26 December 2024 5:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON
x

जगात कुठेही बालकांमध्ये गंभीर संक्रमण नाही | पुढच्या लाटेतही असे होईल याचा पुरावा नाही - डॉ. गुलेरिया

Dr Randeep Guleria

नवी दिल्ली, ०९ जून | देशात कोरोनाची दुसरी लाट कमकुवत होत असल्याने नवीन रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. तिसऱ्या लाटेमध्ये बालकांवर वाईट परीणाम होण्याच्या वृत्तादरम्यान सरकारने दिलासादायक दावा केला आहे. एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मंगळवारी सांगितले की, भारत किंवा जगातील प्रकरणे पाहिले तर आतापर्यंत असा कोणताही डेटा आलेला नाही, ज्यामध्ये सांगितले असेल की, मुलांमध्ये आता जास्त गंभीर संक्रमण आहे. पुढची लाट आली तर बालकांवर गंभीर परीणाम होतील असा कोणताही पुरावा नाही. कोरोना परिस्थितीवर होत असलेल्या नेहमीच्या पत्रकार परीषदेत ते बोलत होते.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव, लव अग्रवाल म्हणाले की, देशातील सक्रिय प्रकरणे 13 लाखांवर आली आहेत. होम आयसोलेशन आणि हॉस्पिटल मिळून रिकव्हरी रेट 94.3% झाला आहे. 1 ते 7 जूनपर्यंत पॉझिटिव्हिटी रेटमध्ये 6.3% ची घट झाली आहे. त्यांनी म्हटले की, 7 मे रोजी देशात एका दिवसात 4.14 लाख नवीन केस नोंदवण्यात आल्या. आता या एक लाखांपेक्षाही कमी झाल्या आहेत. सरकारनुसार, भारतात प्रत्येकी 10 लाख लोकसंख्येमागे 20,822 केस आल्या आहेत. 252 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे जगात सर्वात कमी आहे.

व्हक्सीनेशन ड्राइव्हवर दिर्घ एनालिसिसनंतर निर्णय
प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांना प्रश्न करण्यात आला की, व्हॅक्सीन पॉलिसीवर निर्णय सुप्रीम कोर्टाच्या टीकेनंतर घेण्यात आला का? यावर त्यांनी म्हटले की, आम्ही सुप्रीम कोर्टाच्या चिंतेचा सन्मान करतो. मात्र सरकार डी-सेंट्रलाइजेशनच्या मॉडलला लागू करेल्यानंतर एक मेपासून समिक्षा करत होते. असे निर्णय काही कालावधीनंतर विश्लेषण आणि विचारविनिमयानंतर घेतले जातात.

 

News English Summary: As the second wave of corona in the country weakens, the number of new patients is steadily declining. The government has made heartbreaking claims amid reports of a third wave affecting children. The director of AIIMS, Dr. Randeep Guleria said on Tuesday that if we look at cases in India or around the world, there is no data so far that suggests that children now have more serious infections.

News English Title: There is no data so far that suggests that children now have more serious infections said AIIMS Dr Randeep Guleria news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x