23 February 2025 8:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Sinus Infection Symptoms | 'सायनस' मध्ये त्रास कसा वाढू शकतो? | कारणं आणि उपचार - नक्की वाचा

Sinus infection symptoms

मुंबई, १५ ऑगस्ट | आपल्या कवटीच्या हाडांमध्ये कपाळ, नाक आणि गाळाच्या ठिकाणी काही पोकळ भाग असतात, त्या पोकळ भागांना सायनसेस म्हणतात. या मध्ये एक पातळ आणि वाहणारा द्रव पदार्थ तयार होत असतो आणि त्याला म्युकस असे म्हणतात. काही वेळेला हा द्रवपदार्थ जास्त झाल्यास नाकावाटे बाहेर (Sinus Infection Symptoms) येऊ लागतो.

Sinus Infection Symptoms. Sinusitis or sinus infection is inflammation of the air cavities within the passages of the nose. Sinusitis can be caused by infection, allergies, and chemical or particulate irritation of the sinuses. Most people do not spread sinus infections to other people :

मात्र काहीवेळेला हा द्रवपदार्थ नाकावाटे बाहेर न येत तसाच साठून राहतो. अशावेळेला इन्फेकशन, व्हायरस होऊन सायनसला सूज येते अशा परिस्थितीला सायनुसायटिस असे म्हणतात. याची कारणे अनेक आहेत जसे की थंड हवामान, एसीचा जास्त वापर, थंड पाणी पिणे, नाकातील हाड वाढणे, वायुप्रदूषण, धूम्रपान, यामुळे सायनसचा त्रास वाढू शकतो. सायनसचे एकूण चार प्रकार आहेत. सायनुसायटिसचे निदान करण्यासाठी डॉक्टर्स काही तपासण्या किंवा एमआरआय करायला लावतात.

यावरील उपचार हे सायनस मध्ये इन्फेकशन कशामुळे झाले आहे हे तपासल्यानंतर करतात. काहीवेळाला डोकेदुखी होत असल्यास वेदनाशामक गोळ्या दिल्या जातात. घरगुती उपचारांमध्ये लसूण चावून खाल्ल्याने बरे वाटते अथवा सुंठ आणि वेखंडचा लेप घेतल्यानेसुद्धा बरे वाटते. सायनसचा त्रास होऊ नये थंड पाणी पिऊ नये, गरम पाणी घ्यावे, जास्त वेळा पाणी प्या.

सायनसच्या समस्येमध्ये बहुतेक लोक औषधे, इन्हेलर्स इत्यादी उपचार घेतात. परंतु आपणास माहित आहे का की सायनसच्या समस्येवर घरगुती उपचार देखील प्रभावी असतात. आज आम्ही आपल्याला असेच काही उपाय सांगणार आहोत. संक्रमण, ऍलर्जी, सर्दी-पडसं आणि केमिकल इरिटेशनमुळे सायनस होऊ शकतं. या मुळे बऱ्याच समस्या होऊ शकतात.

चेहरा मध्ये नमी, ताप
कान आणि दातात दुखणं
नाकाने श्वासोच्छ्वासाच्या समस्या, घसा खवखवणे,
चेहऱ्यावर सूज येणं.

* वाफ घेणे:
सायनसच्या त्रासात नेहमीच नाकातून पाणी येतं. यासाठी वाफ घेणं फायदेशीर राहत. एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि टॉवेलचा वापर करून तोंड पूर्ण झाकून घ्या. जशी-जशी गरम पाण्याची वाफ नाकात शिरेल आपले बंद असलेले नाक परत उघडणार. वाफ घेतल्यानं आपल्याला आराम मिळेल. आपण या पाण्यात विक्स किंवा पुदिन्याचे पान देखील घालू शकता.

* गरम पेय पदार्थ घेणं:
सायनसचा त्रास असल्यास गरम पेयांचे सेवन घेतल्यानं बंद नाक उघडते. आयुर्वेदिक चहा किंवा काढा घेतल्यानं फायदा होतो. सायनसचा त्रास असल्यास मद्यपान करणे हानिकारक असू शकतं.

* चेहऱ्यावर गरम टॉवेल ठेवा:
सायनसच्या त्रासात बहुतेकदा नाक बंद होते. त्यामुळे डोकं जड होतं, अश्या परिस्थितीत टॉवेल भिजवून आपल्या चेहरा झाकून घ्या. असे केल्यानं आपल्याला या त्रासापासून आराम मिळेल.

* पुरेशी विश्रांती:
बऱ्याच काळ बसून काम केल्याने सायनसचा त्रास अधिक वाढतो. सायनसाच्या त्रासापासून त्वरित आराम मिळविण्यासाठी जास्तीत जास्त विश्रांती घ्यावी.

Heath Title: Sinus infection symptoms in Marathi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x