3 December 2024 11:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

Health First | ताप आलाय आणि त्यामुळे अशक्तपणाही? खा 'या' 5 गोष्टी आणि लवकर बरे व्हा

5 things during viral fever

मुंबई, २४ जुलै | ताप असताना शरीरातली संपूर्ण ऊर्जा नष्ट होते. यामुळे व्यक्तीला कोणतेही काम करताना अशक्तपणा जाणवतो. या परिस्थितीत चांगले खाणे फार महत्त्वाचे असते. यामुळे रुग्णाची नष्ट झालेली ऊर्जा परत येते आणि त्यांना आधीपेक्षा बरे वाटू लागते. आम्ही आपल्याला सांगणार आहोत अंगात ताप असताना खाण्याचे 5 पदार्थ जे खाल्ल्याने आपली शक्ती परत येऊ शकते.

जाणून घ्या अंगात ताप असताना काय खाल:

भरपूर पौष्टिक सूप प्या:
ताप असताना पौष्टिक सूप पिणे हे सर्वात चांगले असते. यातल्या पोषक तत्त्वांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच ताप कमी होण्यासही लवकर मदत होते आणि अशक्तपणा कमी होतो.

बेसनाचा शिरा:
बेसनाच्या शिऱ्याचा सर्दी, खोकला, ताप अशा आजारांमध्ये खूप फायदा होतो. बेसनाच्या शिऱ्यामुळे घशातली खवखव आणि नाक चोंदण्याची समस्या दूर होते आणि तुम्हाला बरे वाटू लागते.

उकडलेली अंडी खा:
अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन्स असतात जे शरीराला ऊर्जा देतात. यात विटॅमिन बी 6 आणि बी 12, झिंक आणि सेलेनियम असते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. ताप असताना अंडी खाल्ल्याने अशक्तपणाही कमी होतो.

खिचडी हाही आहे चांगला पर्याय:
ताप असताना आपले यकृत कमजोर होते ज्यामुळे जड अन्नपदार्थ पचवण्याची क्षमता कमी होते. अशा परिस्थितीत खिचडी हा सोप्याने पचणारा आणि पौष्टिक पर्याय असतो.

रव्याचा उपमा देईल शक्ती:
अंगात ताप असताना अनेकदा बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो ज्यामुळे अन्नावरची वासना उडते आणि अशक्तपणा येतो. अशावेळी आपल्या आहारात रव्याच्या उपम्याचा समावेश केल्यास आपली ही समस्या लवकर दूर होईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Eat these 5 things during viral fever news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x