Health First | उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घ्या त्यासाठी काही खास टिप्स
मुंबई ८ मे : उन्हाळ्यामध्ये त्वचेच्या टॅनिंगमुळे अनेकजण त्रस्त असतात. उन्हाळ्यात आपल्याला चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वाढत्या तापमानाचा परिणाम त्वचेवर होत असून तेलकट टी झोन, टॅनिंग, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता असते. त्वचेवरील मुरुमांची समस्या असलेल्या व्यक्तीनी उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी.
अनेक वेळा असं होतं की, जेव्हा व्यक्ती त्वचेसंबंधीच्या त्रासाकडे दूर्लक्ष करतात. मात्र त्याचा त्यांना अधिक परिणाम सहन करावा लागतो. त्यामुळेच जर आपण काही टिप्स लक्षात ठेवल्या आणि त्याचा वापर केला तर अशाप्रकारच्या त्रासापासून आपण उन्हाळ्यात दूर राहू शकतो. उन्हाळ्यात सर्वप्रकारच्या त्वचेची योग्य काळजी घेणं आवश्यक असतं. अशातच त्वचेला मॉइश्चराईज करणं आवश्यक असतं आणि हेच उत्तम त्वचेसाठीच पहिलं पाऊल आहे. मॉइश्चराइजर आंघोळीनंतर लावावं, त्यामुळे त्वचेत आर्द्रता कायम राहते आणि शरीर हायड्रेट होत राहतं. मात्र यावेळी आपण आपली त्वचाप्रकार पाहून मॉइश्चरायजरचा वापर करावा. आपली त्वचा तेलकट, ड्राय, नॉर्मल असू शकते. अशातच मॉइश्चरायजर त्वचाप्रकार बघून वापरावं.
खालील स्टेप्सच्या मदतीनं दररोज आपली त्वचा करा मॉइश्चराइज
१. सर्वात प्रथम आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉश वापरा. ऑईली स्कीन असणाऱ्यांनी फेसवॉशबाबत विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या ब्रँड्सचे फेसवॉश मिळतात, मात्र आपल्या त्वचेचा प्रकार बघून ते घ्यावेत. फेसवॉश जर त्वचेला सूट करत असेल तरच आपण इतर त्रासापासून वाचू शकता.
२. फेसवॉशचा वापर करण्यापूर्वी आपला चेहरा कोमट पाण्यानं धुवावा. कोमट पाण्यानं चेहरा धुतल्यास त्वचेचे पोर्स ओपन होतात. यानंतर फेसवॉश लावावा, यादरम्यान चेहरा खूप चांगल्या पद्धतीनं थंड पाण्यानं धुवावा. थंड पाण्यानं चेहरा धुतल्यास त्वचेवरील पोर्स पुन्हा बंद होतात.
३. आंघोळ करतांना आपल्या त्वचेनुसार साबण आणि बॉडी क्लींजरचा वापर करावा. यामुळे आपली त्वचा ड्राय होणार नाही. असे अनेक प्रॉडक्ट आहेत, ज्यात केमिकल असतात आणि त्याच्या वापरानं त्वचा खराब आणि रुक्ष होते.
४. आंघोळीनंतर लगेच काही मिनीटांमध्ये त्वचेवर मॉइश्चरायजर लावाणं विसरू नये आणि आंघोळीनंतर संपूर्ण शरीराला मॉइश्चराईज करावं. त्यामुळे त्वचेतील आर्द्रता कायम राहते आणि त्वचा कोरडी पडत नाही.
५. एकदा मॉइश्चराईज केल्यानंतर आपण सन्सस्क्रीन लावू शकता. याशिवाय उन्हाळ्यात लाईट मेकअप पण करू शकता. जर आपण सतत उन्हात जात असाल तर सन्सस्क्रीनच्या मदतीनं त्वचा टॅन होणार नाही.
New English Summary: Many people suffer from skin tanning in summer. In summer you have to take special care of your face. Rising temperatures affect the skin and can lead to oily T zones, tanning, acne, pimples and breakouts. People with acne problems should take special care when going out in the sun.
News English Title: Take care of skin in summer news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY