22 January 2025 1:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

अँटीबॉडी आणि कोरोना संदर्भात ICMR'चा गंभीर इशारा | पहा काय म्हटलंय

Risk corona, Antibody depletion, ICMR warning, health updates

नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर: कोरोना व्हायरसच्या नवीन केसेस कमी होऊ लागल्या आहेत. मंगळवारी 47 हजारावर नवीन रुग्ण सापडले होते. तर आज हा आकडा पुन्हा वाढला असून 54,044 नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. मृतांची संख्या कमी होत आहे. असे असले तरीही आयसीएमआरने मोठा इशारा दिला आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णाच्या शरीरामध्ये अँटीबॉडी बनू लागते. यामुळे कोरोना बरा होत आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतीयांमध्ये अँटीबॉडी बनण्याचे प्रमाण मोठे आहे. मध्यंतरीच्या संशोधनात भारतात लहानपणी लसीकरण होत असल्याने कोरोनाचा धोका कमी असल्याचे सांगितले जात होते. कोरोना झाल्यानंतर अँटीबॉडी वाढतात आणि कोरोना व्हायरसला विरोध करतात. मात्र, कालांतराने या अँटीबॉडी कमी होण्याची शक्यता असते. असे झाल्यास पुन्हा कोरोनाची लागण होण्याचा इशारा आयसीएमआरने दिला आहे.

दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होत नाही असे म्हणणे चुकीचे असल्याचेही आयसीएमआरने म्हटले आहे. यामुळे लोकांनी सावधानता बाळगावी, असा सल्ला देण्यात आला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 54,044 नवे रुग्ण सापडले आहेत. तर एकूण रुग्णांचा आकडा हा 76,51,108 वर पोहोचला आहे.

दरम्यान, करोनावरील लस संशोधन निर्णायक टप्प्यात आहे. लवकरच करोनावरील लस उपलब्ध होईल. पण लस उपलब्ध झाल्यानंतर प्राधान्यक्रम कसा ठरवायचा ? हेच सर्व देशांसमोरील मुख्य आवाहन असेल. भारतात लशीच्या व्यवस्थापनासंदर्भात एक राष्ट्रीय तज्ज्ञांची समिती बनवण्यात आली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर पहिले डोस कोणाला द्यायचे? या दृष्टीने या समितीचे आराखडा बनवण्याचे काम सुरु आहे.

भारताकडे आज लस उपलब्ध असेल तर, सरकार तीन कोटी लोकांना लगेच लशीचे डोस द्यायला तयार आहे, असे आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्याने म्हटले आहे. “पहिल्या टप्प्यात ढोबळ मनाने तीन कोटी लोकांचे लशीकरण करावे लागेल, असा आमचा अंदाज आहे. यात ७० ते ८० लाख डॉक्टर्स आणि दोन कोटी आरोग्य सेवक आहेत” असे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

करोना व्हायरस विरोधात लस उपलब्ध झाल्यानंतर लवकरात लवकर कोणाला लस मिळाली पाहिजे? कोणाला पहिले प्राधान्य मिळाले पाहिजे? त्यावर लशी संदर्भात बनवण्यात आलेली तज्ज्ञांची समिती आराखडा तयार करतेय.

 

News English Summary: In a worrying development, the Indian Council of Medical Research (ICMR) on Tuesday informed that three cases of COVID-19 re-infection have been reported in the country. While two of them were reported from Mumbai, one person re-infected the deadly virus in Ahmedabad. ICMR Director General, Balram Bhargava, while highlighting inputs on the COVID-19 re-infection said that the time limit for re-infection was fixed at 100 days as many studies on the coronavirus have revealed that antibodies usually remain present in a person’s body for nearly four months.

News English Title: Risk corona after antibody depletion ICMR gives serious warning health updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x