच्या सार्या शरीराला थंड करण्यास मदत करते.
News English Summary: In Hinduism, it is customary to wear Tilak during worship. Why is it that worship and other good deeds are started by smelling? No mangal work starts without smelling. It is considered inauspicious not to have tilak on the forehead. Kunkum tila or sandalwood tila is planted during pooja. It is customary to apply Tilak on the forehead or between the eyebrows. The lower part of Anamika is considered to be the Sun Zone according to astrology.
News English Title: Reasons for using sandalwood tila on forehead news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा