21 April 2025 10:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

कोव्हिशील्ड लस द्या | कोव्हॅक्सीन टोचून घेण्यास डॉक्टरांचा नकार

Resident doctors, Ram Manohar Lohia, Covaxin

मुंबई, १६ जानेवारी: संपूर्ण वर्षभर कोरोनासारख्या जागतिक महामारीशी लढा दिल्यानंतर आता अखेर देशवासियांना काहीसा दिलासा मिळणार असून कोरोना लसीची प्रतीक्षा आता अखेर संपली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात आजपासून (१६ जानेवारी) लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज राज्यव्यापी लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी ११.३० वाजता मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) कोविड केअर सेंटरमध्ये या लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे. राज्यात आज पहिल्याच दिवशी तब्बल २८ हजार ५०० कोरोनायोद्ध्यांना लस दिली जाणार आहे.

दुसरीकडे दिल्लीत राम मनोहर लोहिया रुग्णालयात लशीकरणाची मोहीम सुरू होण्याआधीच मोठी घडामोड समोर आली आहे. रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी ‘कोव्हॅक्सीन’ ऐवजी ‘कोव्हिशील्ड’ लस टोचली जावी अशी मागणी करणारं पत्र रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना लिहीलं आहे.

दरम्यान, याबाबत रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. डॉक्टरांनी लिहिलेल्या पत्रानुसार, राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कोव्हिशील्ड लशीची मागणी केली आहे. “रुग्णालयात आजपासून कोरोना लशीकरणाची मोहिम सुरु करण्यात येत असल्याचं आम्हाला कळलं. पण यात भारत बायोटेकने विकसीत केलेल्या कोव्हॅक्सीनची लस निवासी डॉक्टरांना देण्यात येणार आहे. पण कोव्हॅक्सीनच्या चाचण्या पूर्ण न झाल्यामुळे डॉक्टरांना या लशीबाबत काही शंका आहेत. याशिवाय यामुळे लशीकरणाचा मुख्य उद्देश देखील साध्य होणार नाही. त्यामुळे कोव्हॅक्सीन ऐवजी कोव्हिशील्ड लस डॉक्टरांना दिली जावी”, असं डॉक्टरांनी पत्रात नमूद केलं आहे.

सिरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठानं संयुक्तरित्या निर्मी केलेल्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसींचा यात समावेश आहे. या लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीला सिरम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनीही आज लस टोचून घेतली आहे.

 

News English Summary: A major development has taken place at the Ram Manohar Lohia Hospital in Delhi even before the vaccination drive began. The resident doctor of the hospital has written a letter to the medical superintendent of the hospital demanding that the covachield vaccine be given instead of the COVAXIN vaccine.

News English Title: Resident doctors of Ram Manohar Lohia hospital refusing take Covaxin News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या