24 November 2024 5:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Health First । 'पोटातील अल्सर' । पोटात अल्सर झाल्यास शरीर देतं ‘हे’ विचित्र संकेत - नक्की वाचा

Stomach Ulcer symptoms in Marathi

मुंबई, १८ ऑगस्ट | पोटातील अल्सर हा आजार पोटात अत्यंत वेदना, भूक न लागणे आणि वजन कमी होणे यावरून ओळखता येतो. हे फोड लहान आतड्यामध्ये विकसित होतात. हा आजार अनेकदा जिवाणूच्या उपस्थितीमुळे निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा गुंतागुंतीची आणि तीव्र लक्षणे असणाऱ्या लोकांना एंडोस्कोपीचा सल्ला दिला जातो.

याचे सामान्य लक्षण म्हणजे सौम्य वेदना आणि पोटात जळजळ होणे आहे. पोट फुगल्यासारखे वाटणे, सतत आजारी असल्याची जाणीव ,वजन कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात. यावरील उपचार हे अल्सरच्या कारणावर अवलंबून असते. साधारणपणे पीपीआयची औषधे सांगितली जातात. जे पोटात आम्लाचे प्रमाण कमी करते. जर या अल्सरचे कारण जिवाणूंचे संक्रमण असेल तर प्रतिजैविके दिली जातात.

आपल्या जीवनशैलीत बदल करून आणणे फार गरजेचे असते. मसालेदार पदार्थ आणि चिंता यामुळे अनेकदा असलेल्या लक्षणांमध्ये भर पडू शकते. लक्षणांच्या उपचारासाठी घरगुती पद्धत म्हणजे दूध घेणे होय पण रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी दूध हे प्रभावी नाही. याशिवाय धूम्रपान आणि मद्यपान टाळणे गरजेचे आहे. योग्य त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे.

अशी ३ लक्षणे जाणून घेऊया जे आपल्याला अल्सर असल्याचे सांगतात:
१. आळस, अपचन व छातीत जळजळ:
पोटाच्या अल्सरचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे सतत आळस येणं किंवा पोटात जळजळ होणं हे आहे. ही वेदना सहसा आपले पोट रिकामी असते तेव्हा होते. हे काही काळ किंवा जास्त काळापर्यंत देखील राहू शकते. आपल्याला अपचन किंवा छातीत जळजळ अशा समस्या जाणवत असतील तर अल्सर असू शकतो. जेव्हा पोटातील आम्ल किंवा अॅसिड इसोफॅगस म्हणजेच अन्ननलिकेत वाहत जाते तेव्हा हृदयाच्या जवळ किंवा पोटाच्या वरील भागात जळजळ होऊ लागते. त्यामुळे अपचन, पोटदुखी किंवा जळजळ अशा कोणत्याही समस्या सतत व जास्त काळ जाणवत राहिल्या तर ताबडतोब डॉक्टरांची भेट घ्या.

२. मळमळ, उलटी व शौचाच्या रंगात बदल:
सकाळी बराच वेळ उपाशी राहिल्यानंतर जर आपल्याला उलट्या किंवा मळमळ अशा समस्या होत असेल तर हे एक अल्सरचे लक्षण आहे. शौचाच्या रंगात बदल होणे किंवा शौचातून रक्तस्त्राव होणे हे देखील पोटातील अल्सरचेच एक लक्षण असू शकते. रक्तस्त्राव अल्सर ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे. म्हणूनच जर कधी अशी परिस्थिती उद्भवली तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.

३. कोणत्याही कारणाविना वजन कमी होणे:
जर कोणतंही कारण नसताना देखील वजन कमी होत असेल तर ते अल्सरचे लक्षण असू शकते. जितक्या लवकर हे समजले जाईल तितके चांगले आहे. कधी कधी पोटातील अल्सरमुळे आलेल्या सूजेमुळे पचन क्रियेत देखील अडथळे निर्माण होतात. हे अन्न आपल्या पोटापर्यंत पोहचण्यास प्रतिबंध करतं किंवा थांबवतं. ज्यामुळे वारंवार भूक लागते. त्याचबरोबर वजन देखील कमी होऊ लागते.

पोटातील अल्सरवर उपचार काय?
याचे उपचार अनेकदा अल्सरच्या कारणावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, हॅलिकोबॅक्टर पायलोरीमुळे अल्सर झाला असल्याचं लक्षात येताच या बॅक्टेरियाचा नाश करण्यासाठी अॅंटिबायोटिक्स औषधे दिली जातात. याशिवाय औषधे देखील पोटातील अल्सर कमी करण्यास मदत करतात. या प्रकरणात डॉक्टर आपल्या जीवनशैलीत काही बदल करण्याचा सल्ला देतात. जसे की दारू पासून चार हात लांब रहा आणि स्ट्रेस कमी घ्या इत्यादी. गंभीर प्रकरणांमध्ये बर्‍याच वेळा शस्त्रक्रिया करणे देखील आवश्यक असते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Stomach Ulcer symptoms in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x