चिमुकलीच्या मदतीसाठी राज्य आणि केंद्र सरकार धावलं | औषधांवरील सर्व कर माफ
मुंबई, १० फेब्रुवारी: अखेर अथक प्रयत्नानंतर तीराच्या परदेशातून येणाऱ्या औषधासाठी जो कोट्यवधी रुपयांचा कर भरावा लागणार होता, तो कर माफ व्हावा याकरिता राज्याच्या आरोग्य विभागाने तीराच्या कुटुंबाना तसे सोमवारी (8 डिसेंबर) पत्र दिले आहे. यामुळे तीराच्या परदेशातून येणाऱ्या औषधांवरील करमाफीबाबत सकारात्मक पाऊल म्हणावं लागणार आहे. प्रत्यक्षात औषध भारतात येण्यासाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे. सध्या तीरा तिच्या अंधेरी येथील घरी असून पोर्टेबल व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहे. तीराच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, तिची तब्बेत स्थिर असून लवकरात लवकर तिला औषधे मिळावीत यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करत आहोत. तीराचा रक्ताचा एक अहवाल नेदरलँडवरून येणे बाकी असून तो दोन – तीन दिवसांत येईल. तो एकदा का अहवाल आला की, तीराचा औषध मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. विशेष म्हणजे अभिनेता नीलेश दिवेकर याने या डॉक्युमेंटेशन साठी मागचे 2 आठवडे बरीच मेहनत घेतली.
18 दिवस तीराने रुग्णालयात घालविल्यानंतर तीरा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घरी आली होती. तिची तब्बेत सध्या बरी असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तिला श्वास घेण्यासाठी पोर्टेबल व्हेंटिलेटरवर घरी ठेवण्यात आले आहे. अन्न भरविण्यासाठी पोटात नळी टाकली आहे तिथूनच तीराची आई तिला अन्न भरविते. तीराला स्पायनल मस्क्युलर ऍस्ट्रॉफी (SMA) या दुर्मिळ आजाराचं निदान झालं असल्याने तिला श्वास घेण्यास त्रास होत आहे.
अखेर तिच्या उपचारासाठी आवश्यक असणारी इंजेक्शनची किंमत 16 कोटी रुपये असून ती गोळा करण्याकरिता क्राउड फंडिंगचा पर्याय निवडला. रात्र-दिवस मेहनत करून काही महिन्यात पैसे जमा झालेही मात्र आता मोठी समस्या आहे. अमेरिकेतील औषधं भारतात आणण्यासाठी आयात शुल्क लागते, त्याकरिता आणखी 2-5 कोटी रुपये इतकी रक्कम लागू शकते, आणि ती रक्कम गोळा करणे आता जिकिरीचे झाले असून कामत दाम्पत्य हा कर माफ करण्यासाठी अद्यापही प्रयत्न करीतच आहेत. त्यात सकारात्मक बाबा म्हणजे तीराच्या परदेशातून येणाऱ्या औषधासाठी जो कोट्यवधी रुपयांचा कर भरावा लागणार होता, तो कर माफ व्हावा याकरिता राज्याच्या आरोग्य विभागाने तीराच्या कुटूंबाना तसे पत्र दिले आहे. याकरिता तीराच्या पालकांनी शासनासोबत पत्र व्यवहार केला होता.
तीरासाठी लागणाऱ्या १६ कोटी रुपयांच्या औषधावर आकारण्यात येणारा सीमा शुल्क राज्य सरकारने आधीच माफ केला
राज्याच्या आरोग्य विभागाने तीराच्या कुटुंबाना तसे सोमवारी (8 डिसेंबर) पत्र दिले आहे. pic.twitter.com/KKrOqksr8F
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) February 10, 2021
मोठी आणि positive update
तीरा कामत या चिमुरडीच्या injection वर कस्टम ड्यूटी लागू नये साठीचं सर्टिफिकेट राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिले आहे. त्यामुळे 16 कोटी व्यतरिक्त अधिक 5 ते 6 कोटी उभे करण्याचा ताण हलका होणार आहे.आता हे सर्टिफिकेट injection भारतात आणताना कामत देतील pic.twitter.com/SW9Bq6oHX6— Harshada (@HarshadaSwakul) February 8, 2021
दरम्यान, तीरासाठी लागणाऱ्या १६ कोटी रुपयांच्या औषधावर आकारण्यात येणारा सीमा शुल्क राज्य सरकारने आधीच माफ केला आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. तीराच्या औषधाविषयी राज्य सरकारने सहकार्याची भूमिका घेतली हे पाहून बरे वाटले, असे नमूद करताना राज्याप्रमाणे आता केंद्रानेही मानवतेच्या भूमिकेतून दुसरे पाऊल उचलावे, अशी आशा रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. रोहित यांच्या ट्वीटनंतर काही वेळातच केंद्राच्या निर्णयाची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. हा तीरा व तिच्या पालकांसाठी खूप मोठा आधार ठरला आहे. कारण कामत कुटुंबीयांनी २३ जानेवारी रोजी यासंदर्भात पंतप्रधानांना पात्र लिहून विनंती केली होती.
Our appeal to Hon. @PMOIndia @narendramodi to urgently save our dying kids from #SMA. Even after raising ₹16 cr for gene therapy, Teera still doesn’t get the treatment because of 35% duties and taxes. Read our full appeal below @OfficeofUT @drharshvardhan @nsitharaman @AmitShah pic.twitter.com/1Rvm55JWoO
— Teera Fights SMA (@TeeraFightsSma) January 23, 2021
#TeeraKamat या चिमुकलीवरील उपचारासाठी लागणाऱ्या १६ कोटी ₹ च्या औषधावर आकारण्यात येणारं सीमा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने सहकार्याची भूमिका घेतली हे पाहून बरं वाटलं.केंद्र सरकारही मानवतेच्या भूमिकेतून दुसरं पाऊल उचलेल,अशी आशा व्यक्त करतो!@drharshvardhan@PMOIndia https://t.co/FSDZATtKB1
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 9, 2021
त्यानंतर मुंबईतील तीरा कामत या पाच महिन्यांच्या चिमुकलीवरील उपचारासाठी लागणाऱ्या १६ कोटी रुपयांच्या औषधावर आकारण्यात येणारे सर्व कर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
News English Summary: The state health department on Monday (December 8) issued a letter to Teera’s family seeking tax exemption for the billions of rupees that Teera had to pay for medicines imported from abroad. This will be a positive step towards tax exemption on drugs coming from abroad. In fact, it will take another 15 days for the drug to reach India. Tira is currently at her home in Andheri undergoing treatment on a portable ventilator. According to Tira’s parents, she is stable and we are trying our best to get her medicine as soon as possible. A report of Tira’s blood is yet to come from the Netherlands and it will come in two-three days. He once reported that the way to get arrow medicine is going to be easier. What is special is that actor Nilesh Divekar worked hard for the last 2 weeks for this documentation.
News English Title: The state health department on Monday December 8 issued a letter to Teeras family seeking tax exemption news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY