कोरोना आपत्ती | देशासाठी पुढील चार आठवडे अत्यंत महत्त्वाचे - केंद्र सरकार
नवी दिल्ली, ७ एप्रिल: महाराष्ट्रात १६ मार्च २०२० रोजी मुंबईत कोरोनाचा पहिला बळी गेला. मार्च २०२० ते पाच एप्रिल २०२१ या काळात राज्यात कोरोनामुळे ५६,०३३ मृत्यू झाले आहेत. याच काळात राज्यातील १४ जिल्हे असे आहेत, जेथे कोरोनाने झालेल्या मृत्यूंची संख्या एक हजाराहून जास्त आहे. सर्वाधिक ११,८०० मृत्यू मुंबई जिल्ह्यात झाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात ८४४० कोरोना बळी असून ठाणे जिल्ह्यात ६१३६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
या १४ जिल्ह्यांत एकूण ४७,१३९ कोरोनाचे मृत्यू झाले आहेत. राज्यातील एकूण मृत्यूंच्या ८४.१२ टक्के मृत्यू या १४ जिल्ह्यांतील आहेत. कोरोनाचे एक हजाराहून जास्त मृत्यू असलेल्या जिल्ह्यांत कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर हे चार जिल्हे, प. महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा , कोल्हापूर व अहमदनगर हे सहा जिल्हे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व जळगाव हे दोन जिल्हे, मराठवाड्यातील औरंगाबाद आणि विदर्भातील नागपूरचा समावेश आहे.
दरम्यान, देशात पुढील चार आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लोकांनी अधिकाधिक जागरूक रहावे, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. निति आयोगाचे (आरोग्य) सदस्य आणि कोरोनाविरोधी कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गहिरे होत चालले आहे. अधिकाधिक लोकांच्या चाचण्या, लसीकरण आणि मास्क वापरणे, बंधनकारक करणे यावर सर्व राज्यांनी भर द्यावा.
News English Summary: The next four weeks are crucial in the country. The central government has warned people to be more vigilant to stem the second wave of corona. Member of the Policy Commission (Health) and Chief of the Anti-Corona Action Force, Dr. V. K. Paul said the number of corona sufferers is growing rapidly and the crisis of corona is getting deeper day by day. All states should emphasize the need for more people to be tested, vaccinated and to use masks.
News English Title: The next four weeks are crucial in the country due to corona pandemic said union govt news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो