27 December 2024 7:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Health First | दारूचे व्यसन लग्न केल्यामुळे कमी होते? | वाचा सविस्तर

alcohol addiction marriage

मुंबई, 19 जून | तुम्हाला दारू पिण्याचे भयंकर व्यसन जडलं असेल आणि त्याचे दुष्परिणाम पाहून तुम्ही दारू सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात. दारू सोडणं ही एक महाकठीण गोष्ट आहे. कारण पहिल्यांदा माणूस जाणिवपूर्वक दारूला जवळ करतो आणि नंतर दारू माणसाला काही केल्या सोडत नाही. यासाठीच योग्य वेळीच प्रयत्नपूर्वक दारू सोडण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. दारू सोडण्यासाठी प्रत्येकवेळी व्यसनमुक्ती केंद्रात जाण्याची आवश्यक्ता नाही. जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही कुटुंबाच्या मदतीने स्वतःच दारूचे व्यसन सोडू शकता.

सध्याच्या घडीला दारू पिणे हे अनेकांचा शौक नाही तर, व्यसन बनले आहे. काही लोक तर, दारूच्या एवढे आहारी जातात की, त्यांना दारू पिल्याशिवाय काहीच सुचत नाही. दारूचे व्यसन असलेल्या माणसाला त्याचे संपूर्ण कुटूंब वैतागलेले असते. म्हणूनच अनेक उपाय अशा व्यक्तिंचे दारूचे व्यसन सोडविण्यासाठी केले जातात. दारू सोडविण्याबाबत जगभरात अभ्यास सुरू आहे. दरम्यान, भलतेच निरीक्षण वर्जिनिया यूनिवर्सिटीने केलेल्या एका अभ्यासातून पूढे आले आहे. या अभ्यासात सेक्स आणि दारू याबाबतही आश्चर्यकारक निरिक्षण नोंदविण्यात आले आहे.

वर्जिनिया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, दारूच्या घाणेरड्या व्यसनापासून आपल्याला सुटका मिळवायची असेल तर, लवकर लग्न करा. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, विवाहीत लोक हे अविवाहीत किंवा घटस्फोटीत तसेच, एकटे जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या तूलनेत कमी प्रमाणात दारूचे व्यसन करतात. त्यातही विवाहीत लोकांनी दारूचे व्यसन केलेच तर, ते ऑकेजनली किंवा अगदीच कमी मात्रेत असते. यात महिला आणि पूरूष अशा दोघांचाही समावेश आहे. अविवाहीत तसेच, सिंगल जीवन जगणारी व्यक्ती मात्र, दारू अधिक मात्रेत आणि नियमीत प्रमाणात पित असते. विवाहीत लोक शरीरसंबंधास (सेक्स) अधिक महत्व देतात. त्यामुळे दारूच्या व्यसनाचा विसर पडतो असेही या अभ्यासात म्हटले आहे.

दरम्यान, एक अभ्यासक डायना डीनेस्कु यांनीही दारूचे व्यसन सोडविण्यासंबंधीचे वर्जिनीया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासासाशी मिळतेजुळते मत व्यक्त केले आहे. डीनेस्कु यांच्या मते, दारूच्या व्यसनाचे प्रमाण विवाहीत जोडप्यांमधील शारीरिक संबंधांमुळे कमी होते. एवढेच काय ते सुटल्यातच जमा होते. दरम्यान, याच विषयी करण्यात आलेल्या एका सर्व्हेतही ही बाब ठळकपणे पूढे आली आहे. पण डायना डीनेस्कु यांच्या विधानामुळे एक नवाच गोधळ निर्माण होतो आहे तो असा की, विवाहीत जोडप्यांनी सेक्सला महत्व दिल्यामुळे दारूचे व्यसन कमी होते की, दारू कमी पिणाऱ्या व्यक्तिंच्याच लग्नाचे प्रमाण अधिक आहे.

यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार, वॉशिग्टन येथे झालेल्या संशोधनाचा काही डेटा अभ्यासकांनी अभ्यासासाठी वापरला आहे. जो डेटा दारू, सेक्स आणि विवाहीत जोडपी यांच्या वर्तन आणि स्वभावाशी संबन्धित आहे. या सर्वेक्शनात १६१८ महिला तर, ८०७ पूरूष सहभागी झाले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Researcher says due to alcohol addiction marriage is less news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x