27 December 2024 7:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Health First | भाजलेले चणे खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे | वाचा सविस्तर

Roasted Chans

मुंबई, १५ जून | बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे आयुष्य हे औषधांवर अवलंबून असते. सर्दी, खोकला किंवा अशाच क्षुल्लक कारणांसाठीही लोक चटकन औषध घेतात. पण सुरुवातीपासूनच शरीराकडे लक्ष दिले तर ते नेहमीच आरोग्यपूर्ण, निरोगी राहते. यासाठी रोजचा आहार आरोग्यपूर्ण असणे अतिशय महत्त्वाचे आहे. पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यानेच शरीर तंदुरुस्त राहते. संध्याकाळच्या वेळी बहुतांश लोकांना गरम खाणे आवडते. अशावेळी भजी किंवा शेंगदाणे तोंडात टाकण्याऐवजी भाजलेले चणे खाणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे.

तुम्ही भाजलेले चणे खाल्लेच असतील. केवळ स्वाद म्हणून तुम्ही जर चणे खात असाल तर दररोज चणे खाण्यास सुरुवात करा. कारण हे चणे खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. भाजलेल्या चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन आणि व्हिटामिन असते. भाजलेल्या चण्याचे आरोग्यासाठी इतके फायदे आहेत तर दररोज किती प्रमाणात त्याचे सेवन करावे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. त्याचेही उत्तर आहे आमच्याकडे. वसंत कुंज स्थित इंडियन स्पाइनल इंजरी सेंटर की सीनियर डायटीशियन डॉ. हिमांशी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने दररोज ५० ते ६० ग्रॅम चणे खाल्ले पाहिजेत. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

जाणून घ्या भाजलेले चणे खाण्याचे फायदे:

प्रतिकारक्षमता वाढते:
दररोज नाश्त्यामध्ये अथवा जेवणाच्या आधी ५० ग्रॅम भाजलेले चणे खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. रोगप्रतिकारक क्षमता वाढल्याने अनेक आजारांपासून रक्षण होते. तसेच ऋतू बदल झाल्याने शारिरीक समस्याही दूर होतात.

लठ्ठपणा कमी होतो:
जर तुम्ही लठ्ठपणाने ग्रस्त असाल तर भाजलेले चणे खाणे फायदेशीर ठरते. दररोज भाजलेले चणे खाल्ल्याने लठ्ठपणाच्या समस्येवर मात करता येते. याच्या सेवनाने शरीरातून अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

युरिनसंबंधीच्या समस्या दूर होतात:
भाजलेले चणे खाल्ल्याने युरिनसंबंधीच्या समस्या दूर होतात. ज्यांना सतत लघवीला होत असेल त्यांनी चणे आणि गूळ खावे. काही दिवसांतच आराम पडेल.

नपुंसकता दूर होते:
भाजलेले चणे मधासोबत खाल्ल्याने नपुसंकता दूर होते. एखाद्या पुरुषाचे वीर्य पातळ असेल तर चणे खाल्ल्याने फायदा होतो.

बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते:
ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा व्यक्तींनी नियमितपणे चण्याचे सेवन करावे. यामुळे आराम मिळतो. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास तुम्हाला दिवसभर आळसावल्यासारखे वाटते.

पाचनशक्ती वाढते:
पाचनशक्ती वाढवण्यासाठी दररोज चण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यामुळे रक्त शुद्ध होते. तसेच त्वचा उजळते. चण्यामध्ये फॉस्फरस असते ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते.

मधुमेहावर गुणकारी:
भाजलेले चणे खाल्ल्याने डायबिटीजच्या रुग्णांना फायदा मिळतो. भाजलेले चणे ग्लुकोजची मात्र कमी करतात. डायबिटीजच्या रुग्णांनी नियमितपणे चणे खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Roasted Chans are healthy health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x