23 February 2025 2:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

खासगी रुग्णालयात लस | मोदींच्या घोषणेतील दर १५० रुपये | प्रत्यक्ष दर ७८०, १४१० आणि ११४५ रुपये

Vaccination

नवी दिल्ली, ०९ जून | केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित केले आहेत. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी हे आदेश काढले. त्यानुसार सिरमची कोविशील्ड लस प्रतिडोस जास्तीत जास्त ७८० रुपयांना, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन १,४१० रुपयांना तर रशियाची स्पुटनिक-व्ही लस १,१४५ रुपयांपेक्षा अधिक दराने दिली जाणार नाही.

यासोबतच केंद्र सरकारने २१ जूनपासून लागू होत असलेल्या राष्ट्रीय कोरोना लसीकरणाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यानुसार, केंद्र सरकार लसनिर्मात्या कंपन्यांकडून राज्यांच्या कोट्यातील २५ टक्केसह ७५ टक्के डोस स्वत: खरेदी करेल आणि राज्यांना मोफत देईल. हे वाटप लोकसंख्या, कोरोनाचे रुग्ण आणि लसीकरणातील प्रगती या आधारे केले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशातील १८ वर्षांवरील सर्व लोकांना मोफत लस दिली जाणार असल्याची घोषणा केली होती. शिवाय जे लोक खासगी रुग्णालयात पैसे देऊन लस घेऊ इच्छित आहेत अशांना सेवा शुल्क म्हणून १५० रुपयांपेक्षा अधिक रक्कम घेता येणार नाही, असेही जाहीर केले होते. राज्यांनी लस वाया जाऊ नये याची पुरती खबरदारी घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. याशिवाय खासगी रुग्णालयांना कंपन्या थेट लसीचा पुरवठा करू शकतील, अशी सूटही देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना:
१. जिल्हा आणि लसीकरण केंद्रांना अगोदर लसीचा पुरवठा व्हावा.
२. जिल्हा व केंद्रांवर किती लस उपलब्ध आहे ही माहिती सार्वजनिक डोमेनवर असावी.
३. याबाबत जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहचवावी. जेणेकरून लोकांना अधिक सुविधा मिळू शकेल.
४. आरोग्य व फ्रंटलाइन वर्कर्सना अगोदर लस देण्यास प्राधान्य दिले जाईल.
५. ४५ वर्षांवरील लोकांना दुसरा डोस देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.
६. नंतर १८ वर्षांवरील लोकांना लसीकरणास प्राधान्य दिले जावे.

 

News English Summary: The central government has fixed vaccine rates for private hospitals. The health ministry issued the order on Tuesday. Accordingly, the covshield vaccine of serum will be given at a maximum rate of Rs 780 per dose, the covacin vaccine of Bharat Biotech at Rs 1,410 and the Sputnik-V vaccine of Russia at a higher rate of Rs 1,145.

News English Title: The central government has fixed vaccine rates for private hospitals news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x